Wednesday, September 23, 2020

वाक्प्रचार व त्यांचे वाक्यात उपयोग

 

💥वाक्प्रचार व वाक्यात उपयोग💥

        आपण काही वेळा बोलताना अशा शब्द समूहाचा वापर करतो, की ज्यांचा शब्दशः वा सरळ अर्थ न होता वेगळाच अर्थ होतो. माणसाच्या वर्तनावरून, स्वभावावरून , परिसरातील वस्तूंवरून तसेच शारीरिक अवयवांवरून आधारित असे अनेक वाक्प्रचार तयार झालेले आहेत. अश्या वाक्प्रचारांचा वाक्यात उपयोग समजून घ्या.


अटक करणे :- खूप परिश्रम करून पोलिसांनी अट्टल गुन्हेगाला अटक केली.

अपशब्द वापरणे :- चंदूचा अमरला धक्का लागताच, अमरने चंदूविषयी रागाने अपशब्द वापरले.

अग्निदिव्य करणे :- वचन पाळण्यासाठी प्रभुरामचंद्रांना चौदा वर्षे वनवास भोगून अग्निदिव्य करावे लागले.

अचंबा वाटणे :- भर उन्हात पाऊस पडला, याचा लहानश्या मुलाला अचंबा वाटला.

अभिमान वाटणे :- आलोक स्कॉलरशिप परीक्षेत सर्वप्रथम आला, याचा बाबांना अभिमान वाटला.

अटकाव करणे :- धरणाच्या ठिकाणी आंदोलन करण्यास सरकारने लोकांना अटकाव केला.

अठराविश्व दारिद्र्य :- कमवणारे कोणी नसल्यामुळे वावेरकार कुटुंबात अठराविश्व दारिद्र्य होते.

अनुकरण करणे :- लहान मुले नेहमी मोठ्या माणसांचे अनुकरण करतात.

अभिप्राय देणे :- मी लिहिलेला निबंध चांगला आहे, असा सरांनी अभिप्राय दिला.

अभिवादन करणे :- १५ ऑगस्टला आम्ही विद्यार्थ्यांनी तिरंग्याला एकसाथ अभिवादन केले.

अवलंबून असणे :- शिष्य नेहमी गुरूच्या ज्ञानावर अवलंबून असतो.

अवगत होणे :- एक महिना अभ्यासाने कॉम्प्युटर कसा चालवावा, याची कला राजेशला अवगत झाली.

अंगवळणी पडणे :- सुरुवातीला सायकल चालवताना मोहन घाबरला होता; पण हळूहळू सायकल चालवणे त्याच्या अंगवळणी पडले.

अंगी बाळगणे :- माणसाने दुसऱ्याकडचे चांगले गुण नेहमी अंगी बाळगावेत.

अंगीकार करणे :- महात्प्रयासाने स्वातीने सासरच्या चालीरीतींचा अंगीकार केला.

अंग चोरणे :- आपले अंग चोरून महादूने मालकांना वाट करून दिली.

अंत होणे :- पावनखिंडीत बाजीप्रभू देशपांडे यांचा अंत झाला.

अंतर न देणे :- शेठजींनी दामू या आपल्या नोकराला कधीही अंतर दिले नाही.

अंदाज बांधणे :- मोहनच्या पडलेल्या चेहऱ्यावरून तो नाराज झाला आहे, असा आईने अंदाज बांधला.

आकलन होणे :- काकांनी समजावून सांगितले की, बऱ्याचशा कठीण गोष्टींचे मला आकलन होते.

 

वाक्प्रचार व वाक्यात उपयोग

आनंदाचे भरते येणे : पहिल्यांदा समुद्रकिनारा पाहिल्यामुळे नीताला आनंदाचे भरते आले.

आरोळ्या ठोकणे :- क्रिकेटमध्ये जिंकल्यावर मुलांनी आनंदाने आरोळ्या ठोकल्या.

आव्हान देणे :- गुप्त कारस्थान करणाऱ्या शत्रूला भारतीय सेनेने आव्हान दिले.

आयात करणे : जावा-सुमात्रा बेटावरून भारत मसाल्यांच्या पदार्थांची आयात करतो.

आवाहन करणे : 'पूरग्रस्तांना मदत करा' असे चाळ कमिटीने प्रत्येक भाडेकरूला आवाहन केले.

आळशांचा राजा :- रमेश काहीच काम करत नाही, दिवसभर लोळत असतो. तो म्हणजे आळशांचा राजा आहे.

आश्चर्य वाटणे :- या दिवाळीत गावामध्ये खुप फटाके फुटल्याने मला आश्चर्य वाटले.

आश्चर्याने तोंडात बोटे घालणे :- अपंगांची शर्यत पाहून रोहणने आश्चर्याने तोंडात बोटे घातली.

आश्चर्यचकित होणे :- सर्कशीतील नाचणारा हत्ती बघून प्रेक्षक आश्चर्यचकित झाले.

आज्ञा पाळणे :- आईवडिलांची व गुरुजनांची आज्ञा पाळावी.

औक्षण करणे : दिवाळीला अभ्यंगस्नान केल्यावर आईने मला औक्षण केले.

इलाज नसणे : अतिरेक्यांनी भारताचे एवढे नुकसान केले की त्यांच्यावर कडक कारवाई करण्याशिवाय सरकारकडे इलाज नव्हता.

उत्कट प्रेम असणे :- माझे माझ्या शाळेवर उत्कट प्रेम आहे.

