Friday, March 5, 2021

मराठीतील सर्व उपयुक्त म्हणी | मराठी शब्दसंपत्ती | Proverbs In Marathi


मराठीतील सर्व म्हणी

1अगं अगं म्हशी मला कोठे नेशीस्वत:ची चूक मान्य करण्याऐवजी त्यासाठी इतरांवर दोष ठेवणे.
2आपला हात जगन्नाथआपली प्रगती आपल्या कर्तृत्वावर अवलंबून असते.
3अति तेथे मातीकोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईटच असतो.
4आयत्या बिळात नागोबादुसर्‍याने स्वत:साठी केलेल्या गोष्टीचा आयता फायदा उठविणे.
5आईजीच्या जीवावर बाईजी उदारदुसर्‍याचा पैसा खर्च करून औदार्य दाखविणे.
6आपल्याच पोळीवर तूप ओढणेफक्त स्वत:चाच तेवढा फायदा साधून घेणे.
7आंधळे दळते कुत्रं पीठ खातेएकानं काम करावं आणि दुसर्‍यांनं त्याचा फायदा घ्यावा.
8आधी पोटोबा मग विठ्ठोबाआदी पोटाची सोय पाहावी नंतर देवधर्म करावा.
9अडला हरी गाढवाचे पाय धरीएखाद्या हुशार माणसाला देखील अडचणीच्या वेळी मूर्ख माणसाची विनवणी करावी लागते.
10आंधळा मागतो एक डोळा, देव देतो दोन डोळेअपेक्षेपेक्षा जास्त फायदा होणे.
11अति शहाणा त्याचा बैल रिकामाजो माणूस फार शहाणपणा करायला जातो. त्याचे मुळीच काम होत नाही.
12आधी शिदोरी मग जेजूरीआधी भोजन मग देवपूजा
13असतील शिते तर जमतील भुतेएखाद्या माणसाकडून फायदा होणार असला की त्याच्या भोवती माणसे गोळा होतात.
14आचार भ्रष्टी सदा कष्टीज्याचे आचार विचार चांगले नसतात. तो नेहमी दु:खी असतो.
15आठ हात लाकूड अन नऊ हात ढिपलीअत्यंत मूर्खपणाची अतिशयोक्ती.
16आईचा काळ बायकोचा मवाळआईकडे दुर्लक्ष करून बायकोची काळजी घेणारा
17आधीच उल्हास त्यात फाल्गुन मासमुळातच आळशी माणसाच्या आळशी वृत्तीला पोषक अवस्था निर्माण होणे.
18आपलेच दात आपलेच ओठआपल्याच माणसाने चूक केल्यावर अडचणीचे स्थिती निर्माण होणे.
19अंथरूण पाहून पाय पसरावेआपल्या ऐपतीप्रमाणे खर्च ठेवावा.
20आवळा देऊन कोहळा काढणेक्षुल्लक गोष्टीचा मोबदल्यात मोठा लाभ करून घेणे.
21आलीया भोगाशी असावे सादरकुरकुर न करता निर्माण झालेली परिस्थिती स्वीकारणे.
22अचाट खाणे मसणात जाणेखाण्यापिण्यात अतिरके झाल्यास परिणाम वाईट होतो.
23आधी बुद्धी जाते नंतर लक्ष्मी जातेअगोदर आचरण बिघडते नंतर दशा बदलते.
24आपण हसे लोकाला, शेंबूड आपल्या नाकालाज्या दोषाबद्दल आपण दुसर्‍याला हसतो. तोच दोष आपल्या अंगी असणे.
25आपला तो बाब्या दुसर्‍याचं ते कारटंस्वत:चे चांगले आणि दुसर्‍यांचे वाईट अशी प्रवृत्ती असणे.
26अळी मिळी गुप चिळीरहस्य उघडकीला येऊ नये म्हणून सर्वांनी मूग गिळून बसणे.
27अहो रूपम अहो ध्वनीएकमेकांच्या मर्यादा न दाखवता उलटपक्षी खोटी स्तुती करणे.
28इच्छा तेथे मार्गएखादी गोष्ट करण्याची इच्छा असेल तर काहीतरी मार्ग निघतोच.
29इकडे आड तिकडे विहीरदोन्ही बाजूंनी अडचणीची परिस्थिती असणे.
30उठता लाथ बसता बुकीप्रत्येक कृत्याबद्दल अद्दल घडविण्यासाठी पुन्हा पुन्हा शिक्षा करणे.
31उडत्या पाखरची पिसे मोजणेअगदी सहजपणे अवघड गोष्टीची परीक्षा करणे.
32उधारीचे पोते सव्वाहात रितेउधारी घेतलेल्या गोष्टीत तोटा ठरलेलाच असतो.
33उंदराला मांजर साक्षवाईट कृत्य करतांना एकमेकांना साक्ष देणे.
34उचलली जीभ लावली टाळ्यालाविचार न करता बोलणे.
35उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंगप्रसंगी हास्यास्पद ठरेल आशा प्रकराच्या उतावळेपणा दाखविणे.
36उथळ पाण्याला खळखळाट फारथोडासा गुण अंगी असणारा माणूस जास्त बढाई मरतो.
37उस गोड लागला म्हणून मुळासकट खाऊ नयेकोणत्याही चांगल्या गोष्टीचा किंवा एखाद्याच्या चांगुलपणाचा प्रमाणाबाहेर फायदा घेऊ नये.
38एक ना घड भारभर चिंध्याएकाच वेळी अनेक कामे करायला घेतल्यावर सर्वच कामे अर्थवट होण्याची अवस्था.
39एका माळेचे मणीसगळीच माणसे सारख्या स्वभावाची.
40एका हाताने टाळी वाजत नाहीदोघांच्या भांडणात पूर्णपणे एकट्यालाच दोष देता येत नाही किंवा एखाद्या कृत्यात दोघेही दोषी असणे.
41ऐकावे जनाचे करावे मनाचेलोकांचे ऐकून घ्यावे व मग आपल्याला जे योग्य वाटेल ते करावे.
42एका म्यानात दोन तलवारी राहू शकत नाहीतदोन तेजस्वी माणसे एकत्र गुण्यागोविदाने नांदू शकत नाहीत दोन सवती एका घरात सुखासमाधानाने राहू शकत नाहीत.
43ओळखीचा चोर जीवे न सोडीओळखीचा शत्रू हा अनोळखी शत्रूपेक्षा धोकादायक असतो.
44कर नाही त्याला डर कशालाज्याने काही गुन्हा किंवा वाईट गोष्ट केली नाही त्याने शिक्षा होण्याचे भय कशाला बाळगावयाचे
45कामापुरता मामा ताकापुरती आजीआपले काम करून घेईपर्यंत एखाद्याशी गोड बोलणे.
46काळ आला होता. पण वेळ आली नव्हतीनाश होण्याची वेळ आली असताना थोडक्यात बचावणे.
47कानामगून आली आणि तिखट झालीमागून येऊन वरचढ होणे.
48करावे तसे भरावेजसे कृत्य असेल त्याप्रमाणे चांगलेवाईट फळ भोगावे लागते.
49कधी गाडीवर नाव तर कधी नावेवर गाडीकधी गरीबी तर कधी श्रीमंती येणे.
50कुर्‍हाडीचा दांडा गोतास काळआपलाच माणूस आपल्या नाशाला कारणीभूत होतो.
51काठी मारल्याने पानी दुभंगत नाही –रक्ताचे नाते तोडून म्हणता तुटत नाही.
52कडू कारले तुपात तळले सारखरेत घोळले तरीही कडू ते कडूचकिती ही प्रयत्न केला तरीही माणसाचा मूळ स्वभाव (दूर्वर्तणी) बदलत नाही.
53कुडी तशी पुडीदेहाप्रमाणे आहार असतो.
54कधी तुपाशी तर कधी उपाशीसंसारिक स्थिती नेहमी सारखीच राहत नाही त्यात कधी संपन्नता येते तर कधी विपन्नावस्था येते.
55कावळा बसायला अन फांदी तुटायलापरस्परांशी कारण-संबंध नसताना योगायोगाने दोन गोष्टी एकाचवेळी घडणे.
56कुत्र्याचे शेपूट नळीत घातले तरी वाकडे ते वाकडेचकितीही प्रयत्न केले तरी काहीचा मूळस्वभाव बदलत नाही.
57कुंपणाने शेत खाल्ले तर दाद न्यावी कुणीकडेरखवालादारानेच विश्वासघात करून चोरी करणे.
58कोल्हा काकडीला राजीक्ष्रुद्र माणसे क्षुद्र गोष्टीनीही खुश होतात.
59कोरड्याबरोबर ओले ही जळतेनिरपराध्याची अपराध्यासोबत गणना करणे
60कोंबडे झाकले म्हणून तांबडे फुटायचे राहत नाहीनिश्चित घडणारी घटना कोणाच्याही प्रयत्नाने टाळता येत नाही.
61काखेत कळसा नि गावाला वळसाहरवलेली वस्तु जवळ असतानाही इतरत्र शोधत राहणे.
