Wednesday, October 21, 2020

सामान्य ज्ञान-विज्ञान :- प्रत्येकी दोन किंवा तीन नावे सांगा

 *प्रत्येकी दोन किंवा तीन नावे सांगा.*


(१) वनस्पतीच्या अवयवांची नावे सांगा.

उत्तर -- खोड, फांदी, पान
---------------------------------
(२) जमिनीवर चालणारे आणि हवेत उडणाऱ्या
प्राण्यांची नावे सांगा.

उत्तर -- कावळा , झूरळ
---------------------------------
(३) पाय नसलेले आणि सरपटत जाणारे दोन
प्राणी सांगा.

उत्तर -- साप, गांडूळ.
--------------------------------------------------
(४) शिंगे असणारे प्राणी सांगा.

उत्तर -- हरिण, सांबर, बैल
----------------------------------------------------------
(५) अन्न न चावता गिळणारे प्राणी सांगा.

उत्तर -- सरडा, बेडूक.
----------------------------------------------------------
(६) अन्न जिभेने पकडणारे  प्राणी सांगा.

उत्तर -- बेडूक, सरडा.
----------------------------------------------------------
( ७) तोंडाने अन्न उचलून खाणा-या दोन प्राण्यांची नावे सांगा.

उत्तर -- गाय, कुत्रा, बकरी
----------------------------------------------------------
(८) पुढच्या पायांनी अन्न उचलून तोंडाशी नेणारे दोन
प्राणी सांगा.

उत्तर -- माकड, खार.
----------------------------------------------------------
(९) रवंथ करणारे दोन प्राणी सांगा.

उत्तर -- गाय, म्हैस.
----------------------------------------------------------
(१०) भक्ष्य फाडून आणि चावून खाणारे दोन प्राणी सांगा.

उत्तर -- वाघ, लांडगा.
----------------------------------------------------------
(११) परोपजीवी वनस्पतींची दोन नावे सांगा.

उत्तर -- बांडगुळ, अमरवेल.
-----------------------------------------------------------
(१२) जंगलात आढळणाऱ्या दोन फळझाडांची नावे सांगा.

उत्तर -- करवंद, आवळा
-----------------------------------------------------------
(१३) एकदल वनस्पतींची नावे सांगा.

उत्तर -- नारळ, केळी
-----------------------------------------------------------
(१४) एकदल तृण वनस्पतींची नावे सांगा.

उत्तर -- गहू, तांदूळ.
-----------------------------------------------------------
(१५) गोड्या पाण्यातील वनस्पतींची नावे सांगा.

उत्तर -- शिंगाडा, कमळ.





ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट मध्ये जरूर कळवा.
अशीच माहिती मिळवण्यासाठी या ब्लॉग ला फॉलो करा.

एकाच शब्दाचे अनेक अर्थ

 🔸एकाच शब्दाचे अनेक अर्थ 🔹

--------------------------------------------                                          

भाव - किंमत, दर, भावना

--------------------------------------------

मित्र - सूर्य , दोस्त , सखा

--------------------------------------------

 नाद - आवाज , छंद 

--------------------------------------------

काळ - मृत्यू , वेळ, यम

--------------------------------------------

जीवन - पाणी , आयुष्य 

--------------------------------------------

जलद - ढग , लवकर 

--------------------------------------------

ध्यान - समाधी , चिंतन

--------------------------------------------

तीर - काठ , बाण 

--------------------------------------------

अनंत - अमर्याद , आकाश

--------------------------------------------

सूत - दोरा, सारथी, संधान

--------------------------------------------

वर - नवरदेव , आशीर्वाद , एक दिशा

--------------------------------------------

Tuesday, October 20, 2020

स्वरांसोबत शब्दांचे इंग्रजी उच्चार | English Pronounciation | a,e,i,o,u या स्वरांचे विविध उच्चार |

स्वरांसोबत शब्दांचे इंग्रजी उच्चार 

इंग्रजी भाषेत a, e, i, o, u हे पाच स्वर आहेत,


स्वरांना Vowels (व्हॉवल्स्) असे म्हणतात. बाकीची व्यंजने आहेत. त्यांना Consonants (कॉन्सनण्ट्स) असे म्हणतात.

