💥 शब्दसमूहाबद्दल एक शब्द 💥
पुढील वाक्ये लक्षपूर्वक वाचा :
१) तो दुसऱ्या कोणावरही अवलंबून नाही.
२) ते समाजाची खूप सेवा करतात.
हीच वाक्ये आपण अशीही म्हणू शकतो-
१) तो स्वावलंबी आहे .
२) ते समाजसेवक आहेत.
वरील वाक्यातील स्वावलंबी, समाजसेवक , या शब्दांतून अनेक शब्दांचा अर्थ व्यक्त झाला आहे . अशा शब्दांना ' शब्दसमूहाबद्दल एक शब्द असे म्हणतात. अशा प्रकारे आपण अनेकदा शब्दसमूहाबद्दल एक शब्द वापरत असतो.
चला तर मग अशाच इतर शब्दांची ओळख करून घेऊयात........