62कावळ्याच्या शापाने गाय मरत नाहीक्षुद्र माणसांनी केलेल्या दोषा रोपाने थोरांचे नुकसान होत नसते.
63खाण तशी मातीआई वडिलाप्रमाणे त्यांच्या मुलांचे वर्तन होणे.
64खर्‍याला मरण नाहीखरे कधी लपत नाही, सत्य मेव जयते!
65खाऊ जाणे ते पचवू जाणेएखादे कृत्य धाडसाने करणारा त्याचे परिणाम भोगण्यासही समर्थ असतो.
66खाईन तर तुपाशी नाहीतर उपाशीपरिस्थितीशी जुळवून न घेता हट्टीपणाने वागणारा.
67खाऊन माजवे टाकून माजू नयेपैशाच्या संपतीचा गैरवापर करू नये.
68खोट्याच्या कपाळी गोटावाईट कृत्य करणार्‍याला माणसाचे शेवटी वाईटच होते.
69गरजवंताला अक्कल नसतेगरजेमुळे अडलेल्या व्यक्तीला इतरांच्या म्हणण्यापुढे मान डोलवावी लागते.
70गर्वाचे घर खालीगर्विष्ठ माणसाची कधीतरी फजिती होतेच.
71गरज सरो नि वैध मरोआपले काम झाले की उपकार कर्त्याची पर्वा न करणे.
72गर्जेल तो पडेल कायकेवळ गाजावाजा करणार्‍या व्यक्तीच्या हातून फारसे काही घडत नसते.
73गाढवाला गुळाची चव काय?मुर्खाला चांगल्या गोष्टीची किंमत कळत नाही.
74गाढवांचा गोंधळ, लाथांचा सुकाळमूर्ख लोक एकत्र आल्यावर मूर्खपणाचेच कृत्य करणार
75गाव करी ते राव ना करीश्रीमंत व्यक्ति स्वत:च्या बळावर जे करू शकत नाही ते एकीच्या बळावर सामान्य माणसे करू शकतात.
76गाड्याबरोबर नळ्याची यात्रामोठ्यांच्या आश्रयाने लहानांचाही फायदा होतच असतो.
77गाढवापुढे वाचली गीता अन कालचा गोधळ बारा होतामूर्खाला केलेला उपदेश वाया जातो.
78गाजराची पुंगी वाजली तर वाजली नाही तर मोडून खालीएखादी गोष्ट साध्य झाली तर उत्तमच नाही तर तिचा दूसरा उपयोग करून घेणे.
79गाढवाच्या पाठीवर गोणीएखाद्या गोष्टीची अनूकुलता असून उपयोग नाही. तर तिचा फायदा घेता यायला हवा.
80गुरुची विद्या गुरूला फळलीएखाद्याचा डाव त्याच्यावरच उलटणे.
81गुळाचा गणपती गुळाचाच नैवेद्यज्याची वस्तु त्यालाच भेट देणे.
82गोगलगाय नि पोटात पायएखाद्याचे खरे स्वरूप न दिसणे.
83गोरागोमटा कपाळ करंटादिसायला देखणा पण नशिबाने दुर्दैवी व्यक्ती.
84घर ना दार देवळी बिर्‍हाडबायको पोरे नसणारा एकटा पुरुष किंवा शिरावर कोणतीही जाबाबदारी नसलेली व्यक्ती.
85घर फिरले म्हणजे घराचे वासेही फिरतातएखाद्यावर प्रतिकूल परिस्थिती आली म्हणजे सारेच त्याच्याबरोबर वाईटपणे वागू लागतात.
86घरचे झाले थोडे, व्याह्याने धाडले घोडेस्वत:च्या कामाचा व्याप अतोनात असताना दुसर्‍यांने आपलेही काम लादणे.
87घर पहावे बांधून लग्न पहावे करूनअनुभवाने माणूस शहाणा होतो.
88घटका पाणी पिते घड्याळ टोले खातेआपापल्या कर्मानुसार परिणाम भोगावे लागतात.
89घरोघरी मातीच्याच चुलीसर्वत्र सारखीच परिस्थिती अनुभवास येणे.
90घोडे खाई भाडेधंद्यात फायद्यापेक्षा खर्च जास्त.
91चढेल तो पडेलगर्विष्ठ माणसाचा गर्व उतरल्याशिवाय राहत नाही.
92चालत्या गाडीला खीळव्यवस्थीत चालणार्‍या कार्यात अडचण निर्माण होणे.
93चमत्काराशिवाय नमस्कार नाही, पराक्रमावाचून पोवाडा नाहीलोकांना काही विशेष कार्य करून दाखविल्याशिवाय लोक मान देत नाहीत.
94चिंती परा येई घरादुसर्‍याबदल मनात वाईट विचार आलेकी स्वत:चेच वाईट होते.
95चोर सोडून सान्याशाला फाशीखर्‍या गुन्हेगाराला शासन न करता दुसर्‍याच निरपराध माणसाला शिक्षा देणे.
96चोराच्या उलटया बोंबास्वत:च गुन्हा करून दुसर्‍यावर आळ घेणे.
97चोराच्या मनात चांदणेवाईट माणसांनाच वाईट माणसांच्या युक्त्या कळतात.
98चोरावर मोरएखाद्या गोष्टीच्या बाबतीत दुसर्‍यावर कडी करणे.
99जळत्या घराचा पोळता वासाप्रचंड नुकसानीतून जे वाचले ते आपले म्हणून समाधान मानावे.
100जलात राहुन माशांशी वैर करू नयेज्यांच्या सहवासात राहावे लागते त्यांच्याशी वैर करून नये.
101जन्माला आला हेला, पाणी वाहून मेलानिरक्षर किंवा निर्बुद्ध माणसाचे आयुष्य शारीरिक कष्टामध्येच जाते.
102जळत घर भाड्याने कोण घेणारनुकसान करणार्‍या गोष्टीचा स्वीकार कोण करणार.
103जावे त्याच्या वंशा तेव्हा कळेदुसर्‍याच्या स्थितीत आपण स्वत:जावे, तेव्हा तिचे खरे ज्ञान आपणास होते.
104ज्या गावाच्या बोरी त्याच गावच्या बाभळीएकमेंकाचे वर्म माहीत असणार्‍या माणसांशी गाठ पडणे.
105ज्याचे खावे मीठ त्याचे करावे निटजो आपल्या वर उपकार करतो त्या उपकार कर्त्याला स्मरण करून त्याच्या यशासाठी प्रयत्न करावेत.
106जशी देणावळ तशी धुणावळमिळणार्‍या मोबदल्याच्या प्रमाणातच काम करणे.
107ज्याचे करावे बरे तो म्हणतो माझेच खरेएखाद्याचे भले करायला जावे तर तो विरोधच करतो व आपलाच हेका चालवतो.
108जी खोड बाळ ती जन्मकळालहानपणीच्या सवयी जन्मभर टिकतात.
109ज्याच्या हाती ससा तो पारधीज्याला यश मिळाले तो कर्तबगार
110जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाहीमूळचा स्वभाव आयुष्यात कधीच बदलत नाही.
111जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाते उद्धरीमातेकडून बालकावर सुसंस्कार होतात म्हणून ते भविष्यात कर्तुत्ववान ठरते.
112झाकली मूठ सव्वा लाखाचीव्यंग गुप्त ठेवणेच फायद्याचे असते.
113टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण येत नाहीकष्ट केल्याशिवाय मोठेपणा मिळत नाही.
114टिटवी देखील समुद्र आटवितेसामान्य क्षुद्र वाटणारा माणूस प्रसंगी महान कार्य करू शकतो.
115डोळ्यात केर आणि कानात फुंकररोग एक आणि उपचार दुसराच
116डोंगर पोखरून उंदीर काढणेप्रचंड परिश्रम घेवूनही अल्प यश प्राप्ती होणे.
117तंटा मिटवायला गेला गव्हाची कणिक करून आलाभांडण मिटविण्याऐवजी भडकावणे.
118तळे राखील तो पाणी चाखीलआपल्याकडे सोपविलेल्या कामाचा थोडाफार लाभ मिळविण्याची प्रत्येकाची प्रवृत्ती असते.
119ढवळ्या शेजारी पवळ्या बांधला वाण नाही पण गुण लागलावाईट माणसाच्या सहवासामध्ये चांगला माणूसही बिघडतो.
120ताकापुरते रामायणआपले काम होईपर्यंत एखाद्याची खुशामत करणे
121तोंड दाबून बुक्यांचा मारएखाद्याला विनाकारण शिक्षा करणे आणि त्याला त्याबद्दल तक्रार करण्याचा मार्गही बंद करणे.
122तेल गेले तूप गेले आणि हाती धुपाटणे राहिलेफायद्याच्या दोन गोष्टीमधून मूर्खपणामुळे एकही गोष्ट साध्य न होणे.