इंग्रजी स्वरांचा उच्चार समजणे फार महत्त्वाचे आहे. स्वरांचे निरनिराळे उच्चार होतात.
उच्चारांचे काही विशेष नियम आहेत. निरनिराळे उच्चार कसे होतात, ते माहीत करून घेणे फार आवश्यक आहे.
खालील उदाहरणांचे स्पेलिंग, उच्चार आणि अर्थ नीट लक्षात ठेवा.
इंग्रजी मुळाक्षरातील स्वरांचे उच्चार (a.e.i.o.u-हे पाच स्वर)

1) a या स्वराचे वेगवेगळे उच्चार

a) चे उच्चार सामान्यपणे 
A^, आ, ऑ, ए असे होतात.

1) a या स्वराचा 
A^ उच्चार होणारे काही शब्द:

at (
A^ट्) - येथे 

cat (कॅट्)- मांजर

rat (रॅट)- उंदीर

mat (
ma^ट)- चटई

man (मॅन)- माणूस

gap (गॅप ) - फट

fan (फॅन)-पंखा

map (मॅप) नकाशा

2) a या स्वराचा आ असा उच्चार होणारे काही शब्द:

far (फार) - दूर

are (आर्) आहोत

car (कार)- मोटार गाडी

farm (फार्म)- शेती

bar (बार)-गज

jar (जार) बरणी

3) a या स्वराचा ऑ असा उच्चार होणारे काही शब्द :

small (स्मॉल) - लहान

all (ऑल)-सर्व

tall (टॉल)- उंच

ball (बॉल) - चेंडू

war (वॉर) - युद्ध

wall (वॉल)- भिंत

4) a या स्वराचा दीर्घ ए असा उच्चार होणारे काही शब्द :

care (केअर) - काळजी

face (फेस)- चेहरा

gate (गेट) - फाटक

fare (फेअर) - भाडे

name (नेम)- नाव

lake (लेक्) - तलाव

a च्या नंतर y किंवा i आल्यास त्याचा उच्चार 'ए' होतो, परंतु 'ए' जरा लांब असतो

way (वे)- रस्ता

brain (ब्रेन) - मेंदू

gay (गे) - आनंदी

pay (पे)- पगार

main (मेन)- मुख्य

stay (स्टे)- थांबणे


 ॥) e या स्वराचे वेगवेगळे उच्चार

 e चे उच्चार सामान्यतः  ए, इ, ई असे होतात.

1) e या स्वराचा र्‍हस्व ए असा उच्चार होणारे काही शब्द

when (व्हेन्) - केंव्हा

then (देन्) - तेंव्हा

pen (पेन) - लेखणी

men (मेन्) - माणसे

bell (बेल)-घंटा

net (नेट) - जाळे

hen (हेन) - कोंबडी

ten (टेन्) - दहा

well (वेल)- विहीर

red (रेड)- लाल


2) e या स्वराचा दीर्घ ई असा उच्चार होणारे काही शब्दः

be (बी) - असणे

he (ही)-तो

me (मी)- मला

she (शी)-ती

lll ) i या स्वराचे वेगवेगळे उच्चार

i चा उच्चार साधारणपणे इ, आइ, आय असा होतो.

1) i या स्वराचा ऱ्हस्व इ असा उच्चार होणारे काही शब्द:

ink (इंक्)-शाई

big (बिग) - मोठा 

ill (इल)-आजारी

milk (मिल्क) - दुध

pig (पिग)- डुक्कर 

hill (हिल्)- टेकडी

ship (शिप)-जहाज 

lip (लिप्)-ओठ

pin (पिन)-टाचणी 

din (डिन्)- गोंगाट

2) i या स्वराचा आइ असा उच्चार होणारे काही शब्द:

behind (बिहाइंड)-पाठीमागे

kind (काइंड)-दयाळू

life (लाइफ)- जीवन

fine (फाइन)-छान

wife (वाइफ)- पत्नी

line (लाइन)-रेघ

nine (नाइन)-नऊ 

wine (वाईन)- दारू

kite (काइट)- पतंग

night (नाइट) रात्र

3) i या स्वराचा आय असा उच्चार होणारे काही शब्द-

I (आय)- मी

wire (वायर)-तार

fire (फायर)- आग

mire (मायर)-चिखल

admire (ॲडमायर)-प्रशंसा करणे

sire (सायर)- महाराज, साहेब, पिता.