उत्कंठेने वाट पाहणे :- बऱ्याच वर्षांनी माहेरी येणाऱ्या नलूची राधाबाई उत्कंठेने वाट पाहत होत्या.

उगम पावणे :- त्र्यंबकेश्वराच्या डोंगरात गोदावरी नदी उगम पावते.

उचलली जीभ लावली टाळ्याला :- राजेश प्रत्येक गोष्टीत आपल्याला ज्ञान आहे असाच वागतो. म्हणतात ना, उचलली जीभ लावली टाळ्याला.

उत्तीर्ण होणे :- प्रमोद एम.बी.बी.एस. परीक्षेत उत्तम गुणांनी उत्तीर्ण झाला.

उदरनिर्वाह करणे :- कमालीचे कष्ट उपसून दामू आपला उदरनिर्वाह करत होता.

उन्हे उतरणे :- उन्हे उतरताना आई शेतातून घरी आली. 

ऋण फेडणे :- गरिबांची सेवा करून प्रत्येकाने समाजाचे ऋण फेडले पाहिजे.

एकजीव होणे :- गावातील रस्ता तयार करताना गावकऱ्यांनी एकजीव होऊन काम केले.

वाक्प्रचार व वाक्यात उपयोग

एकटा पडणे :- वर्गात वीरुशी कोणी बोलत नसल्यामुळे तो एकटा पडला.

एक होणे :- सर्व भारतीयांनी एक होऊन दहशतवादाचा बीमोड केला पाहिजे.

ऐट दाखवणे :- नवीन कपडे घालून छोटा राजू सर्वांना ऐट दाखवत होता.

कदर करणे :- बादशहाने बिरबलाच्या चातुर्याची नेहमी कदर केली.

करुणा उत्पन्न होणे : रामूचे दारिद्र्य पाहून सर्वांच्या मनात करुणा उत्पन्न झाली.

कमाल करणे :- नाटकात सुंदर अभिनय करून विनिताने अगदी कमाल केली.

कच खाणे :- माथेरानला दरीत उतरताना चंदूच्या मनाने कच खाल्ली.

कचरणे :- रात्रीच्या वेळी जंगलातून प्रवास करायला पर्यटकांचे मन कचरले.

कपाळमोक्ष होणे :- गच्चीवरून कोसळल्यामुळे गच्चीत काम करणाऱ्या कामगाराचा कपाळमोक्ष झाला.

कलाटणी मिळणे : मधुकर नौदलात भरती झाला आणि त्याच्या आयुष्याला एकदम कलाटणी मिळाली.

कष्टाचे खाणे :- शेतकरी शेतात राब राब राबतो व कष्टाचे खातो.

कळी खुलणे :- आजीने आणलेली सुंदर सुंदर खेळणी पाहून लहानग्या शीतलची कळी खुलली.

कंबर कसणे :- भारतमातेला पारतंत्र्याच्या जोखडातून सोडवण्यासाठी क्रांतीकारकांनी कंबर कसली.

काबाडकष्ट करणे :- मामीने आपल्या मुलाला काबाडकष्ट करून शिकवले.

काटकसर करणे :- तुटपुंज्या पगारात महिन्याचा खर्च करताना रेखाकाकू काटकसर करत होत्या.

कातड्याचे जोडे घालणे :- सुरज नोकर सावकारांना म्हणाला, "माझ्या मुलीच्या लग्नासाठी तुम्ही पैसे दिलेत, तर मी तुम्हांला माझ्या कातड्याचे जोडे घालीन."

काबीज करणे :- छत्रपती शिवाजी महाराजांनी कुमारवयातच तोरणा गड काबीज केला.

कागाळी करणे :- सुचिताने पुस्तक फाडले, अशी नीताने आईकडे कागाळी केली.

कानात वारे शिरणे :- बऱ्याच दिवसांनी मोकळ्या मैदानात आणल्यावर कुत्र्याच्या पिलाच्या कानात वारे शिरले.

कामगिरी करणे :- बाजीप्रभू देशपांडेंनी पावनखिंड लढवून शिवाजी महाराजांनी त्यांच्यावर सोपवलेली कामगिरी बजावली.

वाक्प्रचार व वाक्यात उपयोग

कालबाह्य ठरणे :- दूरदर्शनच्या वाढत्या प्रसारामुळे हल्ली रेडिओ कालबाह्य ठरू लागला आहे.

काहूर उठणे : पृथ्वीवर धूमकेतू आदळणार, या अफवेचे लोकांमध्ये काहूर उठले.

कामाचे चीज होणे :- मिडलस्कूल परीक्षेत राहुल प्रथम आल्यामुळे त्याने रात्रंदिवस केलेल्या कामाचे चीज झाले.

काया झिजवणे :- मदर तेरेसांनी अनाथ बालकांसाठी आयुष्यभर आपली काया झिजवली.

काळजी घेणे :- छत्रपती शिवाजी महाराज आपल्या प्रजेची मुलाप्रमाणे काळजी घेत होते.

काळजात चर्र होणे :- कोसळलेल्या इमारतीची बातमी वाचून सुनंदाच्या काळजात चर्र झाले.

काळजाला हात घालणे :- मेधा पाटकर यांनी धरणग्रस्तांची बाजू कळकळीने मांडून लोकांच्या काळजाला हात घातला.
    