मराठी म्हणी व त्यांचे अर्थ भाग १

   

 मराठी म्हणी व त्यांचे अर्थ भाग २

 

मराठी म्हणी व त्यांचे अर्थ भाग ३


   


 मराठी म्हणी व त्यांचे अर्थ भाग ४

   

नाम | मराठी व्याकरण

 नाम 

------------------------------------------------------------

      आपल्या अवतीभोवती , निसर्गात असंख्य वस्तू आहेत . त्यातील काही सजीव आहेत , काही निर्जीव आहेत . या सर्व वस्तूंना , पशुपक्ष्यांना , वनस्पतींना , मनातील भावनांना , दिसणाऱ्या व न दिसणाऱ्या सर्व गोष्टीना नावे दिली आहेत :

प्रत्यक्षात असणार्‍या किंवा कल्पनेने जाणवलेल्या वस्तूंना किंवा त्यांच्या गुणधर्मांना दिलेल्या नावाला ‘नाम’ असे म्हणतात.

उदा.

  • टेबल, कागद, पेन, साखर, अप्सरा, गाडी, खोटेपणा, औदार्थ, देव, स्वर्ग, पुस्तक इ.

नामाचे एकूण 3 मुख्य प्रकार पडतात.

  • सामान्य नाम –
एकाच जातीच्या पदार्थातील समान गुणधर्मामुळे त्या वस्तूला जे सर्वसामान्य नाव दिले जाते त्याला ‘सामान्य नाम’ असे म्हणतात.

उदा.

  • मुलगा, मुलगी, घर, शाळा, पुस्तक, नदी, शहर, साखर, पाणी, दूध, सोने, कापड, सैन्य, वर्ग इ.
सामान्य नाम विशेषनाम
पर्वतहिमालय, सहयाद्री, सातपुडा
मुलगास्वाधीन, हिमांशू, लक्ष्मण, कपिल, भैरव
मुलगीमधुस्मिता, स्वागता, तारा, आशा, नलिनी
शहरनगर, पुणे, दिल्ली, मुंबई, कोल्हापूर
नदीगंगा, सिंधू, तापी, नर्मदा, गोदावरी
टीप : (सामान्य नाम हे जातीवाच असते, काही विशिष्ट नामांचेच अनेकवचन होते. मराठीमध्ये पदार्थवाचक, समुहवाचक नाम हे सामान्य नामच समजले जाते.)
  • विशेष नाम –
ज्या नामाने जातीचा बोध होत नसून त्या जातीतील एका विशिष्ट व्यक्तीचा, वस्तूचा किंवा प्राण्याचा बोध होतो त्यास ‘विशेष नाम’ असे म्हणतात.

