Thursday, March 25, 2021
Saturday, March 20, 2021
Good Habits | School Project For Standard 1st To 5th
Good Habits
School Project For Standard 1st To 5th
Friday, March 19, 2021
विरुद्धार्थी शब्द | सर्व इयत्तांसाठी उपयुक्त | मराठी व्याकरण
💥विरुध्दार्थी शब्द💥
१) ‘अ’ हा उपसर्ग लागून तयार झालेले विरूद्धार्थी शब्द :
कुशल X अकुशल
चल X अचल
तुलनीय X अतुलनीय
दृश X अदृश
नियमित X अनियमित
नित्य X अनित्य
नियंत्रित X अनियंत्रित
निश्चित X अनिश्चित
नीती X अनीती
न्याय X अन्याय
पराजित X अपराजित
परिचित X अपरिचित
पवित्र X अपवित्र
पारदर्शक X अपारदर्शक
पूर्ण X अपूर्ण
पूर्णांक X अपूर्णांक
प्रकट X अप्रकट
प्रत्यक्ष X अप्रत्यक्ष
प्रमाण X अप्रमाण
प्रसन्न X अप्रसन्न
प्रशस्त X अप्रशस्त
प्रसिद्ध X अप्रसिद्ध
प्रामाणिक X अप्रामाणिक
प्रिय X अप्रिय
मर्यादित X अमर्यादित
मूर्त X अमूर्त
यशस्वी X अयशस्वी
योग्य X अयोग्य
लिखित X अलिखित
लौकिक X अलौकिक
रसिक X अरसिक
रुंद X अरुंद
विकारी X अविकारी
विचारी X अविचारी
विभक्त X अविभक्त
विवाहित X अविवाहित
विवेकी X अविवेकी
विस्मरणीय X अविस्मरणीय
विश्वास X अविश्वास
वैध X अवैध
व्यवस्थित X अव्यवस्थित
शक्य X अशक्य
शाश्वत X अशाश्वत
शांत X अशांत
शुद्ध X अशुद्ध
शुभ X अशुभ
सभ्य X असभ्य
समंजस X असमंजस
समान X असमान
समाधान X असमाधान
सफल X असफल
समर्थ X असमर्थ
सहकार X असहकार
सत्य X असत्य
साध्य X असाध्य
सामान्य X असामान्य
साधारण X असाधारण
स्पृश्य X अस्पृश्य
सुर X असुर
सुरक्षित X असुरक्षित
संतुष्ट X असंतुष्ट
संतोष X असंतोष
स्थिर X अस्थिर
स्पष्ट X अस्पष्ट
स्वच्छ X अस्वच्छ
स्वस्थ X अस्वस्थ
हिंसा X अहिंसा
ज्ञान X अज्ञान
ज्ञात X अज्ञात
क्षय X अक्षय
क्षम्य X अक्षम्य
ज्ञानी X अज्ञानी
२) ‘अन्' हा उपसर्ग लागून तयार झालेले विरूद्धार्थी शब्द :
अनुभवी X अननुभवी
अपेक्षित X अनपेक्षित
अवधान X अनवधान
आवश्यक X अनावश्यक
आदर X अनादर
आरोग्य X अनारोग्य
आवृत X अनावृत
आसक्त X अनासक्त
आस्था X अनास्था
इच्छा X अनिच्छा
उत्तीर्ण X अनुत्तीर्ण
उदार X अनुदार
औरस अनौरस
३) ‘ना’ हा उपसर्ग लागून तयार झालेले विरूद्धार्थी शब्द :
कबूल X नाकाबूल
खुश X नाखूश,नाराज
पसंत X नापसंत
आवड X नावड
आवडता X नावडता
पास X नापास
बाद X नाबाद
मर्द X नामर्द
राजी X नाराजी
लायक X नालायक
इलाज X नाइलाज
४) ‘नि’, ‘नि:’,व ‘दु:’ हे उपसर्ग लागून तयार झालेले विरूद्धार्थी शब्द :