कृतघ्न असणे :- स्वतः कष्ट करून राधाबाईने रामला शिकवले, पण त्यांच्या म्हातारपणी दूर जाऊन तो कृतघ्न ठरला.

कैद करणे :- शाळेतील मुलांनी अभ्यास होण्या साठी स्वताला कैद करून घतले.

किंमत करणे :- पोशाखावरून नाही; पण एखाद्या माणसाच्या बोलण्यावरून त्याची किंमत करावी.

कुवत असणे :- न थकता दहा किलोमीटर धावण्याची राजेशची कुवत होती.

कुशल चिंतणे :- देवाला नवस करून कुमारकाकींनी आपल्या मुलाच्या आरोग्यासाठी कुशल चिंतीले.

कुरकुर करणे :- सहलीला जायला मिळाले नाही; म्हणून राजू दिवसभर कुरकुर करत होता.

कुरवाळणे :- संध्याकाळी परतलेल्या गाईला वासुदेव मायेने कुरवाळतो.

कूस धन्य करणे :- छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापून जीजामातेची कूस धन्य केली.

कोरडे ठणठणीत पडणे :- आमच्या गावचा ओढा भर उन्हाळ्यात कोरडा ठणठणीत पडतो.

कौतुक वाटणे :- मुग्धा एवढ्या लहान वयात उत्तम गाते याचे सर्वांना कौतुक वाटते.

खजील होणे :- चोरी उघडकीस आल्यावर रामू खजील झाला.

ख्याती असणे :- उत्तम धावपटू म्हणून पी.टी. उषा यांची ख्याती आहे.

खटके उडणे :- मीरा व रमा या जुळ्या बहिणींचे एकाच वस्तूवरून नेहमी खटके उडतात.

खळीला येणे :- दहा फेऱ्यांनंतरही निकाल लागला नाही; तेव्हा दोन्ही पहिलवान खळीला आले.

वाक्प्रचार व वाक्यात उपयोग

खंडाने जमीन घेणे :- शामुकाकांनी इनामदारांची पडिक जमीन खंडाने घेतली.

खडा न खडा माहिती :- आमच्या मुख्याध्यापकांना शाळेच्या कामकाजाची खडान्खडा माहिती आहे.

खांद्याला खांदा लावून काम करणे :- शाळेचे बांधकाम करताना गावकऱ्यांनी खांद्याला खांदा लावून काम केले.

खेटून उभे राहणे :- लहानगा शरद आपल्या आईला अगदी खेटून उभा होता.

खेद प्रदर्शित करणे :- लोकलगाड्या वेळेवर धावत नसल्यामुळे स्टेशन मास्तरांनी प्रवाशांकडे खेद प्रदर्शित केला.

खेळ रंगात येणे :- शाळेला सुट्टी असते, तेव्हा लहान मुलांचा खेळ रंगात येतो.

खोड मोडणे :- हात सोडून सायकल चालवणारा राजू जेव्हा एकदा सपाटून आपटला, तेव्हा त्याची खोड मोडली.

गप्पांना भरती येणे :- खूप दिवसांनी काकु घरी आल्यामुळे त्यांच्या व आईच्या गप्पांना भरती आली.

गयावया करणे :- चोर स्वताला सोडण्या साठी पोलिसांकडे गयावया करत होता.

गलबलणे :- रेल्वे दुर्घटनेतील जखमी प्रवासी पाहून माणसे गलबलली.

गर्दी पांगवणे :- पोलिसांनी अपघाताच्या ठिकाणी झालेली गर्दी पांगवली.

गट्ट करणे :- येज्ञेशने डब्यातील ठेवलेले दहा लाडू एका दमात गडप झाला.

गस्त घालणे :- चोरीमारी होऊ नये; म्हणून स्टेशनवर पोलीस गस्त घालत होते.

गडप होणे :- वाघाला पाहून रानातला हरिणांचा कळप लगेच गडप झाला.

गर्भगळीत होणे :- दोन पावलांवर अचानक आलेल्या सापाला बघून बबन गर्भगळीत झाला.

गरज भागणे :- शाळेतील वाचनालयामुळे शरदची अभ्यासाची गरज भागली.

गहजब उडणे :- गावात वाघ मोकाट सुटला हे ऐकून रात्री गावात एकच गहजब उडाला.

गहिवरणे :- वीस वर्षांनंतर आपल्या मुलाला पोटाशी धरताना पार्वतीकाकू गहिवरल्या.

गळा घोटणे :- दागिन्यांच्या हव्यासापायी चोराने रात्री आमच्या शेजारच्या काकूंचा गळा घोटला.

गाडी अडणे :- एका इंग्रजी शब्दाच्या अर्थापाशी मधुराची गाडी अडली.

गांगरून जाणे :- जत्रेतील तुफान गर्दी बघून छोटा बबन गांगरून गेला.

गाढ झोपणे :- आईच्या मांडीवर बाळ गाढ झोपला होता.

वाक्प्रचार व वाक्यात उपयोग

गाव गोळा होणे : गरुडीचा खेळ पाहण्यासाठी गाव गोळा झाला.

गाडून घेणे :- शर्यतीच्या स्पर्धेसाठी दिलीपने स्वतःला सरावात गाडून घेतले.

गोंगाट करणे :- शाळेला सुट्टी असल्यामुळे दुपारच्या वेळी मुले मैदानात गोंगाट करत होतो.