उदा.

  • राम, आशा, हिमालय, गंगा, भारत, धुळे, मुंबई, दिल्ली, सचिन, अमेरिका,गोदावरी इ.
टीप : (विशेषनाम हे व्यक्तिवाचक असते, विशेषनामाचे अनेकवचन होत नसल्यास सामान्य नाम समजावे.) 
उदा. या गावात बरेच नारद आहेत.
  • भाववाचक नाम –
ज्या नामाने प्राणी किंवा वस्तु यांच्यामध्ये असलेल्या गुण, धर्म, किंवा भाव यांचा बोध होतो. त्याला ‘भाववाचक नाम’ असे म्हणतात.

उदा.

  • धैर्य, किर्ती, चांगुलपणा, वात्सल्य, गुलामगिरी, आनंद इ.
टीप : (पदार्थाच्या गुणाबरोबरच स्थिति किंवा क्रिया दाखविणार्‍या नामांना भाववाचक नाम असे म्हणतात.
उदा. धाव, हास्य, चोरी, उड्डाण, नृत्य ही क्रियेला दिलेली नावे आहेत. वार्धक्य, बाल्य, तारुण्य, मरण हे शब्द पदार्थाची स्थिती दाखवितात.)

   भाववाचक नामे साधण्याचे प्रकार –

सामान्यनामे व विशेषनामे यांना आई, ई, की, गिरी, ता, त्व, पण, पणा, य, या यासारखे प्रत्यय लावून नामे तयार होतात ती खालीलप्रमाणे –

शब्दप्रत्ययभाववाचक नामइतर उदाहरणे
नवलआईनवलाईखोदाई, चपडाई, दांडगाई, धुलाई
श्रीमंतश्रीमंतीगरीबी, गोडी, लबाडी, वकिली
पाटीलकीपाटीलकीआपुलकी, भिक्षुकी
गुलामगिरीगुलामगिरीफसवेगिरी, लुच्चेगिरी
शांतताशांतताक्रूरता, नम्रता, समता
मनुष्यत्वमनुष्यत्वप्रौढत्व, मित्रत्व, शत्रुत्व
शहाणापण, पणाशहाणपण, पणादेवपण, प्रामाणिकपणा, मोठेपण
सुंदरसौदर्यगांभीर्य, धैर्य, माधुर्य, शौर्य
गोडवागोडवाओलावा, गारवा

नामाचे कार्य करणारे इतर शब्द :

टीप : नाम, सर्वनाम, विशेषण, ही जी नावे शब्दांच्या जातीला दिली जातात, ती त्यांच्या त्या त्या वाक्यातील कार्यावरून दिली जातात तीच गोष्ट येथेही लक्षात ठेवावयास हवी, सामान्यनाम, विशेषनाम, भाववाचकनाम ही नावे देखील नामांच्या विशिष्ट कार्यावरून दिली गेली आहेत.

अशाच पद्धतीने नामांच्या कार्यावरून त्यांचे काही नियम आहेत ते खालीलप्रमाणे-

नियम –

1. केव्हा-केव्हा सामान्यनाम हे विशेषनामांचे कार्य करतात.

उदा.

  • आत्ताच मी नगरहून आलो.
  • शेजारची तारा यंदा बी.ए. झाली.

वरील वाक्यामध्ये वापरली गेलेली नगर कोणतेही शहर, तारा(नक्षत्र) ही  मुळीच सामान्यनामे आहेत परंतु येथे ती विशेषनामे म्हणून वापरली गेलेली आहेत.

2. केव्हा-केव्हा विशेषनाम सामान्य नामाचे कार्य करतात.

उदा.

  • तुमचा मुलगा कुंभकर्णच दिसतो.
  • आमचे वडील म्हणजे जमदग्नि आहेत.
  • आम्हाला आजच्या विधार्थ्यात सुदाम नकोत भीम हवेत.

वरील वाक्यांत कुंभकर्ण, जमदग्नि, सुदाम, भीम गे मुळची विशेषनामे आहेत.
पण येथे कुंभकर्ण अतिशय झोपाळू, जमदग्नि = अतिशय रागीट मनुष्य, सुदाम=अशक्त मुलगे व भीम=सशक्त मुलगे या अर्थाने वापरली आहेत. म्हणजे मुळची विशेषनामे वरील वाक्यांत सामान्य नामांचे कार्य करतात.

3. केव्हा-केव्हा भाववाचक नामे विशेषनामांचे कार्य करते.

उदा.

  • शांती ही माझ्या बहिणीची मुलगी आहे.
  • विश्वास परीक्षेत उत्तीर्ण झाला.
  • माधुरी उधा मुंबईला जाईल.

वरील वाक्यात अधोरेखित केलेली शब्दे ही मुळची भाववाचक नामे आहेत. पण याठिकाणी त्यांचा वापर विशेषणामासारखा केला आहे.

4. विशेषनामाचे अनेकवचन होत नाही झाल्यास त्यांना सामान्यनाम म्हणतात.

उदा. 

  • आमच्या वर्गात तीन पाटील आहेत.
  • या गावात बरेच नारद आहेत.
  • माझ्या आईने सोळा सोमवारांचे व्रत केले.

विशेषनामाचे अनेकवचन होत नाही पण वरील वाक्यात विशेषनामे अनेकवचनी वापरलेली दिसतील या वाक्यातील विशेषनामे म्हणून वापरली आहेत.

5. विशेषण केव्हा-केव्हा नामाचे कार्य करतात.

उदा. 

  • शहाण्याला शब्दांचा मार.
  • श्रीमंतांना गर्व असतो.
  • जातीच्या सुंदरांना काहीही शोभते.
  • जगात गरीबांना मान मिळत नाही.

वरील वाक्यात विशेषण ही नामासारखी वापरली आहेत.

6. केव्हा-केव्हा अव्यय नामाचे कार्य करतात.

उदा.  

  • आमच्या क्रिकेटपटूंची वाहवा झाली.
  • त्याच्या बोलण्यात परंतुचा वापर फार होतो.
  • नापास झाल्यामुळे त्याची छी-थू झाली.

वरील वाक्यामध्ये केवलप्रयोगी अव्यये ही नामाची कार्य करतात.

7. धातू-साधिते केव्हा-केव्हा नामाचे कार्ये करते.

उदा.

  • ज्याला कर नाही त्याला डर कसली.
  • गुरुजींचे वागणे मोठे प्रेमळ असते.
  • ते ध्यान पाहून मला हसू आले.
  • देणार्‍याने देत जावे.

