१) लाहोरच्या तुरुंगातले तीन क्रांतिवीर कोणत्या घोषणा देत होते ? उत्तर :- लाहोरच्या तुरुंगातले तीन क्रांतिवीर 'इन्किलाब झिंदाबाद' अशा घोषणा देत होते.
२) १९२८ साली लाहोरमध्ये कोणाच्या विरोधात निदर्शने झाली ? उत्तर :- १९२८ साली 'सायमन कमिशन' च्या विरोधात निदर्शने झाली .
३) भगतसिंगांनी कोणकोणत्या महाविद्यालयांत उच्च शिक्षण घेतले ? उत्तर :- भगतसिंगांनी लाहोर येथील दयानंद अंग्लो- वेदिक महाविद्यालय व नॅशनल कॉलेज येथे उच्च शिक्षण घेतले.
४) ब्रिटीश सरकारने सुखदेव यांना कशामुळे धमकावले ? उत्तर :- किंग जॉर्जच्या विरोधात गुप्त मसलतीच्या योजनेमुळे ब्रिटीश सरकारने सुखदेव यांना धमकावले .
५) कोणाच्या मदतीने सुखदेवांनी 'नौजवान भारत सभा ' स्थापन केली ? उत्तर :- कॉम्रेड रामचंद्र , भगतसिंग आणि भगवतीचरण व्होरा यांच्या मदतीने सुखदेवांनी 'नौजवान भारत सभा ' स्थापन केली .
--------------------------
प्र.२ ) गाळलेल्या जागी कंसातील योग्य शब्द भरा:
१) अलाहाबादच्या ------------- मध्ये पोलिसांच्या चकमकीत चंद्रशेखर आझाद ठार झाले.
( आल्फ्रेड पार्क / स्कॉट पार्क )
उत्तर :- आल्फ्रेड पार्क.
२) भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांचा अंत्यविधी फिरोजपुर जवळ ------------- नदीच्या काठी करण्यात आला.
( गंगा / सतलज )
उत्तर :- सतलज.
३) दिल्लीच्या '-------------' साप्ताहिकात बळवंतसिंग या नावाने भगतसिंग काम करू लागले.
( प्रताप / अर्जुन )
उत्तर :- प्रताप.
४) सुखदेव यांचा जन्म -------------तील चौरा बाजार येथे झाला.
( लुधियाना / बंग )
उत्तर :- लुधियाना
५) हुतात्मा राजगुरू यांच्या स्मरणार्थ 'खेड' या त्यांच्या जन्मगावाचे नामांतर ------------- असे करण्यात आले.