गौरव करणे :- शालान्त परीक्षेत जिल्ह्यात पहिली आल्यामुळे मुख्याध्यापकांनी अमृताचा गौरव केला.

घाम गाळणे :- शेतकरी दिवसभर शेतात घाम गाळतात.

घायाळ होणे :- झाडावरून खाली पडल्यामुळे चिमणीचे पिल्लू घायाळ झाले.

घोकत बसणे :- शेजारचा मधू संस्कृत शब्द घोकत बसला होता.

घोकंपट्टी :- उद्या भाषेचा पेपर म्हणून अमित आजपासूनच घोकंपट्टी करत होता.

चक्कर मारणे :- मी गावी गेलो की, संध्याकाळी नदीकाठी चक्कर मारतो.

चरणांवर मस्तक ठेवणे :- वारीला गेलेले वारकरी श्रीविठ्ठलमूर्तीच्या चरणांवर मस्तक ठेवतात.

चाचपडत राहणे :- वीजकपातीमुळे अंधारात म्हातारे भाऊकाका चाव्यांचा जुडगा हुडकण्यासाठी चाचपडत राहिले होते.

चांगले दिवस येणे :- मुलगा कामाला लागला आणि दरेकर कुटुंबाला चांगले दिवस आले.

चिडीचूप होणे :- सर वर्गात येताच गडबड करणारी मुले चिडीचूप झाली.

चेव चढणे :- शत्रूचे सैन्य दिसताच भारतीय जवानांना चेव चढला.

छाया शोधणे :- भर उन्हात चालता चालता चालता महेश दमला व छाया शोधू लागला.

जग कळणे : वयाच्या दहाव्या वर्षीच महादूला 

जाहीर करणे :- उद्या पाणी येणार नाही, असे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी जाहीर केले.

जिवाचे सोने होणे :- दोन्ही मुले चांगली शिकल्यामुळे काशीबाईंच्या जिवाचे सोने झाले.

जीवदान देणे :- महाराजांनी रायरीच्या पाटलांना जीवदान दिले.

जीवावर येणे :- वीस माणसांचा स्वयंपाक करणे, हे राधाबाईच्या अगदी जीवावर आले.

जीव मेटाकुटीला येणे :- रात्रभर काम करून सीताकाकूंचा जीव मेटाकुटीला आला.

वाक्प्रचार व वाक्यात उपयोग

जीव सुखावणे :- मुलगा स्कॉलरशिप परीक्षेत पहिला आला, हे ऐकून स्वातीबाईंचा जीव सुखावला.

झडप घेणे :- घारीने कोंबडीच्या पिलांबर वरून झडप घेतली.

डोक्यावरचे ओझे उतरणे :- पुरामध्ये रामरावाचे घर वाहून गेले नाही, असे कळताच त्यांच्या भावाच्या डोक्यावरचे ओझे उतरले.

डोळा चुकवणे :- लहानगा राजू आईचा डोळा चुकवून खेळायला गेला.

डोळे भरून येणे :- परदेशात चाललेल्या विनयला पाहून आईचे डोळे भरून आले.

डोळे ओले होणे :- चित्रपटातील करुण प्रसंग पाहताना प्रेक्षकांचे डोळे ओले झाले.

डोळे पाण्याने डबडबणे :- सासरी निघालेल्या मुलीला निरोप देताना राधाकाकुंचे डोळे पाण्याने डबडबले.

डोळ्यांत पाणी येणे :- ताईला सासरी धाडताना आईच्या डोळ्यांत पाणी आले.

डोळ्यांतून टिपे गळणे :- दहा वर्षांनी आईने संजयला पाहिले आणि तिच्या डोळ्यांतून टिपे गळू लागली.

डोळ्यांवर येणे :- क्रांतिकारकांनी केलेले गुप्त कट ब्रिटिश पोलिसांच्या डोळ्यांवर आले.

डोळे दिपणे :- इंद्रधनुष्य पाहून नीताचे डोळे दिपले.

डोळे पुसणे :- मदर तेरेसांनी कित्येक दुःखितांचे डोळे पुसले.

तणतणणे :- मधुराला आईने सहलीला जाऊ दिले नाही; म्हणून ती आईवर तणतणली. 

तडे पडणे :- पाऊस न पडल्यामुळे आमच्या गावातील शेतजमिनीला तडे पडले.

तहानभूक हरपणे :- खेळायला मिळाले, की राजेशची तहानभूक हरपते.

तर्क करणे :- बंडू पुण्याला गेलाय म्हणजे नक्कीच आत्याकडे गेला असणार, असा अमरने तर्क केला.

तडाखा बसणे :- गेल्या वर्षी गावाला महापुराचा तडाखा बसला.

ताजेतवाने होणे :- सकाळच्या हवेत फिरून आल्यावर मी ताजातवाना झालो.

ताण येणे :- उद्या होणाऱ्या मिडलस्कूल स्कॉलरशिप परीक्षेचा मीनाच्या मनावर ताण आला.

तावडीतून सुटणे :- हिसका मारून चोर पोलिसांच्या तावडीतून सुटला.

ताप सरणे :- पहिला पाऊस पडताच जमिनीचा ताप सरला.

वाक्प्रचार व वाक्यात उपयोग

ताब्यात देणे :- कट्टर अतिरेक्याला लोकांनी पोलिसांच्या ताब्यात दिले.

तांबडे फुटणे :- तांबडे फुटले की शेतकरी शेतामध्ये कामाला जातात.