वरील उदाहरणांवरून असे दिसून येते की, सामान्यपणे, विशेषनामे व भाववाचकनामे ही एकमेकांचे कार्य करतांना आढळतात. तसेच विशेषणे, अव्यय, धातुसाधिते यांचा वापरसुद्धा नामांसारखा करण्यात येतो.

नेहमी वापरात येणारे 501 इंग्रजी शब्द मराठी अर्थासह |


नेहमी वापरात येणारे 

501 इंग्रजी शब्द मराठी अर्थासह



--------------------------------------------------------------------

1.      Spring (स्प्रिंग) वसंत ऋतू  

2.      Observe (अब्ज़र्व) निरीक्षण करणे

3.      Child (चाइल्ड) मूल

4.      Exact (इग्ज़ैक्ट) तंतोतंत

5.      Straight (स्ट्रेट) सरळ

6.      Consonant (कॉन्सोनेंट) व्यंजन

7.      Else (एल्स) शिवाय,आणखी

8.     Broke (ब्रोक) तोडले

9.      Case (केस) खटला,प्रकरण

10.  Middle (मिडल) मधला

11.   Nation (नेशन) राष्ट्र

12.  Milk (मिल्क) दूध

13.  Loud (लाउड) जोरात

14.  Pay (पे) पैसे देणे

15.  Symbol (सीम्बॉल) चिन्ह,प्रतीक,निशाणी

16.  Age (एज) वय

17.   Section (सेक्शन) भाग,घटक

18.  Dress (ड्रेस) पोशाख,वेष

19.  Cloud (क्लाउड) ढग

20. Stone (स्टोन) दगड

21.  Method (मेथड) कार्यपद्धती

22. Tiny (टाइनी) छोटे,लहान

23. Least (लीस्ट) किमान

24. Speed (स्पीड) गती,वेग

25. Organ (ऑर्गन) इंद्रिय

26. Die (डाइ) मरणे

27.  Dictionary (डिक्शनरी) शब्दकोश

28. Cool (कूल) शीतल,थंड

29. Design (डिज़ाइन) डिझाइन

30. Poor (पुअर) गरीब

31.  Quiet (क्वायट) शांत

32. Surprise (सर्प्राइज़) आश्चर्य,नवल

33. Climb (क्लाइम) चढणे

34. Single (सिंगल) एकल,एकटा,एक

35.  Stick (स्टिक) काठी

36. Hole (होल) छिद्र

37.  Iron (आइअर्न) लोखंड,इस्त्री

38. Jump (जम्प) उडी

39. Baby (बेबी) बाळ

40. Village (व्हिलेज) खेडेगाव

41.  Shout (शाउट) ओरडणे

42. Skin (स्किन) त्वचा

43. Lot of (लॉट ऑफ) खूप

44. Experiment (इक्स्पेरीमेंट)  प्रयोग

45. Bottom (बॉटम) तळ,बुड

46. Key (की) चावी

47.  Provide (प्रवाइड) पुरविणे

48. Lie (लाइ) खोटे बोलणे

49. Wing (विंग) पंख

50. Gentle (जेन्टल) हळुवार,सौम्य

51.  Woman (वुमन) महिला

52. Push (पुश) ढकलणे

53.  Safe (सेफ ) सुरक्षित,तिजोरी

54. Cat (कॅट) मांजर

55.  History (हिस्ट्री) इतिहास

56. Expect (इक्स्पेक्ट) अपेक्षा करणे

57.  Rail (रेल) आगगाडी

58. Electricity  (इलेक्ट्रिसिटी) विद्युत

59. Agree (अॅग्री) सहमत

60. Cook (कूक) आचारी

61.  Held (हेल्ड) आयोजित

62. Either (आइदर) दोहोंपैकी एक

63. Buy  (बाय) खरेदी करणे,विकत घेणे

64. Paragraph (पैरेग्राफ) परिच्छेद

65. Captain (कॅप्टन) कप्तान,गटप्रमुख

66. Thus (दस) असे

67.  Raise  (रेज़) उंचावणे

68. Solve  (सॉल्व) सोडवणे

69. Floor (फ्लोर) मजला

70. Industry (इन्डस्ट्री) उद्योगधंदा

71.   Value (वॅल्यू) मूल्य,किंमत

72.  Fight (फाइट) लढणे,लढा

73.  Result (रिज़ल्ट) निकाल

74.  Burn (बर्न) जळणे

75.  Metal (मेटल) धातू 

76.  Sharp (शार्प) तीक्ष्ण

77.  Bone (बोन) हाड,अस्थि

78. Hill (हिल) टेकडी,डोंगर

79.  Temperature (टेम्परेचर) तापमान

80.Finger (फिंगर) बोट

81.  Create (क्रीएट) तयार करणे

82. Imagine (इमैजिन) कल्पना करणे

83. Sand (सैन्ड) वाळू,रेती

84. Describe (डिस्क्राइब) वर्णन करणे

85. Soil (सॉइल) माती

86. Roll (रोल) गुंडाळी,सुरळी

87. View (व्यू) देखावा,दृश्य

88. Sense (सेन्स) संवेदना

89. Capital (कॅपिटल) राजधानी

90. Chair (चेअर) खुर्ची

91.  Danger (डेन्जर) धोका

92. Soldier (सोल्जर) सैनिक

93. Consider (कन्सिडर) विचार करणे,लक्षात घेणे 

94. Century (सेंचुरी) शतक

95. Separate (सेपरेट) वेगळा,भिन्न

96. Difficult (डिफकल्ट) कठीण,अवघड

97.  Copy  (कॉपी) नक्कल

98. Root (रूट) मूळ,उगम

99. Fruit (फ्रूट) फळ

100.Thick (थिक) जाड 

101.Phrase (फ्रेज़ ) वाक्यांश,वाक्प्रचार

102.Excite (इक्साइट) उत्तेजित

103.Natural (नॅच्युरल) नैसर्गिक

104.Silent (साइलन्ट) चुप,शांत

105. Tall (टॉल) उंच

106. Process (प्रोसेस)  प्रक्रिया

107. Corner (कॉर्नर) कोपरा

108. Supply (सप्लाइ) पुरवठा

109. Locate (लोकेट) दाखवणे

110. Ring (रिंग) अंगठी

111.   Type (टाइप) प्रकार,नमुना

112.  Neighbor (नेबर) शेजारी

113.  Law (लॉ) कायदा

114.  Modern (मॉडर्न) आधुनिक

115.  Caught (कॉट) पकडलेला

116.  Guess (गेस) अनुमान,अंदाज

117.  Protect (प्रोटेक्ट) संरक्षण

118.  Noon (नून) दुपार,मध्यान्ह

119.  Operate (ऑपरेट) चालवणे

120.Crop (क्रॉप) पीक

121.  Element (एलिमेंट) मूलद्रव्य,घटक

122. Practice (प्रैक्टिस) सराव

123. Period (पीरियड) ,कालावधी,अवधि

