Friday, February 26, 2021

Online Test for lesson Our Duty towards the family- The Trees around us- The Animals Around us | Standard One | Environmental Studies

Online Test 

Our Duty towards the family- The Trees around us- The Animals Around us 

Standard One 

Environmental Studies


नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. खाली दिलेल्या चाचणी मधील प्रश्न काळजीपूर्वक वाचा आणि नंतर चाचणी सोडवा.

सोडवलेली चाचणी आपल्या वहीत लिहून ठेवा.



Video Lessons For these chapters👇
 
Our Duty towards the family-

 





The Trees around us-

   







The Animals Around us-

 

चाचणी सोडवण्यापूर्वी दिलेले व्हिडीओ पूर्ण पहा.

Wednesday, February 24, 2021

माझी परिसर अभ्यासिका क्रमांक १० | Environmental Studies | Standard One

 माझी परिसर अभ्यासिका क्रमांक १०  Environmental Studies | Standard One

            नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुढे दिलेल्या Pdf फाईल मध्ये Our Duty towards the family, Trees Around us , आणि Animals around us 
 वर आधारित प्रश्नांचा संच दिलेला आहे . हा संच आपण आपल्या वहीत सोडवायचा आहे . योग्य उत्तरे लिहून ती पाठांतर करायची आहेत.

Sunday, February 14, 2021

पाठ २४. थोर हुतात्मे | संपूर्ण प्रश्न उत्तर | इयत्ता ४ थी | मराठी बालभारती | स्वाध्याय

 पाठ २४. थोर हुतात्मे  
संपूर्ण प्रश्नोत्तरे
--------------------------

प्र.१ )  एका  वाक्यात उत्तरे लिहा :

१)  लाहोरच्या  तुरुंगातले तीन क्रांतिवीर कोणत्या घोषणा देत होते ?
उत्तर :-  लाहोरच्या तुरुंगातले तीन  क्रांतिवीर   'इन्किलाब  झिंदाबाद'   अशा घोषणा देत होते.

२)  १९२८ साली लाहोरमध्ये  कोणाच्या विरोधात  निदर्शने  झाली  ?
उत्तर :-  १९२८ साली 'सायमन कमिशन'   च्या विरोधात निदर्शने झाली .

३)  भगतसिंगांनी कोणकोणत्या महाविद्यालयांत उच्च शिक्षण घेतले ?
उत्तर :-  भगतसिंगांनी  लाहोर येथील दयानंद अंग्लो- वेदिक महाविद्यालय  व   नॅशनल   कॉलेज येथे उच्च शिक्षण घेतले.

४)  ब्रिटीश  सरकारने  सुखदेव यांना  कशामुळे धमकावले  ?
उत्तर :-  किंग जॉर्जच्या विरोधात गुप्त मसलतीच्या योजनेमुळे   ब्रिटीश सरकारने  सुखदेव यांना धमकावले .

५)  कोणाच्या मदतीने  सुखदेवांनी  'नौजवान  भारत सभा '  स्थापन केली  ?
उत्तर :-  कॉम्रेड  रामचंद्र ,   भगतसिंग  आणि   भगवतीचरण  व्होरा  यांच्या मदतीने  सुखदेवांनी   'नौजवान  भारत   सभा '  स्थापन केली .
--------------------------
प्र.२ )  गाळलेल्या जागी कंसातील योग्य शब्द भरा:

१)  अलाहाबादच्या ------------- मध्ये  पोलिसांच्या चकमकीत  चंद्रशेखर   आझाद ठार  झाले.
(   आल्फ्रेड  पार्क /  स्कॉट पार्क )
उत्तर :-  आल्फ्रेड पार्क.

२)  भगतसिंग, राजगुरू आणि  सुखदेव यांचा अंत्यविधी फिरोजपुर जवळ  ------------- नदीच्या काठी करण्यात आला.
(   गंगा /  सतलज )
उत्तर :-  सतलज.

३)  दिल्लीच्या '-------------' साप्ताहिकात  बळवंतसिंग या  नावाने भगतसिंग काम करू लागले.
(   प्रताप /  अर्जुन )
उत्तर :-  प्रताप.

४)  सुखदेव यांचा जन्म -------------तील चौरा बाजार येथे झाला.
(   लुधियाना /  बंग )
उत्तर :-   लुधियाना

५)  हुतात्मा राजगुरू यांच्या स्मरणार्थ 'खेड' या त्यांच्या जन्मगावाचे नामांतर ------------- असे  करण्यात आले.
(   राजगुरूनगर /  कानपूर )
उत्तर :-  राजगुरुनगर.