तोंडचे पाणी पळणे :- रानामध्ये दोन पावलांवर अचानक मोठा साप बघून सहलीला गेलेल्या मुलांच्या तोंडचे पाणी पळाले.

तोंडघशी पडणे :- कोलांट्या उद्या मारता मारता मधू तोंडघशी पडला.

तोंडातून चकार शब्द न काढणे :- सर राजेशवर रागावले, तेव्हा त्याने तोंडातून चकार शब्द काढला नाही.

तुच्छ वाटणे :- अभ्यासापुढे संजयला खेळणे तुच्छ वाटते.

तुडुंब भरणे :- पावसामध्ये आमच्या गावची विहीर तुडुंब भरते.

त्रेधा-तिरपीट उडणे :- संध्याकाळी येणारे पाहुणे सकाळीच आल्यामुळे मंदाची त्रेधा-तिरपीट उडाली.

त्याग करणे :- गांधीजींच्या आदेशानुसार सर्व अनुयायांची विदेशी कपड्यांचा त्याग केला.

थक्क करणे :- एकापाठोपाठ एक असे शंभर सूर्यनमस्कार करून रामूने सर्वांनाच थक्क केले.

थट्टा करणे : सर्व दोस्तांमध्ये राजू बुटका असल्यामुळे सगळे त्याची थट्टा करत.

थाप मारणे :- सिनेमा बघायला गेलेल्या सुधीरने 'मी मित्राकडे अभ्यास करत होतो,' अशी आईला थाप मारली.

थारा देणे :- अकबर बादशहाने सर्व कलावंतांना दरबारात थारा दिला.

दगा न देणे :- चांगल्या मित्राला कधीही दगा देऊ नये.

दर्शन घेणे :- आग्र्याला जाऊन आम्ही ताजमहालाचे दर्शन घेतले.

दाद मागणे :- आपल्यावर झालेल्या अन्यायाची रामरावांनी कोर्टात दाद मागितली.

दिवस रेटणे :- पतीचे निधन झाल्यावर काशीबाईनी कसे तरी दिवस रेटले.

दिलासा देणे :- बॉम्बस्फोटामुळे उद्ध्वस्त झालेल्या कुटुंबांना प्रंतप्रधानांनी दिलासा दिला.

दुजोरा देणे :- हिवाळ्यात सहल काढायची, या गुरुजींच्या म्हणण्याला वर्गातील सर्व मुलांनी दुजोरा दिला.

देखरेख करणे :- रात्री आमचा वॉचमन सोसायटीची देखरेख करतो.

देवाणघेवाण करणे :- धर्मपरिषदेमध्ये प्रतिनिधींनी एकमेकांच्या विचारांची देवाणघेवाण केली.

वाक्प्रचार व वाक्यात उपयोग

देह झिजवणे : स्वातंत्र्यवीर सावरकरांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी आपला देह झिजवला.

देहभान हरपणे : पावसात भिजताना मुले देहभान विसरतात.

धड न समजणे : शाळेत आलेले परदेशी पाहुणे काय बोलत होते ते आम्ही मुलांना धड समजत नव्हते.

धडा शिकवणे :- पोलिसांनी चोरांना गजाआड करून चांगलाच धडा शिकवला.

धन्य होणे :- देवाचे दर्शन होताच संत नामदेव धन्य झाले.

धडे देणे : रामभाऊंनी मुलाला मोठ्या माणसांशी कसे नम्रतेने वागावे, याचे धडे दिले.

धपाटे घालणे :- उजळणी आली नाही की माझे मामा पाठीत धपाटे घालायचे.

ध्यास घेणे : लहान वयातच राहुलने बुद्धिबळपटू होण्याचा ध्यास घेतला.

धारण करणे :- लहानपणच्या नरेंद्राने मोठेपणी स्वामी विवेकानंद हे नाव धारण केले.

धाडस दाखवणे :- मनोहरने एकट्याने विहिरीत उडी मारण्याचे धाडस दाखवले.

धाप लागणे :- धावण्याच्या शर्यतीत जोरात धावल्यामुळे रोहितला धाप लागली.

धूम धावत सुटणे :- शाळा सुटताच मुले धूम धावत सुटली.

नक्कल करणे :- स्नेहसंमेलनात उदयने सरांची अगदी हुबेहूक नक्कल केली.

नजर ठेवणे :- अतिरेक्यांच्या कारवायांवर पोलिसांनी नजर ठेवली होती.

नवल वाटणे :- अबोल असलेला संजय उमेशची तक्रार करताना भडाभडा बोलताना पाहून त्याच्या आत्याला नवल वाटले.

नजर चुकवणे : आईची नजर चुकवून राजू खेळायला गेला.

नमूद करणे : पुण्याला सोळा सेंटिमीटर पाऊस पडला, असे वेधशाळेने उमूद केले.

नाव गाजने : सचिन तेंडुलकरमुळे साऱ्या जगात भारताचे नाव गाजले.

नाशवंत असणे :- या जगात कोणतीही गोष्ट अमर नाही, ती नाशवंत आहे.

निरीक्षण करणे : मी काढलेल्या चित्राचे बाईंनी निरीक्षण केले.

निष्ठा असणे : मोहितची आपल्या गुरुजींच्या बुद्धिमत्तेवर खूप निष्ठा होती.

वाक्प्रचार व वाक्यात उपयोग

निपचित पडून राहणे :- दोन दिवस आलेल्या तापामुळे लहानगे बाळ निपचित पडून होते.