124. Radio (रेडिओ) रेडिओ

125. Insect (इन्सेक्ट)  कीटक 

126. Atom (ऐटम) अणू

127. Indicate (इंडिकेट) दर्शविणे

128.Coast (कोस्ट) समुद्रकिनारा,किनारपट्टी

129. Character (कॅरक्टर) चरित्र,स्वभाव,पात्र

130.Student (स्टूडन्ट) विद्यार्थी

131.  Party (पार्टी) पार्टी,पक्ष

132. Human (ह्यूमन) मानव

133. Spoke (स्पोक)  बोलले

134. Doctor (डॉक्टर) वैद्य

135. Please (प्लीज़) कृपया

136. Necessary (नेसेस्सरी) आवश्यक

137. Effect (इफेक्ट) प्रभाव,परिणाम

138. Liquid (लिक्विड) द्रव पदार्थ

139. Print (प्रिंट) छापणे

140. Charge (चार्ज) जबाबदारी,प्रभार

141. Share (शेअर) हिस्सा देना,वाटा

142. Tie (टाइ) बांधणे

143. Stream (स्ट्रीम) प्रवाह

144. Hurry (हरी) लवकर,धांदल,घाई  

145. Speech (स्पीच) भाषण,वक्तव्य

146. Chief (चीफ) मुख्य, प्रमुख

147. Enter (एन्टर) प्रवेश

148. Major (मेजर) सेनाधिकारी

149. Search (सर्च) शोधणे

150. Send (सेन्ड) पाठवणे 

151. Gun (गन) बंदूक

152. Allow (अलाउ) अनुमति देणे

153. Dead (डेड) मृत

154. Spot (स्पॉट) डाग,जागा

155. Desert (डेज़र्ट) वाळवंट

156. Suit (सूट)  सूट

157. Parent (पेरेंट) आईवडील,पालक

158. Shore (शोर) किनारा

159. Yellow (यल्लो) पिवळा

160. Division (डिविज़न) भागाकार,विभागणी

161. Lift (लिफ्ट) उचलणे

162. Rose (रोज़ ) गुलाब

163. Arrive (अराइव) आगमन,पोचणे

164. Master (मास्टर) शिक्षक

165. Track (ट्रैक) मार्ग

166. Current (करन्ट) वर्तमान,चालू

167. Rub (रब) घासणे,चोळणे

168. Tube (ट्यूब) नळी

169. Famous (फेमस) प्रसिद्ध,सुप्रसिद्ध

170. Dollar (डॉलर) डॉलर अमेरिकी मुद्रा

171. Fresh (फ्रेश) ताजे,ताजेतवाणे

172. Substance (सब्स्टन्स) पदार्थ

173. Spend (स्पेन्ड) खर्चने,खर्च करणे

174. Chord (कॉर्ड) जीवा

175. Fear (फियर) भीती 

176. Fat (फॅट) चरबी,लठ्ठ

177. Sheet (शीट) चादर

178. Poem (पोअम) कविता,काव्य

179. String (स्ट्रिंग) सुतळी

180. Favor  (फेवर) मर्जी

181. Glad (ग्लैड) प्रसन्न,आनंदी

182. Original (ओरिजनल) मूळ,मूळचा

183. Dad (डैड) बाबा,वडील

184. Bread (ब्रेड) रोटी,पाव,भाकरी

185. Proper (प्रापर) उचित,योग्य

186. Compare (कम्पेर) तुलना करणे

187. Connect (कनेक्ट) जोडणे

188. Post Office (पोस्ट ऑफिस) टपाल कचेरी

189. Bell (बेल) बेल,घंटी

190. Depend (डिपेन्ड) अवलंबून

191. Offer (ऑफर) प्रस्ताव

192. Station (स्टेशन) स्थानक,स्टेशन

193. Sight (साइट) दृष्टि,देखावा

194. Thin (थिन) बारीक,पातळ,हडकुळा

195. Reply (रिप्लाइ) उत्तर देणे

196. Drink (ड्रिंक) पेय,पिणे

197. Occur (ऑकर) उद्भवणे,घडून येणे

198. Triangle (ट्राइऐंगल) त्रिकोण

199. Duck (डक) बदक

200. Instant (इन्स्टन्ट) क्षण,ताबडतोब 

201. Population (पॉप्युलेशन) लोकसंख्या

202.   Chick (चिक) पक्ष्याचे पिल्लू

203.   Dear (डिअर) प्रिय

204.   Enemy (एनीमी) शत्रू

205.   Segment (सेग्मेन्ट) वर्तुळखंड

206.   Support (सपोर्ट) आधार

207.   Nature (नेचर) निसर्ग

208.   Range (रेन्ज) पल्ला,कक्षा

209.   Planet (प्लॅनेट) ग्रह

210.   Colony (कॉलनी) वसाहत

211.   Clock (क्लॉक) घडयाळ

212.   Steam (स्टीम) वाफ

213.   Market (मार्केट) बाजार

214.   Degree (डिग्री) पदवी,दर्जा

215.   Motion (मोशन) गति,हालचाल

216.   Path (पाथ) रस्ता,मार्ग  

217.   Log (लॉग) लाकडाचा ओंडका

218.   Meaning (मीनिंग) म्हणजे,अर्थ

219.   Shell (शेल) शिंपला,टरफल

220.   Neck (नेक) मान

221.   Oxygen (ऑक्सिजन) ऑक्सीजन,प्राणवायू 

222.   Sugar (शुगर) साखर

223.   Pretty (प्रिटी) सुरेख

224.   Tear (टेअर) फाटणे,फाडणे

225.   Season (सीज़न) ऋतु 

226.   Bat (बॅट) लाकडी फळी

227.   Rather  (रॅदर) त्याऐवजी,काहीसा

228.   Crowd (क्राउड) गर्दी

229.   Skill (स्किल) कौशल्य

230.   Quotient (क्वोशन्ट) भागाकार

231.   Teeth (टीथ) दात

232.   Wash (वॉश) धुणे

233.   Corn (कॉर्न) मका

234.   Death (डेथ) मृत्यू

235.   Solution (सोल्यूशन) उपाय,समाधान

236.   Magnet (मॅग्नेट) चुंबक

237.   Silver  (सिल्वर) चांदी  

238.   Thank (थॅंक) धन्यवाद,आभार

239.   Branch (ब्रैन्च) फांदी,शाखा

240.   Match (मॅच) सामना,जुळवणे  

241.   Suffix (सफिक्स) प्रत्यय

242.   Especially (स्पेशली) विशेषतः

243.   Fig (फिग) अंजीर

244.   Afraid (अफ्रैड) भ्यायलेला,घाबरलेला

245.   Huge (ह्यूज) प्रचंड

246.   Sister (सिस्टर) बहीण

247.   Steel (स्टील) स्टील

248.   Discuss (डिस्कस) चर्चा

249.   Forward (फॉरवर्ड) पुढील,पुढच्या

250.   Similar (सिमिलर) सारखा,समान 