रोगी X निरोगी
संदिग्ध X नि:संदिग्ध
स्वार्थी X नि:स्वार्थी
पापी X निष्पापी
अपराधी X निरपराधी
आधार X निराधार
आशा X निराशा
उपाय X निरुपाय
उपयोगी X निरूपयोगी
उपद्रवी X निरूपद्रवी
उत्साही X निरुत्साही
लोभी X निर्लोभी
व्यसनी X निर्व्यसनी
धनवान X निर्धन
लक्ष X दुर्लक्ष
५) ‘गैर’, ‘बे’, ‘बिन’, ‘अव’,हे उपसर्ग लागून तयार झालेले विरूद्धार्थी शब्द :
लागू X गैरलागू
समज X गैरसमज
सोय X गैरसोय
हजर X गैरहजर
शिस्त X गैरशिस्त
शिस्त X बेशिस्त
जबाबदार X बेजबाबदार
कायदेशीर X बेकायदेशीर
सावध X बेसावध
सुरेल X बेसूर
हिशेबी X बेहिशेबी
इमानी X बेइमान
पगारी X बिनपगारी
चूक X बिनचूक
कृपा X अवकृपा
गुण X अवगुण
गुणी X अवगुणी
मान X अवमान
६) वेगवेगळे उपसर्ग लागून तयार झालेले विरूद्धार्थी शब्द :
सचेतन X अचेतन
सबला X अबला
सकर्मक X अकर्मक
सलग X अलग
सशक्त X अशक्त
सत्पात्र X अपात्र
सज्ञान X अज्ञान
सकारण X अकारण
सदाचार X अनाचार
सन्मान X अपमान
सुशिक्षित X अशिक्षित
सुसह्य X असह्य
सुस्थिर X अस्थिर
सुविचार X कुविचार
सुपुत्र X कुपुत्र
सुविख्यात X कुविख्यात
सुसंगती X कुसंगती
सुस्वरूप X कुरूप
सजीव X निर्जीव
सदय X निर्दय
सुसंगत X विसंगत
स्मरण X विस्मरण
सुसंवाद X विसंवाद
सुगम X दुर्गम
सुगंध X दुर्गंध
होकार X नकार
सद्गुण X दुर्गुण
सदबुद्धी X दुर्बुद्धी
सुबोध X दुर्बोध
सुरक्षित X असुरक्षित
सुलभ X दुर्लभ
सुदैवी X दुर्दैवी
सत्कृत्य X दुष्कृत्य
सुकर X दुष्कर
सुयश X अपयश
विजय X पराजय
सुकाळ X दुष्काळ
सुचिन्ह X दुश्चिन्ह
सुवार्ता X दुर्वार्ता
अतिवृष्टी X अनावृष्टि
अत्यावश्यक X अनावश्यक
उत्कर्ष X अपकर्ष
उत्कृष्ट X निकृष्ट
उपकार X अपकार
शुभशकुन X अपशकुन
स्वकीय X परकीय
स्वतंत्र X परतंत्र
स्वदेश X परदेश
स्वातंत्र्य X पारतंत्र्य
स्वाधीन X पराधीन
स्वावलंबी X परावलंबी
इहलौकिक X परलौकिक
उन्नती X अवनती
सुलक्षणी X अवलक्षणी
नशीबवान X कमनशिबी
आकर्षक X अनाकर्षक
७) अनियमित विरूद्धार्थी शब्द :
अनुरूप X विजोड
अमृत X विष
अलीकडे X पलीकडे
अर्थपूर्ण X निरर्थक
अध्ययन X अध्यापन
अटक X सुटका
अवघड X सोपे
आठवणे X विसरणे
आघाडी X पिछाडी
आशीर्वाद X शाप
आळशी X उद्योगी
आकाश X पाताळ
आत X बाहेर
आनंद X दु:ख
आरंभ X अखेर,शेवट
आसक्ती X विरक्ती
इकडे X तिकडे
उदय X अस्त
उत्कृष्ट X निकृष्ट
उद्घाटन X समारोप
उपकार X अपकार
उपयोगी X निरुपयोगी
उघड X गुप्त,बंद
उच्च X नीच
उताणा X पालथा
उद्धट X नम्र