पदवी देणे : वेस्ट इंडीजचे महान क्रिकेटपटू गॅरी सोबर्स यांना 'सर' ही पदवी देण्यात आली.

पर्वा नसणे : क्रांतिवीरांनी देशाच्या स्वातंत्रासाठी आपल्या जीवाची पर्वा केली नाही.

पश्चात्ताप होणे : ज्या खंडूने वर्गात पहिला नंबर काढला, त्या खंडूला आपण खेडवळ म्हणून हसलो होतो याचा सलीलला पश्च्यात्ताप झाला.

पंखात वारं भरणे :- शालान्त परीक्षेनंतर आय.टी. क्षेत्रात चमकायचे, या विचाराने संदीपच्या पंखात वारं भरलं.

पाया पडणे : संध्याकाळी हातपाय धुऊन देवाच्या पाया पडावे.

पाय ओढणे :- सगळ्यांनी एकदम प्रगती करावी, कोणीही कुणाचे पाय ओढू नयेत.

पायाशी बसणे :-गावी गेलो की, माझे बाबा नेहमी आजोबांच्या पायाशी बसत.

पार पडणे :- गेल्या आठवड्यात आमच्या शाळेचे स्नेहसंमेलन पार पडले.

पाळेमुळे खोल रुजणे :- गाव सोडताना आईला दु:ख झाले; कारण या गावाच्या संस्कृतीत तिची पाळेमुळे खोल रुजली होती.

पोट भरणे : महादू दिवसरात्र कष्ट करून आपले पोट भरतो.

पोटाला चिमटा घेणे : पोटाला चिमटा घेऊन काकूंनी राजला उच्च शिक्षण दिले.

पोशिंदा असणे : साऱ्या मराठमोळ्या रयतेचे छत्रपती शिवाजी महाराज पोशिंदा होते.

प्रत्युत्तर देणे : बाबांनी विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाला श्याम प्रत्युत्तर देत होता.

प्रसंग बेतणे : पाऊस न आल्यामुळे शेतकऱ्यांवर दुष्काळाचा प्रसंग बेतला.

प्रविष्ट होणे :- सत्यनारायणाची महापूजा घातली आणि नंतरच सर्वजण नवीन घरात प्रविष्ट झाले.

प्राणाचे बलिदान करणे :- भारताच्या स्वातंत्र्यासाठी अनेक क्रांतिकाराकांनी प्राणाचे बलिदान केले.
पाय धरणे : हातून घडलेल्या चुकीबद्दल बबनने राकाशेटचे पाय धरले.

प्रेमाचा भुकेला असणे :- अनाथाश्रमातील मुले प्रेमाची भुकेली असतात.

पिंगा घालणे :- मंगळागौरी खेळताना माहेरी आलेल्या सुमनने सुंदर पिंगा घातला.

फावला वेळ मिळणे : फावला वेळ मिळाला की, माझी आई वाचन करते.

वाक्प्रचार व वाक्यात उपयोग

फेरफार करणे :- मी लिहिलेल्या निबंधामध्ये गुरुजींनी फार चांगले फेरफार केले.

फिर्याद करणे : जमिनीच्या संबंधात दामूकाकांनी शेजाऱ्यावर फिर्याद केली.

बहुमान मिळणे : आंतरशालेय स्पर्धेत सर्वाधिक बक्षिसे पटकावणाऱ्या उमाला स्नेहसंमेलनाच्या अध्यक्षपदाचा बहुमान मिळाला.

बडगा दाखवणे :- चोरांनी गुन्हा कबूल करावा म्हणून पोलिसांनी त्यांना कडक शिक्षेचा बडगा दाखवला.

बळकटी येणे :- संदर्भग्रंथांचे वाचन करून वक्त्याच्या विचारांना बळकटी येते.

बाजूस सारणे :- ओजस्वीने टेबलावरचे दप्तर बाजूला सारले.

बारा महिने तेरा काळ :- वामनरावांची देवपूजा अगदी बारा महिने तेरा काळ सुरूच आसरे.

बाजार भरणे :- सुट्टीमध्ये मामाच्या घरी आम्हा पोरांचा बाजार भरला होता.

बालेकिल्ला असणे :- अकोला शहर हे तर उमेदवार विष्णुपंतांचा बालेकिल्ला होता.

बावचळणे :- समोरून अचानक आलेला हत्ती पाहून अनुश्री एकदम बावचळली.

बुचकळ्यात पडणे :- आईला अचानक रडताना पाहून मोहन बुचकळ्यात पडला.

बेभान होणे :- मोठ्या भावाच्या वरातीमध्ये रघू बेभान होऊन नाचला.

भाळी असणे :- दिवसभर काबाडकष्ट करणे हेच आमच्या आजीच्या भाळी होते.

भांबावून जाणे :- आईचे बोट सुटल्यामुळे जत्रेमध्ये गर्दीत छोटा राहुल भांबावून गेला.

भीतीने थरथरणे : विहिरीत बुडणाऱ्या मुलाला वर काढले, पण तो भीतीने थरथरत होता.

भुकेने तडफडणे : तीन दिवस उपाशी असल्यामुळे भिकारी भुकेने तडफडत होता.

भुलून जाणे : ते सुंदर निसर्गचित्र पाहून सरिता भुलून गेली.

भूल पडणे : राजेशनने काढलेली सुंदर चित्रे बघून सोहनच्या मनाला भूल पडली.