251.   Guide (गाइड) गाइड,मार्गदर्शक

252.   Experience (एक्स्पीरीअन्स) अनुभव

253.   Score (स्कोर) धावसंख्या

254.   Apple (अॅपल) सफरचंद

255.   Bought (बॉट) विकत घेतले,खरेदी केले

256.   Led (लेड) नेतृत्व

257.   Pitch (पिच) खेळपट्टीवर

258.   Coat (कोट) कोट

259.   Mass (मास)  सामूहिक

260.   Card (कार्ड) पत्ते,ओळखपत्र

261.   Band (बॅंड) वाद्यवृंद

262.   Rope (रोप) दोरी

263.   Win (विन) जिंकणे

264.   Dream (ड्रीम) स्वप्न

265.   Evening (ईवनिंग) संध्याकाळ,सायंकाळ

266.   Condition (कन्डिशन) परिस्थिति

267.   Feed (फ़ीड) भरवणे

268.   Tool (टूल) साधन,हत्यार

269.   Total (टोटल) संपूर्ण,एकूण  

270.   Basic (बेसिक) मूलभूत,पायाभूत

271.   Smell (स्मेल) वास

272.   Valley (व्हॅली) दरी

273.   Nor (नॉर) आणि नाही

274.   Double (डबल) दुप्पट

275.   Seat (सीट) आसन 

276.   Continue (कन्टिन्यू) चालू असणे

277.   Block (ब्लॉक) खंड,अडवणे

278.   Chart (चार्ट) चार्ट,तक्ता

279.   Hat (हॅट) टोपी

280.   Success (सक्सेस) सफलता,यश,विजय

281.   Company (कंपनी) कारखाना

282.   Subtract (सब्ट्रैक्ट) वजा करणे

283.   Event (ईवेंट) घटना,प्रसंग  

284.   Particular (पर्टिक्युलर) विशिष्ट

285.   Deal (डील) सौदा

286.   Swim (स्विम) पोहणे

287.   Term (टर्म) सत्र

288.   Opposite (ऑपोजिट) विरुद्ध,विरोधी

289.   Wife (वाइफ) पत्नी,बायको

290.   Shoe (शू) बूट

291.   Shoulder (शोल्डर) खांदा  

292.   Spread (स्प्रेड) प्रसार

293.   Arrange (अरेंज) व्यवस्था करणे

294.   Camp (कॅम्प) शिबिर

295.   Invent (इन्वेन्ट) शोधणे

296.   Cotton (कॉटन) कापूस

297.   Born (बॉर्न) जन्म घेणे

298.   Determine (डिटर्मिन) ठरवणे,निश्चित करणे

299.   Quarter (क्वॉर्टर) पाव शेर,एक चतुर्थांश

300.   Truck (ट्रक) ट्रक,लॉरी 

301.   Noise (नॉइज़) आवाज,गोंधळ

302.   Level (लेवल) स्तर,पातळी

303.   Chance (चान्स) संधी

304.    Gather (गॅदर)  जमणे,जमवणे

305.    Shop (शॉप) दुकान

306.    Stretch (स्ट्रेच) ताणणे

307.    Throw (थ्रो) फेकणे  

308.   Shine (शाइन) चमकणे  

309.   Property (प्रॉपर्टी) संपत्ती,मालमत्ता

310.    Column (कॉलम) स्तंभ,रकाना

311.     Molecule (मोलेक्यूल) अणू

312.    Select (सिलेक्ट) निवड

313.    Wrong (रॉंग) चूक

314.    Gray (ग्रे) करडा,भुरा  

315.    Repeat (रीपीट) पुनरावृत्ति

316.    Require (रिक्वायर) आवश्यकता

317.    Broad (ब्रॉड) विस्तृत,रुंद

318.    Prepare (प्रिपेअर) तयार करणे

319.   Salt (सॉल्ट) मीठ,क्षार  

320.   Nose (नोज़) नाक

321.    Plural (प्लुरल) अनेकवचन

322.   Anger (ऐंगर) राग,क्रोध

323.   Claim (क्लेम) दावा,मागणी

324.    Continent (कॉन्टिनेन्ट) खंड

325.    I   (आइ)  मी 

326.    He  (ही)   तो,त्याने

327.    Is  (इज़)  आहे

328.   All      (ऑल) सर्व,सगळे

329.   As    (अॕज)  जसे,प्रमाणे

330.   There   (देर)  तेथे

331.    His  (हिज़)  त्याचा,त्याची,त्याचे

332.    When  (ह्वेन)  जेव्हा,केव्हा

333.    Them  (देम)  त्यांना

334.    That   (दॅट)    की,तो,ती,ते

335.    In   (इन)  आत,मध्ये

336.    Only   (ओन्ली)  फक्त,केवळ

337.    Up  (अप)   वर

338.   Was   (वॉज़)  होता

339.   Your (यॉर) तुझा,तुझी,तुझे

340.   On  (ऑन)  वर

341.    Way  (वे)  रस्ता,मार्ग

342.   Are   (आर)  आहेत

343.   Own (ओन) स्वतः

344.   About  (अबाउट) विषयी,बद्दल

345.   Many  (मेनी)  खूप,पुष्कळ

346.   They  (दे)   ते

347.    Then  (देन)  तेव्हा,नंतर

348.   Have  (हैव)   आहे

349.   So  (सो) म्हणून

350.   This   (धिस)  हा,ही,हे 

351.    These   (दीज़) ह्या,या,ही  

352.   Her   (हर)  तिचा,तिची,तिचे

353.   Went (वेंट)  गेला,गेली,गेले

354.   From  (फ्रॉम)  पासून

355.   Such  (सच)  असे

356.   By   (बाइ)  जवळ,मधून

357.   Our  (आउअर) आमचा,आमची,आमचे

358.   Him  (हिम) त्याला

359.   It  (इट) ते

360.   Has  (हॅज) आहे

361.   You  (यू) तू,तुला

362.   Look  (लुक) पहा,पाहणे

363.   More (मोअर) आणखी,अधिक

364.   Or  (ऑर) किंवा

365.   Had  (हॅड) होते,होता

366.   What (व्हॉट)  काय

367.  Make  (मेक)  बनवणे,तयार करणे

368.  Some  (सम)  काही

369.  My  (माय)  माझा,माझी,माझे

370.  At   (अॕट)  येथे

371.   To  (टू) कडे

372.   Of   (ऑफ) चा,ची,चे

373.   Know   (नो)  माहीत असणे

374.   Ours (अवर्स) आमचा,आमची,आमचे

375.   It’s (इट्स) त्याचा,त्याची,त्याचे 

376.   Another (अनादर) अन्य,दूसरा,इतर

377.   Whom (हूम) कोणाला