उधळ्या X कंजूष
उष्ण X थंड,शीतल
उंच X ठेंगू,बुटका,सखोल
ऊन X सावली
उलटा X सुलटा
ओला X कोरडा ,सुका
अंधार X उजेड
कठीण X मऊ,कोमल
कडू X गोड
कच्चा X पक्का
कडक X नरम
कृष्ण X धवल
कृतज्ञ X कृतघ्न
कृत्रिम X नैसर्गिक
काळोख X प्रकाश
काळा X पांढरा,गोरा
कोवळे X जून ,राठ
कौतुक X निंदा
खरे X खोटे
खरेदी X विक्री
खिन्न X प्रसन्न ,आनंदी
खोल X उथळ
गच्च X सैल,विरळ
गतकाळ X भविष्यकाळ
गरीब X श्रीमंत
गिऱ्हाईक X विक्रेता
गुळगुळीत X खडबडीत,खरखरीत
गुरु X शिष्य
ग्रामीण X शहरी
ग्राह्य X त्याज्य
घट्ट X सैल
चपळ X मंद
चढण X उतरण
चांगले X वाईट
चूक X बरोबर
चोर X साव
जन्म X मृत्यू
जळणे X विझणे
जमा X खर्च
जलद X सावकाश
ज्येष्ठ X कनिष्ठ
टंचाई X विपुलता
टिकाऊ X कमकुवत
तरुण X म्हातारा
तारक X मारक
ताजे X शिळे
तिक्ष्ण X बोथट
तेजी X मंदी
तेजस्वी X तेजहीन
थोर X लहान
थोरला X धाकटा
दाट X विरळ
दिवस X रात्र
दीर्घ X ऱ्हस्व
दुरुस्त X नादुरुस्त
दुष्ट X सुष्ट
दूर X जवळ
देव X दैत्य ,दानव ,राक्षस
देशभक्त X देशद्रोही
दोष X गुण
धीट X भित्रा
धूर्त X भोळा,मूर्ख
नफा X तोटा
नवा X जुना
नम्रता X उद्धटपणा
नक्कल X अस्सल
नशीबवान X कमनशिबी
नाशवंत X अविनाशी
निर्भय X भित्रा
निर्मळ X मळका
न्यूनता X विपुलता
पहिला X शेवटचा
पक्का X कच्चा
प्रखर X सौम्य
प्रचंड X चिमुकले
प्रगती X अधोगती
पाप X पुण्य
पापी X पुण्यवान
प्राचीन X अर्वाचीन
प्रारंभ X अखेर,शेवट
पूर्व X पश्चिम
प्रेम X द्वेष
फुलणे X कोमेजणे
बरे X वाईट
बलाढ्य X किरकोळ
बलवान X दुर्बल
बिंब X प्रतिबिंब
बुद्धिमान X ढ,मठ्ठ,मूर्ख
बोलका X अबोल,मुका,मितभाषी
भरती X ओहोटी
भक्कम X कमकुवत
भव्य X चिमुकले
भाग्यवान X दुर्भागी,अभागी
मर्त्य X अमर
मंजुळ X कर्कश
मागचा X पुढचा
मान X अपमान
माथा X पायथा
मालक X नोकर
मित्र X शत्रू
मृत X जिवंत
मैत्री X दुष्मनी,वैर,शत्रुत्व
मोकळे X बंदिस्त
मृदु X टणक,कठीण
मंद X जलद
रडू X हसू
रागीट X प्रेमळ
राजमार्ग X आडमार्ग
राव X रंक
रोख X उधार
रुचकर X बेचव
लवकर X सावकाश
लघू X विशाल,गुरु
लाभ X तोटा,हानी
लांब X आखूड
वडीलार्जित X स्वकष्टार्जित
वर X खाली
वर X वधू
विक्षिप्त X समंजस
वैयक्तिक X सार्वजनिक
वृद्ध X तरुण
शहाणा X मूर्ख,खुळा,वेडा
शीघ्र X मंद
शाश्वत X नश्वर,अशाश्वत,क्षणभंगुर
शूर,धाडशी X भित्रा
शंका X खात्री
सरळ X वाकडे
समोर X मागे
सज्जन X दुर्जन
सवाल X जवाब
सनातनी X सुधारक
सरळ X वाकडा
संशय X खात्री
स्तुती X निंदा
