Monday, March 15, 2021
Friday, March 12, 2021
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक | आपले नेते
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक
संपूर्ण नाव : केशव (बाळ) गंगाधर टिळक
रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली गावी टिळकांचा जन्म झाला.
बालपण : खूप दिवसांनी घरात जन्माला आलेला मुलगा म्हणून
शिक्षण : टिळकांनी मोठ्या मेहनतीने बी. ए.. एल. एल. बी. ची पदवी मिळवली.
ग्रंथ-लेखन : टिळकांनी 'गीता रहस्य' हा ग्रंथ लिहिला.
देशकार्य-समाजसेवा : उच्च शिक्षण पूर्ण केल्यानंतर पुणे
जनता, राष्ट्रप्रेम, राष्ट्रभक्तीने प्रेरित होऊन ब्रिटिश सत्तेच्या
स्वातंत्र्य लढ्यामधील त्यांच्या सहभागामुळे अनेक
चिखलात कमळ उगवावे आणि त्यांचा सुगंध सगळीकडे पसरावा,
मृत्यू : 'भारतीय तरुणांनो, उद्या मी नसेन: तरीही देशाला स्वातंत्र्य मिळवून
Wednesday, March 10, 2021
शब्दसिद्धी - तत्सम आणि तत्भव शब्द
शब्दसिद्धी - तत्सम आणि तत्भव शब्द
- मराठी भाषेत वापरण्यात येत असलेली सर्वच शब्द मूळ मराठी भाषेमधील नाहीत.
- मराठी भाषेत संस्कृत (तत्सम), पाकृत (तत्भव) इत्यादी भाषेतील शब्दांचा मोठ्या प्रमाणात
- समावेश आढळतो. नंतरच्या काळात मराठी भाषेचा संबंध अरबी, फारसी, हिंदी, कन्नड,
- पोर्तुगाल, इंग्रज अशा अनेक लोकांशी आला. त्यामुळे त्या भाषेतील शब्दांचा सुद्धा मराठी
- भाषेत प्रवेश झाला. मराठी भाषेतील काही शब्द इतर भाषेच्या अपभ्रंशामधून आलेली आहेत.
- आज आपल्या भाषेत जो शब्दसंग्रह आहे. त्यावरून शब्दाचे खालील प्रकार पडतात. शब्द
- कसा तयार झाला आहे, म्हणजे सिद्ध कसा झाला आहे यालाच 'शब्दसिद्धी' असे म्हणतात.
- -: तत्सम शब्द :-
जे संस्कृत शब्द मराठी भाषेत जसेच्या तसे काहीही बादल न होता आले आहेत त्यांना ‘तत्सम शब्द’ असे म्हणतात.
- उदा.
- राजा, भूगोल, चंचू, पुष्प, परंतु, भगवान, कर, पशु, अंध, जल, दीप, पृथ्वी, तथापि, कवि, वायु, भीती, पुत्र, अधापि, मति, पुरुष, शिशु, गुरु, मधु, गंध, पिता, कन्या, वृक्ष, धर्म, सत्कार, समर्थन, उत्सव, विद्वान, संत, निस्तेज, कर, जगन्नाथ, दर्शन, उमेश, स्वामि, मंदिर, तिथी, सूर्य, स्वल्प, घृणा, पिंड, कलश, प्रात:क, दंड, पत्र, ग्रंथ, उत्तम, आकाश पाप, मंत्र, शिखर, सूत्र, कार्य, होम, गणेश, सभ्य, कन्या, देवर्षि, वृद्ध, संसार, प्रीत्यर्थ, कविता, उपकार, परंतु, गायन, अश्रू, प्रसाद, अब्ज, राजा, संमती, घंटा, पुण्य, बुद्धी, अभिषेक, संगती, श्रद्धा, प्रकाश, सत्कार, देवालय, तारा, समर्थन, नयन, उत्सव, दुष्परिणाम, नैवेध.
- -: तदभव शब्द :-
उदा.