IV) o या स्वराचे वेगवेगळे उच्चार :

० चे उच्चार साधारपणे ओ,ऑ,उ,ऊ,असे होतात,

1) ০ या स्वराचा दीर्घ ओअसा उच्चार होणारे काही शब्द :

gold (गोल्ड) सोने 

old (ओल्ड)- जुने

hope (होप)- आशा 

rope (रोप)- दोर

no (नो)- नाही

go (गो)- जाणे

opan (ओपन) उघडा 

joke (जोक)-विनोद

Post (पोस्ट) डाक 

Most (मोस्ट)-खूप

शब्दात O पुढे 'w' येतो तेव्हा

low (लो)- हळू

sow (सो)- पेरणे

crow(को)-कावळा 

row (रो)- ओळ

show (शो)- प्रदर्शन 

bow (बो) नमन करणे

2) o या स्वराचा -हस्व ऑ असा उच्चार होणारे काही शब्द :

box (बॉक्स)-पेटी 

fox (फॉक्म)- कोल्हा

ox (ऑक्स)-बैल

hot (हॉट)-गरम

pot (पॉट)-भांडे

dog (डॉग)- कुत्रा

dot (डॉट)-बिंदु

not (नॉट)- नाही

top (टॉप)-  वरचा भाग 

drop (ड्रोप) थेंब

spot (स्पॉट)-डाग 

soft (सोफ्ट)- मऊ

3) ০ या स्वराचा -हस्व उ असा उच्चार होणारे काही शब्द :

hook (हुक)- आकडा 

cook(कुक)-आचारी

book (बुक)- पुस्तक 

took (टुक) - घेतले

good (गुड)- चांगला

wood (वुड)- लाकूड

look (लुक)-पाहणे

foot (फुट)-पाऊल, बारा इंच

4) ০ या स्वराचा दीर्घ ऊ असा उच्चार होणारे काही शब्द:

do(डू)-करणे

zoo (झू)- प्राणिसंग्रहालय 

moon (मून)-चंद्र 

noon (मून)- दुपार 

room (रूम)-खोली 

loom (लूम) माग

cool (कूल) थंड

fool (फूल) मुर्ख

5) o या स्वराचा -हस्व अ असा उच्चार होणारे शब्द :

son (सन)-मुलगा

come (कम) येणे

V) U या स्वराचे वेगवेगळे उच्चार

U चे उच्चार साधारणपणे अ,उ,यू असे होतात.

1) U या स्वराचा अ असा उच्चार होणार काही शब्द:

up (अप)- वर

cup (कप)-कप,पेला

hut (हट्)- झोपडी 

but (बट्) - परंतु

sun (सन्)-सूर्य 

fun (सन्)-गंमत

dust (डस्ट)-धूळ 

must (मस्ट)- अवश्य

mud (मड)-चिखल 

curd (कर्ड)- दही

2) U या स्वराचा -हस्व उ असा उच्चार होणारे काही शब्द:

bull (बुल)- बैल

pull (पुल)-ओढणे, खेचणे

push (पुश)- ढकलणे

bush (बुश)-झुडूप

3) U या स्वराचा यू असा उच्चार होणारे काही शब्द:

sure (शुअर) - नक्की

cure (क्युअर)-बरे करणे

duty (ड्यूटी)- कर्तव्य

durable (ड्यूरेबल)-टिकाऊ

Online Test No. 8 ( Standard One)

 Online Test No. 8 ( Standard One)



मराठी बालभारती ऑनलाईन चाचणी क्रमांक १ ( इयत्ता ४ थी ) पाठ २ बोलणारी नदी

 मराठी बालभारती ऑनलाईन चाचणी क्रमांक १ 

( इयत्ता ४ थी ) पाठ २ बोलणारी नदी 



Thursday, October 15, 2020

मायेची पाखर | इयत्ता ४ थी मराठी | स्वाध्याय | प्रश्नोत्तरे

                                                      मायेची पाखर 




 प्रश्न १ .एका वाक्यात उत्तरे लिहा .

१)पाहुण्यांनी अगोदर जेवायचे का नाकारले ?
उत्तर -वस्तीगृहातील मुलांनी बनवलेले जेवण चांगले नसेल म्हणून पाहुण्यांनी अगोदर जेवायचे नाकारले .

२)वस्तीगृहातील मुलांवर अण्णांची माया कोणा प्रमाणे होती ?
उत्तर - वस्तीगृहातील मुलांवर अण्णांची माया आई वडिलां प्रमाणे होती .

३)अण्णा आयुष्यभर कोणाच्या शिक्षणासाठी झटत राहिले ?
उत्तर - अण्णा आयुष्यभर गोरगरिबांच्या मुला मुलींच्या शिक्षणासाठी झटत राहिले .

४)कर्मवीर भाऊराव आणि कोणत्या शिक्षण संस्थेच्या माध्यमातून शाळा सुरू केल्या ?
उत्तर - कर्मवीर भाऊराव यांनी रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून शाळा सुरू केल्या.