--------------------------
प्र.३ ) योग्य जोड्या जुळवा :


उत्तर:-  १) राजगुरू -
                 २)   भगतसिंग -
                 ३)   सुखदेव -
                ४)   प्रताप वृत्तपत्र - 

The Animals Around us | Online Test | Standard One | Environmental Studies

 



Friday, February 12, 2021

छत्रपती शिवाजी महाराज | शिवजयंती निमित्त संपूर्ण माहिती | १९ फेब्रुवारी


🚩छत्रपती शिवाजी महाराज 🚩


पूर्ण नाव : शिवाजी शहाजी भोसले.
जन्म : १९ फेब्रुवारी १६३०. 

शिवनेरी किल्ल्यात शिवाजी राजांचा जन्म झाला. त्यांच्या आईचे नाव जिजाबाई व वडिलांचे नाव शहाजीराजे असे होते.

बालपण : शिवरायांची पहिली सहा वर्षे फार धावपळीत गेली. त्यांची आई त्यांना राम, कृष्ण, भीम, अभिमन्यू या शूरवीरांच्या कथा सांगे: तर कधी ज्ञानोबा, नामदेव, एकनाथ यांचे अभंग म्हणून दाखवत असे. शिवराय मावळ्यांबरोबर लपंडाव, चेंडू, भोवरा हे खेळ खेळत. जिजाबाई व शिवराय यांना शहाजीराजांनी बंगळूरास नेले. तिथे शिवरायांच्या शिक्षणाची व्यवस्था केली. घोड्यावर बसणे, कुस्ती खेळणे, दांडपट्टा फिरवणे, तलवार चालवणे याचे शिक्षण घेऊन ते तरबेज झाले. पुण्याला आल्यानंतर दादाजींनी त्यांना घोडदौड. तिरंदाजी, कुस्ती खेळणे तसेच लोकांना आपलेसे करणे, न्याय देणे. या गोष्टीही शिकविल्या. वयांच्या चौदाव्या वर्षी फलटणच्या नाईक-निंबाळकरांची कन्या सईबाई हिच्याशी त्यांचा विवाह लाल महालात संपन्न झाला.

 कार्य : १६४५ मध्ये त्यांनी आपल्या सर्वगड्यांसह रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्यस्थापनेची शपथ वाहिली. शिवरायांनी स्वतंत्र संस्कृत भाषेत करून घेतली. ती राजमुद्रा अशी होती. 
राजमुद्रा


प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता । शाहसुनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते ।।

किल्ल्यांशिवाय कसले आहे स्वराज्य । ज्यांचे किल्ले त्यांचे राज्य । या विचारांनी त्यांनी तोरणा जिंकून स्वराज्याचे तोरण बांधावयाचे, असे ठरविले. नंतर त्यांनी तोरणा किल्ल्यास प्रचंडगड असे नाव दिले. शिवरायांचा बंदोबस्तासाठी आदिलशहाने अफजलखानाला

पाठविले. अफझलखान कपटी आहे हे शिवराय जाणून होते. त्यासाठी लढाई न करता प्रत्यक्ष भेट करण्याचे ठरविले व त्या भेटीत त्यांनी अफजलखानाचा वध केला. या वधामुळे चिडून आदिलशहाने सिदी जौहरला शिवरायांशी लढण्यास पाठविले. त्याने राजांना पन्हाळगडात कोंडले; परंतु छत्रपती शिवराय तेथूनही निसटले. या कामी त्यांना बाजीप्रभू देशपांडे यांनी मदत केली. त्यानंतर लाल महालात कपटाने आलेल्या शायिस्तेखानाची बोटे कापून त्याची फजिती केली; तो दिवस होता, ५ एप्रिल १६६३. पुरंदरच्या तहानंतर ते औरंगजेबास भेटण्या- साठी आगऱ्याला गेले परंतु बादशहाने त्यांना नजरकैद केले. तेव्हा राजे युक्तीने पेटान्यातून १६६६ मध्ये पसार झाले.

मुघलांच्या ताब्यातील कोंढाणा हा मजबूत किल्ला स्वराज्यात असावा, असे जिजाबाईसह शिवरायांना वाटत असे. त्यासाठी त्यांनी तानाजी मालुसरेना पाठविले; परंतु लढता लढता तानाजी मरण पावले. तेव्हा शिवराय म्हणाले, 'गड आला, पण सिंह गेला म्हणून त्या किल्ल्याला सिंहगड हे नाव दिले व नंतर तानाजीच्या गावी जाऊन रायबाचे लग्न केले.

स्वराज्य निर्माण झाले हे जगाला कळावे म्हणून त्यांनी स्वत:ला राज्याभिषेक करून घेण्याचे ठरविले. काशीपंडित गागाभट्ट यांनी पौरोहित्य केले. शिवरायांचा राज्याभिषेक १६७४ मध्ये झाला. त्यांनी आपल्या प्रजेवर मातेसारखी माया केली. साधुसंत, मातापिता या सर्वांचा आदर कैला, फितुरांना कडक शासन केले. 'सजन्नांना राखावे. दुर्जनांना ठेचावे हा शिवरायांचा बाणा होता. ते सर्व धर्मांचा आदर करत.

