Showing posts with label इयत्ता ४ थी. Show all posts
Showing posts with label इयत्ता ४ थी. Show all posts

Sunday, February 14, 2021

पाठ २४. थोर हुतात्मे | संपूर्ण प्रश्न उत्तर | इयत्ता ४ थी | मराठी बालभारती | स्वाध्याय

 पाठ २४. थोर हुतात्मे  
संपूर्ण प्रश्नोत्तरे
--------------------------

प्र.१ )  एका  वाक्यात उत्तरे लिहा :

१)  लाहोरच्या  तुरुंगातले तीन क्रांतिवीर कोणत्या घोषणा देत होते ?
उत्तर :-  लाहोरच्या तुरुंगातले तीन  क्रांतिवीर   'इन्किलाब  झिंदाबाद'   अशा घोषणा देत होते.

२)  १९२८ साली लाहोरमध्ये  कोणाच्या विरोधात  निदर्शने  झाली  ?
उत्तर :-  १९२८ साली 'सायमन कमिशन'   च्या विरोधात निदर्शने झाली .

३)  भगतसिंगांनी कोणकोणत्या महाविद्यालयांत उच्च शिक्षण घेतले ?
उत्तर :-  भगतसिंगांनी  लाहोर येथील दयानंद अंग्लो- वेदिक महाविद्यालय  व   नॅशनल   कॉलेज येथे उच्च शिक्षण घेतले.

४)  ब्रिटीश  सरकारने  सुखदेव यांना  कशामुळे धमकावले  ?
उत्तर :-  किंग जॉर्जच्या विरोधात गुप्त मसलतीच्या योजनेमुळे   ब्रिटीश सरकारने  सुखदेव यांना धमकावले .

५)  कोणाच्या मदतीने  सुखदेवांनी  'नौजवान  भारत सभा '  स्थापन केली  ?
उत्तर :-  कॉम्रेड  रामचंद्र ,   भगतसिंग  आणि   भगवतीचरण  व्होरा  यांच्या मदतीने  सुखदेवांनी   'नौजवान  भारत   सभा '  स्थापन केली .
--------------------------
प्र.२ )  गाळलेल्या जागी कंसातील योग्य शब्द भरा:

१)  अलाहाबादच्या ------------- मध्ये  पोलिसांच्या चकमकीत  चंद्रशेखर   आझाद ठार  झाले.
(   आल्फ्रेड  पार्क /  स्कॉट पार्क )
उत्तर :-  आल्फ्रेड पार्क.

२)  भगतसिंग, राजगुरू आणि  सुखदेव यांचा अंत्यविधी फिरोजपुर जवळ  ------------- नदीच्या काठी करण्यात आला.
(   गंगा /  सतलज )
उत्तर :-  सतलज.

३)  दिल्लीच्या '-------------' साप्ताहिकात  बळवंतसिंग या  नावाने भगतसिंग काम करू लागले.
(   प्रताप /  अर्जुन )
उत्तर :-  प्रताप.

४)  सुखदेव यांचा जन्म -------------तील चौरा बाजार येथे झाला.
(   लुधियाना /  बंग )
उत्तर :-   लुधियाना

५)  हुतात्मा राजगुरू यांच्या स्मरणार्थ 'खेड' या त्यांच्या जन्मगावाचे नामांतर ------------- असे  करण्यात आले.
(   राजगुरूनगर /  कानपूर )
उत्तर :-  राजगुरुनगर.

--------------------------
प्र.३ ) योग्य जोड्या जुळवा :


उत्तर:-  १) राजगुरू -
                 २)   भगतसिंग -
                 ३)   सुखदेव -
                ४)   प्रताप वृत्तपत्र - 

Thursday, October 15, 2020

मायेची पाखर | इयत्ता ४ थी मराठी | स्वाध्याय | प्रश्नोत्तरे

                                                      मायेची पाखर 




 प्रश्न १ .एका वाक्यात उत्तरे लिहा .

१)पाहुण्यांनी अगोदर जेवायचे का नाकारले ?
उत्तर -वस्तीगृहातील मुलांनी बनवलेले जेवण चांगले नसेल म्हणून पाहुण्यांनी अगोदर जेवायचे नाकारले .

२)वस्तीगृहातील मुलांवर अण्णांची माया कोणा प्रमाणे होती ?
उत्तर - वस्तीगृहातील मुलांवर अण्णांची माया आई वडिलां प्रमाणे होती .

३)अण्णा आयुष्यभर कोणाच्या शिक्षणासाठी झटत राहिले ?
उत्तर - अण्णा आयुष्यभर गोरगरिबांच्या मुला मुलींच्या शिक्षणासाठी झटत राहिले .