5)लेखक कुठे जाण्यासाठी निघाले होते ?
उत्तर - लेखक पुण्याला जाण्यासाठी निघाले होते .

प्रश्न २ .गाळलेल्या जागी योग्य शब्द लिहा .

१)संस्थेच्या आवारात एक मोठे     वडाचे          झाड होते .

२)स्वतःची     कांबळी            त्याच्या अंगावर घातली .

३)त्या मुलांपैकी कितीतरी जणांना         आई नव्हती .

४) "अण्णा ,आपण खरेखुरे या मुलांचे           आईबाप          आहात .

प्रश्न ३ .कोण कोणाला म्हणाले ?
१) "आता इथंच मुक्काम करा ! "
उत्तर - असे भाऊराव लेखकांना म्हणाले .

२) " जा रे ,स्वयंपाक घरात काही शिल्लक असेल ते घेऊन ये बघू ! "
उत्तर - असे भाऊराव एका मुलाला म्हणाले .

३) " आपणांस उदंड आयुष्य मिळो ! "
उत्तर -असे लेखक भाऊरावांना म्हणाले .

प्रश्न ४ .थोडक्यात उत्तरे लिहा .

१)लेखक उपाशी आहेत हे समजल्यावर अण्णांनी काय केले ?
उत्तर - लेखक उपाशी आहेत हे कळल्यावर अण्णांनी एका मुलाला सांगितले , " जा ,रे स्वयंपाक घरात काही शिल्लक असेल ते घेऊन ये . "मुलाने धावत जाऊन स्वयंपाक घरातून पिठले ,भाकरी ,कांदा , तेल एका ताटात घेऊन आला व लेखकांना खायला दिले .

२)मध्यरात्रीनंतर कोणता प्रसंग घडला ?
उत्तर - मध्यरात्रीनंतर अण्णांनी उठून कंदील घेऊन वस्तीगृहातील प्रत्येक मुलाला झोप लागली की नाही हे पाहून त्यांच्या अंगावर पांघरून आहे का नाही ते पाहिले .एक मुलगा थंडीने कुडकुडत असलेला पाहून त्याला उचलून आपल्या बिछान्यावर आणून झोपवले .स्वतःची कांबळी त्याच्या अंगावर घातली .त्याला पोटाशी धरले त्यामुळे त्या मुलाला गाढ झोप लागली .

३)सकाळी उठल्यावर लेखकांच्या तोंडून कोणते उद्गार निघाले ?
उत्तर - रात्रीचा प्रसंग डोळ्यांनी पाहिल्यामुळे लेखक उठले व अण्णांना कडकडून भेटले व अण्णांना म्हणाले, "आपण खरेखुरे या मुलांचे आईबाप आहात .या मुलांचेच नव्हे तर या महाराष्ट्रातील गोरगरिबांच्या मुलांचे आपण पालक आहात आपणास उदंड आयुष्य  मिळो! "

प्रश्न ५ .वाक्प्रचार व त्याचा अर्थ यांच्या जोड्या जुळवा .
अ गट                                    ब गट
१ )टाळाटाळ करणे -            एखादी गोष्ट   
                                       करायची टाळणे

२)पोटात कावळे ओरडणे -  खूप भूक लागणे

३)डोळा लागणे -   झोप लागणे

४)झटत राहणे -  सतत प्रयत्न करणे

प्रश्न ६)लेखकांच्या पोटात कावळे ओरडत होते ,म्हणजे लेखकांना खूप भूक लागली होती.
            आता पुढील वाक्यातील अधोरेखित शब्दाचा अर्थ सांगा .

१)भरपूर जेवण झाल्यावर नाना अजगरासारखे पडून होते .
उत्तर - अजगरासारखे पडून होते -म्हणजे खाल्ल्यावर अजगर सुस्त पडून राहते त्याप्रमाणे नाना सुस्त पडून होते .

२)दुपारच्या वेळी हळूच खाऊ घेताना बंड्या अजिबात आवाज होऊ देत नाही ; म्हणून त्याला सगळे मांजरीच्या पायाचा म्हणतात .
उत्तर - मांजरीच्या पायाचा म्हणजे मांजराच्या पायाखाली आधी सारखा मऊ भाग असतो त्यामुळे मांजराच्या पायाचा आवाज होत नाही .

Most Important Contraction List

Most Important Contraction List Are not –> aren’t Can not –> can’t Could not –> couldn’t Did not –> didn’t Do not –> don’t Do...