378.   With whom (विथ हूम) कोणासोबत

379.   Across (अक्रॉस) ओलांडणे

380.   Into (इन्टू) मध्ये,बाहेरून आत

381.   How many (हाउ मेनी) किती  

382.   How much (हाउ मच) किती  

383.   How far (हाउ फार) किती दूर,कुठवर  

384.   How long (हाउ लॉंग) किती काळ

385.   Of whom (ऑफ हूम) कोणाचे

386.   May (मे) शक्यता,आशा

387.   Weak (वीक) अशक्त,दुबळा  

388.   Fare (फेर) भाडे  

389.   Accident (एक्सीडेंट) दुर्घटना,अपघात

390.   Sell (सेल) विकणे  

391.   Shelf (शेल्फ) फडताळ  

392.   Sheep (शीप) मेंढी  

393.   Action (अॕक्शन) क्रिया,कृती

394.   Wet (वेट) भिजलेला,ओला  

395.   Taste (टेस्ट) स्वाद,चव

396.   Absent (अबसेंट) अनुपस्थित,गैरहजर  

397.   Sow (सो) पेरणे  

398.   Peace (पीस) शांतता

399.   Address (अड्रेस) पत्ता  

400.   Rein (रेन) लगाम,अटकाव 

401.   Raw (रॉ) कच्चा

402.   Deed (डीड) कृत्य 

403.   Bit (बिट)  क्षण,अंश  

404.   Fail (फ़ेल) अनुत्तीर्ण

405.   Dip (डिप) बुडविणे  

406.   Wander (वान्डर) भटकणे

407.   Slip (स्लिप) घसरणे,निसटणे 

408.  Why  (ह्वाइ) का

409.  Than   (दॅन)   पेक्षा

410.  She  (शी)   ती

411.  Go  (गो) जा,जाणे

412.  And  (अँड) आणि

413.  Their   (देर) त्यांचा,त्यांची,त्यांचे

414.  Did   (डिड)  केला,केली,केले

415.  Just   (जस्ट) फक्त,केवळ

416.  Could (कुड)  शकते

417.  Very   (वेरी)  खूप

418.  Me  (मी) मी,मला

419.  Who  (हू)   कोण

420.  Where  (ह्वेर) कोठे

421.  We   (वी)  आम्ही,आपण

422.  Down (डाउन)  खाली

423.  Here  (हियर) येथे,इकडे

424.  Before  (बिफोर) पूर्वी

425.  Were  (वेयर) होते 

426.  Which  (विच) जे

427.  Do  (डू) कर,करणे

428.  Give  (गिव) दे,देणे

429.  Any  (एनी)  कोणताही

430.  If  (इफ)  जर

431.  Now (नाउ)  आता

432.  Also  (ऑल्सो) देखील,जोडीला

433.  Much  (मच) पुष्कळ,खूप,भरपूर

434.  Will  (विल) होईल

435.  Every (एवरी) प्रत्येक

436.  How  (हाउ) कसे,किती

437.  Each  (ईच) प्रत्येक

438.  Us (अस)  आम्हाला

439.  Should  (शुड) पाहिजे

440.  Again  (अगेन) पुन्हा

441.  Still  (स्टिल) अजूनही,अद्याप

442.  Learn  (लर्न) शिकणे

443.  Plant (प्लांट) रोपटे

444.  Does  (डज) करते

445.  Air  (एयर) हवा

446.  After  (आफ्टर) नंतर

447.  Add (अॅड)  मिसळणे,मिळवणे  

448.  Even  (ईवन) सम

449.  Kind  (काइन्ड) प्रकार,दयाळू

450.  Off   (ऑफ) बंद

451.  Too  (टू) सुद्धा

452.  Under  (अन्डर) खाली,च्या खाली

453.  Move  (मूव) हालचाल

454.  Near  (निअर) समीप,जवळ

455.  Live  (लिव) राहणे

456.  Self  (सेल्फ) स्वतः

457.  Take  (टेक) घेणे

458.  Say  (से) म्हणणे

459.  No  (नो) नाही

460.  Most  (मोस्ट) सर्वात

461.  Might (माइट) कदाचित

462.  Between (बिट्वीन) दरम्यान,मध्ये

463.  Let (लेट) चला,परवानगी देणे

464.  Those (दोज़) त्या,ते

465.  Start (स्टार्ट) सुरुवात

466.  Saw (सॉ) पाहिले

467.  While  (ह्वाइल) तर

468.  Last (लास्ट) शेवटचा

469.  Few  (फ्यू) काही,थोडे

470.  Took (टुक) घेतले

471.  Far (फार) दूर,लांब

472.  Once (वन्स) एकदा

473.  Hear (हीअर) ऐकणे

474.  Main (मेन) मुख्य

475.  Next (नेक्स्ट) पुढचा 

476.  Sure (शुअर) खात्री

477.  Above (अबव) वर

478.  Leave (लीव) सोडणे

479.  Among (अमंग) च्या मध्यभागी

480.  Feel (फील) वाटणे

481.  Deep  (डीप) खोल

482.  Piece (पीस) तुकडा

483.  Fill (फिल) भरणे

484.  Since (सिन्स) पासून

485.  Ship (शिप) जहाज

486.  Wonder (वन्डर) आश्चर्य

487.  Ago (अगो) पूर्वी

488.  Test (टेस्ट) परीक्षा

489.  Heat (हीट) गर्मी,उष्णता

490.  Wait (वेट) वाट पाहणे

491.  Week (वीक) आठवडा

492.  Behind (बिहाइन्ड) पाठीमागे

493.  During (ड्युरिंग) दरम्यान

494.  Reach (रीच) पोहोचणे

495.  Several (सेवरल) कित्येक,बरेच

496.  Towards (टूवर्ड्स) च्या दिशेने

497.  Road (रोड) रस्ता

498. Hit (हिट) टोला मारणे

499. Whose (हूज़) कुणाचे

500. Beat (बीट) मारणे

501.  Hair (हेअर) केस


Thursday, March 4, 2021

Bonds of family | Online Test | Environmental Studies | Standard One

 Bonds of family 

Online Test 
Environmental Studies | Standard One 

--------------------------------------------------------------------------------------------------

Most Important Contraction List

Most Important Contraction List Are not –> aren’t Can not –> can’t Could not –> couldn’t Did not –> didn’t Do not –> don’t Do...