Showing posts with label लोकमान्य टिळक. Show all posts
Showing posts with label लोकमान्य टिळक. Show all posts

Friday, March 12, 2021

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक | आपले नेते

 लोकमान्य बाळ गंगाधर टिळक



संपूर्ण नाव : केशव (बाळ) गंगाधर टिळक 

जन्मतारीख : २३ जुलै १८५६.

रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली गावी टिळकांचा जन्म झाला. 
त्यांच्या वडिलांचे नाव गंगाधरपंत व आईचे नाव पार्वतीबाई.

बालपण : खूप दिवसांनी घरात जन्माला आलेला मुलगा म्हणून
सर्वजण टिळकांना लाडाने बाळ म्हणत; पण तेच नाव पुढे रूढ झाले. 
लहानपणापासूनच टिळकांची बुद्धी कुशाग्र होती. त्यांना असत्य व 
अन्यायाबद्दल चीड होती. त्यांच्या अंगी आत्मविश्वास, 
निर्भयपणा हे गुण होते. शाळेत असताना मी वर्गात शेंगा 
खाल्ल्या नाहीत. मी टरफले उचलणार नाही, असे 
ठामपणे सांगणारे टिळक शिक्षा न स्वीकारता वर्गाबाहेर पडले. 
संत हा शब्द संत, सन्त आणि सन्त अशा तिन्ही प्रकारे लिहिल्यास 
बरोबरच आहे. हे आत्मविश्वासाने सांगून शाबासकी मिळवली. 
त्यांच्या आईने त्यांच्या बालमनावर आरोग्य विषयक 
उत्तम असे संस्कार केले होते.


शिक्षण : टिळकांनी मोठ्या मेहनतीने बी. ए.. एल. एल. बी. ची पदवी मिळवली.

ग्रंथ-लेखन : टिळकांनी 'गीता रहस्य' हा ग्रंथ लिहिला.

देशकार्य-समाजसेवा : उच्च शिक्षण पूर्ण केल्यानंतर पुणे 
येथे लोकसेवेसाठी टिळकांनी श्री विष्णुशास्त्री चिपळूणकर 
व गोपाळराव आगरकर यांच्या सहकार्याने न्यू इंग्लिश 
स्कूल व फर्ग्युसन कॉलेज या शिक्षण संस्था सुरू केल्या.

जनता, राष्ट्रप्रेम, राष्ट्रभक्तीने प्रेरित होऊन ब्रिटिश सत्तेच्या 
अत्याचाराविरुद्ध आवाज उठवायला हवा, म्हणून टिळकांनी 
'केसरी" व 'मराठा' ही वृत्तपत्रे सुरू केली, भारतीय समाजाला 
एकजूट करण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव व 
शिवजयंती असे उत्सव सुरू केले.

स्वातंत्र्य लढ्यामधील त्यांच्या सहभागामुळे अनेक 
वेळेला त्यांना कारावासाची शिक्षा भोगावी लागली. 
स्वराज्य, स्वदेशी बहिष्कार व राष्ट्रीय प्रशिक्षण आदि 
चतु:सूत्रीचा टिळकांनी पुरस्कार केला. टिळकांच्या भाषणाने, 
लेखनाने जनता जागृत होऊन पेटून उठली. त्यामुळे इंग्रज 
सरकारने त्यांच्यावर राजद्रोहाचा खटला भरला. 
टिळकांना त्या वेळी सहा वर्षांची शिक्षा झाली. 
त्यांना ब्रह्मदेशातील मंडालेच्या तुरुंगात ठेवण्यात आले. 
'होमरूल लीग' व 'स्वराज्य संघ या संस्था स्थापन केल्या. 
स्वराज्य हा आमचा जन्मसिद्ध हक्क आहे व 
तो आम्ही मिळवणारच' या त्यांच्या सिंहगर्जनेनेच जनता जागृत 
होऊ लागली.

चिखलात कमळ उगवावे आणि त्यांचा सुगंध सगळीकडे पसरावा, 
त्याप्रमाणे त्यांच्या कार्याने त्यांची कीर्ती देशविदेशांत पसरली. 
शरीर थकले तरीही टिळक मनाने थकले नाहीत.

मृत्यू : 'भारतीय तरुणांनो, उद्या मी नसेन: तरीही देशाला स्वातंत्र्य मिळवून 
देण्याचं माझं हे स्वप्न तुम्हाला पूर्ण करायचं आहे आणि तुम्ही ते 
करणारच हा माझा विश्वास आहे, असे टिळक म्हणत होते. 
टिळक आजारी पडले. अखेर महाराष्ट्राच्या या नरकेसरीचे 
१ ऑगस्ट १९२० रोजी निधन झाले.

Most Important Contraction List

Most Important Contraction List Are not –> aren’t Can not –> can’t Could not –> couldn’t Did not –> didn’t Do not –> don’t Do...