शिवरायांचे रूप : आदर्श पुत्र, सावध नेता, हिकमती लढवय्या. दुर्जनांचा कर्दनकाळ आणि सज्जनांचा कैवारी असे त्यांच्या गुणांचे पैलू आहेत. अशा या महान राजाला शतशः प्रणाम !

मृत्यू : अशा या थोर राजाचा मृत्यू १६८० मध्ये झाला.



Thursday, February 11, 2021

Animals Around us | All Questions and Answers | Environmental studies | Standard One

 


Animals Around us 

 All Questions and Answers 
Environmental studies 
Standard One


--------------------------------------------------------------------------------------

Q.1) Draw a line Across the wrong word :

1) Animals have two / four legs.
Ans:- four
2) Birds have six / two legs.
Ans:- two
3) Insects have four / six legs.
Ans:- six
4) Snakes crawls / walks on the ground.
Ans:- crawls
5) The fish has fins / wings.
Ans:- fins
------------------------------------------------

Q.2) Fill in the blanks with suitable words from the brackets :

( grass, insects, long, horns, wild )

1) ________animals live in the forests.
Answer:- Wild

2) Elephants and deer are _________eating animals.               
Answer:- Grass

3) The giraffe has a ________neck.                                             
Answer:- Long

4) The buffalo has two _________.                                                
Answer:- Horns

5) The butterfly is an __________.                                                   
Answer:- Insects

-----------------------------------------------

Q.3) Underline the wrong word in the sentence and write the correct word :

1) The Lizard has a long tail.
Ans:- short

2) The frog has a beak.
Ans:- bird

3) The giraffe is a domestic animal.
Ans:- wild

4) The cat is an insect.
Ans:- animal

5) The reptiles walk on the ground.
Ans:- crawls

-------------------------------------------

Q.4) Answer in single sentence:

1) What does the camel have on its back?
Ans:- Camel have 'Hump' on its back.

2) Which creatures has scales ?
Ans:- fish has scales on its body.

3) Which creature has no legs?
Ans:- snake has no legs .

4) Which animal has a trunk ?
Ans:- The Elephant has a trunk.

----------------------------------------------

Q.5) Who am I ? 

1) I give eggs.
Ans:- Hen

2) I am a faithful animal.
Ans:- Dog

3) I pull carriages.
Ans:- Ox

4) I give wool.
Ans:- Sheep

5) I give milk.
Ans:- Cow, Buffalo

----------------------------------------------

Q.6) Write 'Yes' or 'No' for each sentence :

1) Domestic Animals live in the forest.
Ans:- No

2) The ant is bigger than tortoise.
Ans:- No

3) We must give domestic animals food and water on time.
Ans:- Yes

4) The cuckoo is a singing bird.
Ans:- Yes

5) The horse has two horns.
Ans:- No

6) We must keep homes of domestic animals clean.
Ans:- Yes

7) Domestic animals are kept as pets .
Ans:- Yes

8) Hen flies very high in the air .
Ans:- No

----------------------------------------------

Q.7) Write what are they :

1) cockroach, housefly, bee.
Ans:- Insects

2) snake, chameloan, lizard, earthworm.
Ans:- Reptiles

3) peacock, parrot, duck, hen.
Ans:- Birds

4) elephant, tiger, lion, giraffe.
Ans:- Wild animals

5) cow, goat, cat, bull.
Ans:- Domestic Animals

----------------------------------------------

Q.8) Match the following and write the answers from group 'B' :

Sr.No

Group ‘A’

Answers

Group ‘B’

1

Reptile

----------------------

a) peacock

2

Water creature

-----------------------

b) deer

3

Water and land creature

-----------------------

c) lizard

4

Bird

-----------------------

d) tortoise

5

Animal

-----------------------

e) fish


Ans:- 1-lizard, 2-fish, 3-tortoise, 4-peacock, 5-deer.

-----------------------------------------------

Q.9) Circle only the domestic animals from the list given below :


Lion

Cow

Frog

Tiger

Goat

Buffalo

Giraffe

Cockroach

Hen

Snake

Zebra

Sheep

Monkey

Elephant

Horse


-----------------------------------------------

Q.10) Look at picture of domestic animals and write their names below :


1) -----------------------


2)------------------------


3)------------------------------------


4)-----------------------



5)------------------------------------



6) ----------------------------------

Tuesday, February 2, 2021

शब्दसिद्धी ( शब्द तयार करणे ) | मराठी व्याकरण | उपसर्ग | प्रत्यय

 शब्दसिद्धी ( शब्द तयार करणे )

मराठी व्याकरण 

----------------------------------------------------------------------------------------------------


          शब्दाच्या आधी किंवा नंतर किंवा मध्ये एखादे 
अक्षर किंवा शब्द जोडल्यामुळे वेगवेगळे नवीन 
शब्द तयार होतात , त्याला शब्दसिद्धी 
( सिद्ध होणे म्हणजे तयार होणे ) म्हणतात.

