·
चला वाक्य वाचू
अजय उठ.अंघोळ कर.
· सरला चहा कर.सर्वांना चहा दे.
· रमण बाजारातून भाजीपाला आण.
· आपले घर नीटनेटके ठेवावे.
· शाळेची तयारी करून मुले निघाली.
· मैदानावर मुले लंगडी खेळत आहेत.
· दौलत झाडावर चढला.
· हात धुवा.जेवण करा.
· कुमारने आवडीचे खेळणे विकत घेतले.
· मोठ्यांचा नेहमी आदर करावा.
· गुलाबाला छान फुलं आली.
· श्याम अभ्यास कर.
· देवाला हात जोडून नमस्कार करावा.
· पावसाळा सुरु झाला.शेतीच्या कामांना सुरुवात झाली.
· आनंद हुशार मुलगा आहे.
· दैव देते कर्म नेते.
· नियमित अभ्यास करावा.यश निश्चित मिळते.
· नेहमी खरे बोलावे.
· गर्वाचे घर नेहमी खाली असते.
· उत्तम चारित्र्य हाच खरा दागिना आहे.
· मनस्वी मधुर आवाजात गायन करते.
· सर्व विद्यार्थी नियमित शाळेत येतात.
No comments:
Post a Comment