४)कर्मवीर भाऊराव आणि कोणत्या शिक्षण संस्थेच्या माध्यमातून शाळा सुरू केल्या ?
उत्तर - कर्मवीर भाऊराव यांनी रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून शाळा सुरू केल्या.

5)लेखक कुठे जाण्यासाठी निघाले होते ?
उत्तर - लेखक पुण्याला जाण्यासाठी निघाले होते .

प्रश्न २ .गाळलेल्या जागी योग्य शब्द लिहा .

१)संस्थेच्या आवारात एक मोठे     वडाचे          झाड होते .

२)स्वतःची     कांबळी            त्याच्या अंगावर घातली .

३)त्या मुलांपैकी कितीतरी जणांना         आई नव्हती .

४) "अण्णा ,आपण खरेखुरे या मुलांचे           आईबाप          आहात .

प्रश्न ३ .कोण कोणाला म्हणाले ?
१) "आता इथंच मुक्काम करा ! "
उत्तर - असे भाऊराव लेखकांना म्हणाले .

२) " जा रे ,स्वयंपाक घरात काही शिल्लक असेल ते घेऊन ये बघू ! "
उत्तर - असे भाऊराव एका मुलाला म्हणाले .

३) " आपणांस उदंड आयुष्य मिळो ! "
उत्तर -असे लेखक भाऊरावांना म्हणाले .

प्रश्न ४ .थोडक्यात उत्तरे लिहा .

१)लेखक उपाशी आहेत हे समजल्यावर अण्णांनी काय केले ?
उत्तर - लेखक उपाशी आहेत हे कळल्यावर अण्णांनी एका मुलाला सांगितले , " जा ,रे स्वयंपाक घरात काही शिल्लक असेल ते घेऊन ये . "मुलाने धावत जाऊन स्वयंपाक घरातून पिठले ,भाकरी ,कांदा , तेल एका ताटात घेऊन आला व लेखकांना खायला दिले .

२)मध्यरात्रीनंतर कोणता प्रसंग घडला ?
उत्तर - मध्यरात्रीनंतर अण्णांनी उठून कंदील घेऊन वस्तीगृहातील प्रत्येक मुलाला झोप लागली की नाही हे पाहून त्यांच्या अंगावर पांघरून आहे का नाही ते पाहिले .एक मुलगा थंडीने कुडकुडत असलेला पाहून त्याला उचलून आपल्या बिछान्यावर आणून झोपवले .स्वतःची कांबळी त्याच्या अंगावर घातली .त्याला पोटाशी धरले त्यामुळे त्या मुलाला गाढ झोप लागली .

३)सकाळी उठल्यावर लेखकांच्या तोंडून कोणते उद्गार निघाले ?
उत्तर - रात्रीचा प्रसंग डोळ्यांनी पाहिल्यामुळे लेखक उठले व अण्णांना कडकडून भेटले व अण्णांना म्हणाले, "आपण खरेखुरे या मुलांचे आईबाप आहात .या मुलांचेच नव्हे तर या महाराष्ट्रातील गोरगरिबांच्या मुलांचे आपण पालक आहात आपणास उदंड आयुष्य  मिळो! "

प्रश्न ५ .वाक्प्रचार व त्याचा अर्थ यांच्या जोड्या जुळवा .
अ गट                                    ब गट
१ )टाळाटाळ करणे -            एखादी गोष्ट   
                                       करायची टाळणे

२)पोटात कावळे ओरडणे -  खूप भूक लागणे

३)डोळा लागणे -   झोप लागणे

४)झटत राहणे -  सतत प्रयत्न करणे

प्रश्न ६)लेखकांच्या पोटात कावळे ओरडत होते ,म्हणजे लेखकांना खूप भूक लागली होती.
            आता पुढील वाक्यातील अधोरेखित शब्दाचा अर्थ सांगा .

१)भरपूर जेवण झाल्यावर नाना अजगरासारखे पडून होते .
उत्तर - अजगरासारखे पडून होते -म्हणजे खाल्ल्यावर अजगर सुस्त पडून राहते त्याप्रमाणे नाना सुस्त पडून होते .

२)दुपारच्या वेळी हळूच खाऊ घेताना बंड्या अजिबात आवाज होऊ देत नाही ; म्हणून त्याला सगळे मांजरीच्या पायाचा म्हणतात .
उत्तर - मांजरीच्या पायाचा म्हणजे मांजराच्या पायाखाली आधी सारखा मऊ भाग असतो त्यामुळे मांजराच्या पायाचा आवाज होत नाही .

Most Important Contraction List

Most Important Contraction List Are not –> aren’t Can not –> can’t Could not –> couldn’t Did not –> didn’t Do not –> don’t Do...