स्वस्त X महाग
साम्य X भेद
सुरुवात X शेवट
सुरेल X कर्कश ,भसाडा
सुख X दु:ख
सुंदर X कुरूप
सुबक X बेढब
सूर्योदय X सूर्यास्त
सौंदर्य X कुरूपता
स्तुती X निंदा
स्थूल X सूक्ष्म
स्वर्ग X नरक,पाताळ
हसणे X रडणे
हळू X जलद
हर्ष X खेद
हार X जीत
हुशार X मठ्ठ
जागतिक चिमणी दिवस 20 मार्च
जागतिक चिमणी दिवस
भारतात सर्वात जास्त संख्या असणारा पक्षी म्हणून चिमणी (नर- चिमणा, मादी-चिमणी) परिचयाची आहे. नर चिमणीच्या कपाळाचा, शेपटीवरचा आणि पार्श्वभाग राखाडी, कानाजवळ पांढरा, चोच काळी, कंठ ते छातीच्या भागावर मोठा काळा भाग, डोक्यापासून खाली पोटाचा भाग पांढरा असून पाठीवर तपकिरी काळ्या तुटक रेषा असतात. मादी मातकट तपकिरी रंगाची असून तिच्या अंगावर काळ्या तपकिरी रंगाच्या तुटक रेषा असतात. तिची चोच फिकट तपकिरी रंगाची असते.तीला भारतात तपकीर असेही म्हटले जाते.
![]() | |
शास्त्रीय नाव | सिकोनिया सिकोनिया (Passer domesticus) |
---|---|
कुळ | (Passeridae) |
अन्य भाषांतील नावे | |
इंग्लिश | हाऊस स्पॅरो (House Sparrow) |
संस्कृत | चटक, वार्तिका, गृहनीड, पोतकी |

मुळ आढळ
नवा आढळ
हा पक्षी हिमालयाच्या २००० मी. उंचीपर्यंत, तसेच भारतभर सर्वत्र आढळतो . तसेच बांगलादेश, पाकिस्तान, श्रीलंका, म्यानमारसह इतरही देशांत आढळतो. भारतात काश्मिरी आणि वायव्यी अशा हिच्या किमान दोन उपजातीही आढळतात.
माणसाच्या अगदी जवळच राहणारा हा पक्षी असून कीटक, धान्य, मध, शिजवलेले अन्न असे सर्व प्रकारचे खाद्य खातो. विणीचा हंगाम वर्षभर असू शकणारा पक्षी अशी ओळखही या पक्ष्याची आहे. गवत, कापूस, पिसे, मिळतील त्या वस्तू वापरून घराचे छत, वळचणीच्या जागा, दिव्यांच्या मागे, झाडांवर असे कुठेही घरटे बांधतो. मादी फिकट हिरव्या पांढऱ्या रंगाची, त्यावर तपकिरी ठिपके असलेली ४ ते ५ अंडी देते. अंड्यांच्या रंगात स्थानिक बदलही आहेत. नर-मादी घरटे बांधण्यापासून, अंडी उबविणे, पिलांना खाऊ घालणे वगैरे सर्व कामे मिळून करतात. चिमण्यांचे आयुष्य सहा महिने ते तीन वर्षांपर्यंत असते. ज्ञात असलेली सर्वात वयस्कर वन्य चिमणी जवळपास दोन दशके जगली. त्याचबरोबर नोंद असलेली सर्वात वयस्कर कैदेतील चिमणी २३ वर्षे जगली.
चिमण्यांच्या बाबतीत अशी एक वदंता आहे की, एखाद्या चिमणीला माणसाने पकडले आणि परत सोडले, तर बाकीच्या चिमण्या त्या चिमणीला त्यांच्यामधे घेत नाहीत व चोचीने मारतात किंवा तिला बहिष्कृत करतात; प्रसंगी,जीव देखील घेतात.