- घर, पाय, भाऊ, सासू, सासरा, गाव, दूध, घास, कोवळा, ओळ, काम, घाम, घडा, फुल, आसू, धुर, जुना, चाक, आग, धूळ, दिवा, पान, वीज, चामडे, तहान, अंजली, चोच, तण, माकड, अडाणी, उधोग, शेत, पाणी, पेटी, विनंती, ओंजळ, आंधळा, काय, धुर, पंख, ताक, कान, गाय.
- देशी/देशीज शब्द :
उदा.
- झाड, दगड, धोंडा, घोडा, डोळा, डोके, हाड, पोट, गुडघा, बोका, रेडा, बाजारी, वांगे, लुगडे, झोप, खुळा, चिमणी, ढेकूण, कंबर, पीठ, डोळा, मुलगा, लाजरा, वेढा, गार, लाकूड, ओटी, वेडा, अबोला, लूट, अंघोळ, उडी, शेतकरी, आजार, रोग, ओढा, चोर, वारकरी, मळकट, धड, ओटा, डोंगर.
- परभाषीय शब्द :
1. तुर्की शब्द
- कालगी, बंदूक, कजाग
2. इंग्रजी शब्द
- टी.व्ही., डॉक्टर, कोर्ट, पेन, पार्सल, सायकल, स्टेशन, हॉस्पिटल, बस, फाईल, रेल्वे, पास, ब्रेक, कप, मास्तर, फी, बॉल, स्टॉप, ऑफिस, एजंट, टेलिफोन, सिनेमा, सर्कस, पॅंट, बॅट, पोस्ट, तिकीट, ड्रायव्हर, मोटर, कंडक्टर, नंबर, टीचर, सर, मॅडम, पेपर, नर्स, पेशंट, इंजेक्शन, बटन ड्रेस, ग्लास, इत्यादी.
3. पोर्तुगीज शब्द
- बटाटा, तंभाखू, पगार, बिजागरी, कोबी, हापूस, फणस, घमेले, पायरी, लोणचे, मेज, चावी, तुरुंग, तिजोरी, काडतुस.
4. फारशी शब्द
- रवाना, समान, हकीकत, अत्तर, अब्रू, पेशवा, पोशाख, सौदागार, कामगार, गुन्हेगार, फडवणीस, बाम, लेजीम, शाई, गरीब, खानेसुमारी, हजार, शाहीर, मोहोर, सरकार, महिना हप्ता.
5. अरबी शब्द
- अर्ज, इनाम, हुकूम, मेहनत, जाहीर, मंजूर, शाहीर, साहेब, मालक, मौताज, नक्कल, जबाब, उर्फ, पैज, मजबूत, शहर, नजर, खर्च, मनोरा, वाद, मदत, बदल.
6. कानडी शब्द
- हंडा, भांडे, अक्का, गाजर, भाकरी, अण्णा, पिशवी, खोली, बांगडी, लवंग, अडकित्ता, चाकरी, पापड, खलबत्ता, किल्ली, तूप, चिंधी, गुढी, विळी, आई, रजई, तंदूर, चिंच, खोबरे, कणीक, चिमटा, नथ, तांब्या, उडीद, पाट, गाल, काका, टाळू, गादी, खिडकी, गच्ची, बांबू, ताई, गुंडी, कांबळे.
7. गुजराती शब्द
- सदरा, दलाल, ढोकळा, घी, डबा, दादर, रिकामटेकडा, इजा, शेट.
8. हिन्दी शब्द
- बच्चा, बात, भाई, दिल, दाम, करोड, बेटा, मिलाप, तपास, और, नानी, मंजूर, इमली.
9. तेलगू शब्द
- ताळा, अनरसा, किडूकमिडूक, शिकेकाई, बंडी, डबी.
10. तामिळ शब्द
- चिल्ली, पिल्ली, सार, मठ्ठा.
- सिद्ध व सधीत शब्द :
1. सिद्ध शब्द
उदा.
- ये, जा, खा, पी, बस, उठ, कर, गा इत्यादी.
सिद्ध शब्दांचे 3 प्रकार पडतात.