भेदरणे :- विहिरीत पडलेले मूल खूप भेदरले होते.

मन रमणे : कुमारचे पोहण्यात मन रमते.

मन उचंबळणे :- गोव्याचा मोठा समुद्रकिनारा पाहून स्मिताचे मन उचंबळले.

वाक्प्रचार व वाक्यात उपयोग

मनाई असणे : भर पावसात बोटींना खोल समुद्रात जाण्यास मनाई असते.

मशागत करणे : चांगले पीक येण्यासाठी शेतकरी आपल्या शेतांची मशागत करतात.

मस्तक आदराने लवणे : स्वांतत्र्यवीरांच्या कहाण्या ऐकताना आपले मस्तक आदराने लवते.

माघार घेणे : भारतीय सैन्याने चाल केल्यामुळे शत्रूच्या सैनिकांनी माघार घेतली.

मान डोलवणे : सहलीला यायचे का, असे राजूला विचारताच त्याने मान डोलवली.

मातीजमा होणे :- पिकांवर रोग पडल्यामुळे शेतातील पिके एकेक करून मातीजमा झाली.

मान खाली घालणे :- पोलिसांनी धमकावताच चोराने मान खाली घातली.

मान देणे :- आमच्या सरांना गावातील लोक खूप मान देतात.

मान हलवणे :- 'सहलीला जायचे ना' असे गुरुजींनी विचारताच सर्वांनी मान हलवली.

मुक्त करणे : गुन्हा शाबित न झाल्यामुळे न्यायालयाने चोराला मुक्त केले.

मुलूख थोडा करणे :- गावात दुष्काळ पडल्यामुळे गावकऱ्यांनी मुलूख थोडा केला.

मृत्यू पावणे : जन्माला येणारा प्रत्येक माणूस कधी ना कधी मृत्यू पावतो.

मोह होणे : देवासमोरचे लाडू चोरण्याचा स्वप्नीलला मोह झाला.

मौन पाळणे : शैलाने विवेकानंद जयंतीला दिवसभर मौन पाळले होते.

याचना करणे :- दोन घासांसाठी रस्त्यावरचा भिकारी येत्या-जात्या माणसाकडे हात पसरून याचना करत होता.

येरझारा घालणे :- रात्री अकरा वाजून गेले तरी मधू घरी परतला नाही, म्हणून बाबा अंगणातच येरझारा घालत होते.

रक्त उसळणे :- शत्रूवर हल्ला करण्यासाठी सैनिकांचे रक्त उसळले.

रद्द करणे :- अतिवृष्टीमुळे गुरुजींनी वर्षासहल रद्द केली.

रद्द होणे :- निवडणुकीमुळे एक मार्चला होणारी शालान्त परीक्षा रद्द झाली.

रमून जाणे : सुरेश खेळात नेहमी रमून जातो.

रवंथ करणे :- दुपारी झाडाच्या सावलीत गाईगुरे रवंथ करत बसतात.

वाक्प्रचार व वाक्यात उपयोग

रंगात येणे :- मधूकाका व अण्णा यांचा पत्त्यांचा डाव रंगात आला होता.

-हास होणे :- शिक्षणापासून वंचित राहिल्यामुळे पूर्वीच्या समाजाचा खूप -हास झाला.

राग येणे :- चंदूने पुस्तक फाडले म्हणून राजीवला त्याचा राग आला.

राजी असणे :- रडणाऱ्या महेशला सर्कसला जाऊया, म्हणताच तो पटकन राजी झाला.

राब राब राबणे :- महादू हमालीचे काम करताना रात्रंदिवस राब राब राबतो.

रूढ होणे :- 'स्टेशन' हा इंग्रजी शब्द मराठीत अगदी रूढ झाला आहे.

रुसून बसणे :- आईने खाऊ दिला नाही म्हणून संजय रुसून बसला.

लगबग असणे :- शेजारच्या काकूंच्या घरात मुलीच्या लग्नाची लगबग होती.

लाभ होणे :- शिवरामकाकांना लॉटरी लागून अचानक पैशांचा लाभ झाला.

लुप्त होणे :- आकाशात दाटून आलेल्या ढगांमध्ये चंद्र लुप्त झाला.

लौकिक मिळवणे : स्वातीने उत्कृष्ट टेनिस खेळून जगात लौकिक मिळवला.

वचन देणे :- मी कधीही नापास होणार नाही, असे अमितने आईला वचन दिले.

वर्गवारी करणे :- निबंध-स्पर्धेसाठी सरांनी वयोगटाप्रमाणे मुलांची वर्गवारी केली.

वाटेकडे कान लावून बसणे :- आई खाऊ घेऊन येईल, या आशेने दोन लहान मुले उंबरठ्यातच आईच्या वाटेकडे कान लावून बसली होती.

वाईट वाटणे :- सुरेश नापास झाल्यामुळे रमेशला वाईट वाटले.

वाळीत टाकणे :- पंचायतीने दिलेला निर्णय पाळला नाही, म्हणून गावाने सोसवार कुटुंबाला वाळीत टाकले.

विचार कृतीत उतरवणे :- महात्मा फुले यांनी मुलींसाठी शाळा काढून आपले विचार कृतीत उतरवले.

विचारपूस करणे : सुट्टीत आम्ही कोकणात आत्याकडे गेलो तेव्हा तिने आमची विचारपूस केली.