अलीकडे वाढत्या शहरीकरणामुळे चिमण्यांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. विशेषत: शहरांमध्ये मोबाईल टॉवर्समधून होणारे विद्युत् चुंबकीय उत्सर्जन, आधुनिक प्रकारच्या घरबांधणी पद्धतीमुळे घरट्यांच्या जागांची अनुपलब्धता, अन्नाची अनुपलब्धता, शहरांमधील वाढते प्रदूषण तसेच शेतात होणारा रासायनिक खते व कीटकनाशक यांचा वापर यांसारख्या अनेक कारणांमुळे चिमण्यांची संख्या झपाट्याने कमी होत आहे.
२० मार्च हा दिवस दरवर्षी "जागतिक चिमणी" दिवस म्हणून पाळला जातो. हा दिवस त्यांच्या संख्येबद्दल लोकांमध्ये जागृती घडवून आणण्यासाठी साजरा केला जातो.या काळात चिमणीची संख्या कमी होत आहे.मोबाईलमधुन येणाऱ्या लहरीमुळे यांना हाणी होत आहे.
रान चिमणी
शहरी भागात फारशी न आढळणारी चिमणी म्हणजे पीतकंठ चिमणी. याच चिमणीला रान चिमणी म्हणतात. ही चिमणी प्रामुख्याने नाशिक शहराबाहेरील जंगल परिसरात अढळते. विख्यात पक्षीतज्ज्ञ डॉ. सलीम अली यांना एकदा एक मृत चिमणी आढळली होती. त्यांनी तिला बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटीत नेऊन परीक्षण केले असता ती हाउस स्पॅरो नसल्याचा निष्कर्ष निघाला. या चिमणीच्या मानेजवळ एक पिवळा ठिपका असतो त्यामुळे या चिमणीला पीतकंठ म्हणतात तसेच ती रानात दिसून येते त्यामुळे तिला रान चिमणीही म्हणतात. ही चिमणी प्रामुख्याने हरसूल, पेठ, इगतपुरी या भागात आढळते. रान चिमणीही आता काहीअंशी कमी होत चालली आहे. याचे मुख्य कारण म्हणजे चिमणीची शिकार. रानावनात गलोरने चिमणीची शिकार केली जाते. रानावनातील नागरिकांमध्ये पक्ष्यांबद्दल असलेले अज्ञान, तसेच काही ठिकाणी अशा पक्ष्यांचा अन्न म्हणूनही वापर केला जातो. त्यामुळे चिमण्यांना पारध केले जात असल्याने अशा चिमण्याही कमी होत चालल्या आहेत. नेचर कॉन्झर्वेशन सोसायटी आणि वनविभागाच्या ग्रामीण भागात यासंदर्भात जनजागृतीचे गेल्या सात ते आठ वर्षांपासून काम सुरू आहे.
नर चिमणी
या चिमणीचे डोके राखाडी रंगाचे असते. तसेच तिचा गळा व डोळ्याभोवती काळा रंग असतो. ही चिमणी अंगाने भक्कम असते.
मादी चिमणी
ही चिमणी भुरकट राखाडी रंगाची असते. साधारणत: ताठ आणि सडपातळ बांधा या चिमणीचा बघायला मिळतो. चिमणीचा विणीचा हंगाम हा वर्षभर असतो.
Most Important Contraction List
Most Important Contraction List Are not –> aren’t Can not –> can’t Could not –> couldn’t Did not –> didn’t Do not –> don’t Do...

-
इंग्रजीमध्ये प्रश्न कसे विचारावेत ? कोणतीही भाषा शिकताना वा कोणतेही ज्ञान संपादन करताना प्रश्नांना विशेष महत्व असते. तुम्ही...
-
पाठ २४. थोर हुतात्मे संपूर्ण प्रश्नोत्तरे -------------------------- प्र.१ ) एका वाक्यात उत्तरे लिहा : १) लाहोरच्या तुरुंगातले तीन ...