🚩छत्रपती शिवाजी महाराज 🚩
पूर्ण नाव : शिवाजी शहाजी भोसले.
जन्म : १९ फेब्रुवारी १६३०.
शिवनेरी किल्ल्यात शिवाजी राजांचा जन्म झाला. त्यांच्या आईचे नाव जिजाबाई व वडिलांचे नाव शहाजीराजे असे होते.
बालपण : शिवरायांची पहिली सहा वर्षे फार धावपळीत गेली. त्यांची आई त्यांना राम, कृष्ण, भीम, अभिमन्यू या शूरवीरांच्या कथा सांगे: तर कधी ज्ञानोबा, नामदेव, एकनाथ यांचे अभंग म्हणून दाखवत असे. शिवराय मावळ्यांबरोबर लपंडाव, चेंडू, भोवरा हे खेळ खेळत. जिजाबाई व शिवराय यांना शहाजीराजांनी बंगळूरास नेले. तिथे शिवरायांच्या शिक्षणाची व्यवस्था केली. घोड्यावर बसणे, कुस्ती खेळणे, दांडपट्टा फिरवणे, तलवार चालवणे याचे शिक्षण घेऊन ते तरबेज झाले. पुण्याला आल्यानंतर दादाजींनी त्यांना घोडदौड. तिरंदाजी, कुस्ती खेळणे तसेच लोकांना आपलेसे करणे, न्याय देणे. या गोष्टीही शिकविल्या. वयांच्या चौदाव्या वर्षी फलटणच्या नाईक-निंबाळकरांची कन्या सईबाई हिच्याशी त्यांचा विवाह लाल महालात संपन्न झाला.
कार्य : १६४५ मध्ये त्यांनी आपल्या सर्वगड्यांसह रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्यस्थापनेची शपथ वाहिली. शिवरायांनी स्वतंत्र संस्कृत भाषेत करून घेतली. ती राजमुद्रा अशी होती.
राजमुद्रा
प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता । शाहसुनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते ।।
किल्ल्यांशिवाय कसले आहे स्वराज्य । ज्यांचे किल्ले त्यांचे राज्य । या विचारांनी त्यांनी तोरणा जिंकून स्वराज्याचे तोरण बांधावयाचे, असे ठरविले. नंतर त्यांनी तोरणा किल्ल्यास प्रचंडगड असे नाव दिले. शिवरायांचा बंदोबस्तासाठी आदिलशहाने अफजलखानाला
पाठविले. अफझलखान कपटी आहे हे शिवराय जाणून होते. त्यासाठी लढाई न करता प्रत्यक्ष भेट करण्याचे ठरविले व त्या भेटीत त्यांनी अफजलखानाचा वध केला. या वधामुळे चिडून आदिलशहाने सिदी जौहरला शिवरायांशी लढण्यास पाठविले. त्याने राजांना पन्हाळगडात कोंडले; परंतु छत्रपती शिवराय तेथूनही निसटले. या कामी त्यांना बाजीप्रभू देशपांडे यांनी मदत केली. त्यानंतर लाल महालात कपटाने आलेल्या शायिस्तेखानाची बोटे कापून त्याची फजिती केली; तो दिवस होता, ५ एप्रिल १६६३. पुरंदरच्या तहानंतर ते औरंगजेबास भेटण्या- साठी आगऱ्याला गेले परंतु बादशहाने त्यांना नजरकैद केले. तेव्हा राजे युक्तीने पेटान्यातून १६६६ मध्ये पसार झाले.
मुघलांच्या ताब्यातील कोंढाणा हा मजबूत किल्ला स्वराज्यात असावा, असे जिजाबाईसह शिवरायांना वाटत असे. त्यासाठी त्यांनी तानाजी मालुसरेना पाठविले; परंतु लढता लढता तानाजी मरण पावले. तेव्हा शिवराय म्हणाले, 'गड आला, पण सिंह गेला म्हणून त्या किल्ल्याला सिंहगड हे नाव दिले व नंतर तानाजीच्या गावी जाऊन रायबाचे लग्न केले.
स्वराज्य निर्माण झाले हे जगाला कळावे म्हणून त्यांनी स्वत:ला राज्याभिषेक करून घेण्याचे ठरविले. काशीपंडित गागाभट्ट यांनी पौरोहित्य केले. शिवरायांचा राज्याभिषेक १६७४ मध्ये झाला. त्यांनी आपल्या प्रजेवर मातेसारखी माया केली. साधुसंत, मातापिता या सर्वांचा आदर कैला, फितुरांना कडक शासन केले. 'सजन्नांना राखावे. दुर्जनांना ठेचावे हा शिवरायांचा बाणा होता. ते सर्व धर्मांचा आदर करत.
शिवरायांचे रूप : आदर्श पुत्र, सावध नेता, हिकमती लढवय्या. दुर्जनांचा कर्दनकाळ आणि सज्जनांचा कैवारी असे त्यांच्या गुणांचे पैलू आहेत. अशा या महान राजाला शतशः प्रणाम !
मृत्यू : अशा या थोर राजाचा मृत्यू १६८० मध्ये झाला.


No comments:
Post a Comment