नवीन शब्द तयार झाल्यामुळे शब्दसंपत्ती वाढते.

💢खालील शब्द कसे तयार झाले आहेत ते पहा:
१) बे + चव       =       बेचव
२) बे + दम       =      बेदम
३) बे + इमान   =      बेइमान

१) 'चव' या शब्दाआधी 'बे' हे अक्षर जोडल्यामुळे 
'बेचव' हा नवीन शब्द तयार झाला.
२) 'दम' या शब्दाआधी 'बे' हे अक्षर जोडल्यामुळे 
'बेदम' हा नवीन शब्द तयार झाला.
३) 'इमान' या शब्दाआधी 'बे' हे अक्षर जोडल्यामुळे 
'इमान' हा नवीन शब्द तयार झाला.

👉 मूळ शब्दाआधी जे अक्षर किंवा शब्द जोडला जातो , 
त्याला 'उपसर्ग' म्हणतात. म्हणून 'बे' हा उपसर्ग आहे.

------------------------------------------------------------


------------------------------------------------------------
💢खालील शब्द कसे तयार झाले आहेत ते पहा: 
१) चव + दार             =       चवदार
२) दम + दार            =       दमदार
१) इमान + दार        =       इमानदार

१) 'चव' या शब्दानंतर 'दार' हा शब्द जोडल्यामुळे, 
'चवदार' हा नवीन शब्द तयार झाला.
२) 'दम' या शब्दानंतर 'दार' हा शब्द जोडल्यामुळे, 
'दमदार' हा नवीन शब्द तयार झाला.
२) 'इमान' या शब्दानंतर 'दार' हा शब्द जोडल्यामुळे, 
'इमानदार' हा नवीन शब्द तयार झाला.

👉 मूळ शब्दानंतर जे अक्षर किंवा शब्द जोडला जातो,
त्याला 'प्रत्यय' म्हणतात ; म्हणून 'दार' हा प्रत्यय आहे .
---------------------------------------------------------------

👉 अशा प्रकारे शब्दाच्या आधी किंवा नंतर किंवा मध्ये एखादे अक्षर किंवा शब्द जोडल्यामुळे वेगवेगळे नवीन शब्द तयार होतात, त्याला शब्दसिद्धी ( सिद्ध होणे म्हणजे तयार होणे ) म्हणतात.
असे वेगवेगळे नवीन शब्द तयार झाल्यामुळे भाषेतील शब्दसंपत्ती वाढते. 

---------------------------------------------------------------


💥स्वाध्याय💥

∎ १) जसे - 'चूक' या शब्दाच्या आधी 'अ' हे अक्षर जोडल्यामुळे , 'अचूक' शब्द तयार झाला आहे. 
       [ अ+ चूक = अचूक ]
       तसे-
१) अ+ पूर्ण       =-------------
२) अ+ योग्य    =-------------
३) अ+ पुरा       =-------------
४) अ+ मोल     =-------------
५) अ+ सत्य     =-------------

∎ २) जसे - पास - नापास,
        तसे-
१) खूश             =-------------
२) पीक            =-------------
३) पसंत           =-------------
४) लायक         =-------------
५) इलाज          =-------------

∎ ३) जसे - पीक - सुपीक,
        तसे-
१) मन               =-------------
२) वर्ण               =-------------
३) यश               =-------------
४) दिन              =-------------
५) वास              =-------------

∎ ४) जसे - सोय - गैरसोय,
        तसे-
१) वर्तन               =-------------
२) शिस्त             =-------------
३) समज             =-------------
४) प्रकार             =-------------
५) मार्ग               =-------------

∎ ५) जसे - चित्र - विचित्र,
        तसे-
१) ज्ञान               =-------------
२) मुक्त               =-------------
३) श्वास             =-------------
४) मान              =-------------
५) भाग              =-------------

∎ ६) जसे - घरातली - घरातील,
        तसे-
१) टोपलीतली     =-------------
२) गावातली        =-------------
३) मनातली        =-------------
४) पाण्यातली     =-------------
५) पोटातली        =-------------

Most Important Contraction List

Most Important Contraction List Are not –> aren’t Can not –> can’t Could not –> couldn’t Did not –> didn’t Do not –> don’t Do...