- तत्सम
- तदभव
- देशी (यांचा अभ्यास आपण यापूर्वी केला आहे.)
2) साधीत शब्द
साधित शब्दांचे पुढील 4 प्रकार पडतात
- उपसर्गघटित
- प्रत्ययघटित
- अभ्यस्त
- सामासिक
1. उपसर्गघटित शब्द
उदा.
- अनुभव, अपयश, अधिकार, अवगुण अधिपती, उपहार, आकार, साकार, प्रतिकार, प्रकार इ.
वरील शब्दांमध्ये अनु. अप, अधि, अव, अधि, उप, आ, सा, प्रति,प्रइ. उपसर्ग लागलेली आपल्याला दिसतात. असे उपसर्ग लागून तयार होणार्या शब्दांना उपसर्ग घटित शब्द असे म्हणतात.
2. प्रत्ययघटित शब्द
उदा.
- जनन, जनक, जननी, जनता इ.
वरील शब्दांना न,क, नी ता ही प्रत्यय लागलेली आपल्याला दिसतात असे प्रत्यय लावून तयार होणार्या शब्दांना ‘प्रत्ययघटित शब्द’ असे म्हणतात.
3. अभ्यस्त शब्द
उदा.
- आतल्या आत, शेजरीपाजारी, किरकिर इ.
अभ्यस्त शब्दांचे खलील 3 प्रकार पडतात.
i) पूर्णाभ्यस्त
ii) अंशाभ्यस्त
iii) अनुकरणवाचक
i) पूर्णाभ्यस्त शब्द
- एक पूर्ण शब्द जेव्हा पुन्हा येऊन जोडशब्द तयार होतो त्याला पूर्णाभ्यस्त शब्द असे म्हणतात.
- उदा. बारीक बारीक, कळाकाळा, आतल्या आत, हळहळ, वटवट, कळकळ, मळमळ, बडबड, समोरासमोर, हळूहळू, पुढेपुढे, पैसाच पैसा, मजाच मजा, हिरवेहिरवे इ.
ii) अंशाभ्यस्त शब्द
- जेव्हा पूर्ण शब्द हा जोडशब्दात जशाच्या तसा पुन्हा येतो एखादे अक्षर बदलून येतो तेव्हा त्या जोडशब्दांना अंशाभ्यस्त शब्द असे म्हणतात.
- उदा. अदलाबदल, उलटसुलटा, शेजारीपाजारी, बारीकसारीक, लाडीगोडी, सोक्षमोक्ष, जिकडेतिकडे, गोडधोड, गडबड, जाळपोळ, दगडबिगड, किडूकमिडूक, घरबीर इ.
iii) अनुकरणवाचक शब्द
- ज्या शब्दांमध्ये एखाधा ध्वनिवाचक शब्दांची पुनरावृत्ती झालेली असते, अशा शब्दांना अनुकरणवाचक/नादानुकारी शब्द असे म्हणतात.
- उदा. किरकिर, खडखडाट, रिमझिम, गुणगुण, घणघण, कडकडाट, टिकटिक, गडगड इ.
4. सामासिक शब्द
उदा.
- पोळपाट, देवघर, दारोदार इ.
जोडशब्द | वाचन साहित्य
जोडशब्द
Tuesday, March 9, 2021
Online Test ( Unit 4) English | Standard 4
Online Test ( Unit 4) English | Standard 4
Most Important Contraction List
Most Important Contraction List Are not –> aren’t Can not –> can’t Could not –> couldn’t Did not –> didn’t Do not –> don’t Do...

-
इंग्रजीमध्ये प्रश्न कसे विचारावेत ? कोणतीही भाषा शिकताना वा कोणतेही ज्ञान संपादन करताना प्रश्नांना विशेष महत्व असते. तुम्ही...
-
पाठ २४. थोर हुतात्मे संपूर्ण प्रश्नोत्तरे -------------------------- प्र.१ ) एका वाक्यात उत्तरे लिहा : १) लाहोरच्या तुरुंगातले तीन ...