विचारविनिमय करणे :- परेशला कोणत्या महाविद्यालयात घालायचे, याबद्दल त्याच्या आईवडिलांनी विचारविनिमय केला.

विचारात बुडून जाणे :- प्रमोदच्या समोर येऊन उभा राहिलो तरी त्याचे माझ्याकडे लक्ष गेले नाही, एवढा तो विचारात बुडून गेला होता.

वाक्प्रचार व वाक्यात उपयोग

विसर पडणे :- पाश्चिमात्य पद्धतींचा अंगीकार करताना जुन्या चांगल्या प्रथांचा आम्हांला विसर पडला आहे.

विळखा घालणे :- अफझलखानाच्या सैन्याने प्रतापगडला विळखा घातला.

विश्रांती घेणे : दुपारच्या वेळी माझे बाबा विश्रांती घेतात.

वेष पालटून फिरणे : पूर्वीचे राजे लोकांचे सुखदुःख जाणून घेंण्यासाठी आपल्या राज्यातून वेष पालटून फिरायचे.

वेळ वाया जाणे : वेळ हे धन आहे; ते वाया जाऊ देऊ नये.

वैषम्य वाटणे :- आंधळ्या म्हातारीला आपण रस्ता पार करायला मदत केली नाही, याचे सदूला वैषम्य वाटले.

व्याख्यान देणे : बाबा महाराज सातारकरांनी शाळेच्या पटांगणात 'ज्ञानेश्वरी' वर व्याख्याने दिली.

शब्द देणे : मी कधीच नापास होणार नाही, असा आशिषने आईला शब्द दिला.

शब्द फिरवणे : महात्मा गांधीना दिलेला शब्द कस्तुरबांनी एकदा फिरवला.

शब्द मोडणे : पुन्हा शाळेत उशिरा येणार नाही, असे सांगूनही आज मोहनने गुरुजींना दिलेला शब्द मोडला.

शब्दाला कृतीचे तारण असणे : निबंध-स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवून सुमनने शब्दाला कृतीचे तारण दिले.

शड्डू ठोकणे :- रिंगणात उतरताच रघू पहिलवानाने प्रतिस्पर्ध्यासमोर शड्डू ठोकला.

शरमिंदा होणे :- रामुकाकांकडे पुन्हा पैसे उसने मागताना दामू शरमिंदा झाला.

शान वाढवणे :- १९८३ साली क्रिकेटचा विश्वचषक जिंकून कपिलदेवने भारताची शान वाढवली.

शिफारस करणे : रवीतात्याने आपल्या दोस्ताकडे उमेश चांगले काम करतो, अशी शिफारस केली.

शिकवण देणे :- 'स्वच्छता हा परमेश्वर आहे,' अशी महात्मा गांधींनी आपल्याला शिकवण दिली.

शिगेला पोहोचणे :- 'असंभव' मालिकेत शास्त्र्यांच्या वाड्याचे काय होणार, याची उत्सुकता अगदी शिगेला पोहोचली.

शिंग फुंकणे :- जुलमी इंग्रजांविरुद्ध क्रांतिकारकांनी शिंग फुंकले.

शीण घालवणे :- कामावरून थकून आलेल्या दामोदरपंतांनी फक्कड चहा पिऊन शीण घालवला.

शीण येणे :- दिवसभर टेबलावर लिखाणाचे काम करून दामूकाकांना शीण आला.

शोषण करणे :- बरेचसे गिरणीमालक कामगारांचे शोषण करत असत.

वाक्प्रचार व वाक्यात उपयोग

सक्रिय सहभाग घेणे :- रक्तदान शिबिरामध्ये गावकऱ्यांनी सक्रिय सहभाग घेतला.

सढळ हाताने मदत करणे :- आईने दारी आलेल्या साधूला सढळ हाताने मदत केली.

सन्मान करणे :- राज्यात निबंध स्पर्धेत पहिले पारितोषिक मिळवल्याबद्दल मुख्याध्यापकांनी रेश्माचा सन्मान केला.

सर्रास वापरणे :- सुधाकर आपल्या वाडीलभावाचे बूट सर्रास वापरतो.

सल्ला देणे :- बाबांनी मला स्कॉलरशिपच्या परीक्षेला बसण्याचा सल्ला दिला.

सहकार्य करणे :- एकमेकांना सहकार्य करून गावकऱ्यांनी गावातील रस्ता बांधला.

सवलत देणे :- गरीब विद्यार्थ्यांना प्राचार्यांनी फीमध्ये सवलत दिली.

संकल्प सोडणे :- उद्यापासून पहाटे उठून अभ्यास करण्याचा शीलाने संकल्प सोडला.

संथा चुकणे :- सर्कस पाहायला गेल्यामुळे रामूची रोजची संथा चुकली.

संपादन करणे :- डॉ. आंबेडकरांनी परदेशात जाऊन 'बॅरिस्टर' ही पदवी संपादन केली.

साथ देणे : वर्ग स्वच्छ करताना मीनाला सविताने साथ दिली.

सार्थ ठरणे : लता मंगेशकर यांच्याबाबतीत 'गानकोकिळा' ही पदवी सार्थ ठरली.

सामना करणे :- कोकणातील लोक दारिद्र्याशी सामना करतात.

साय खाणे :- बालपण कष्टात गेलेल्या मधूचे आता चांगले दिवस आल्यामुळे तो साय खातो.

सुतासारखा सरळ करणे : चोराला कडक शिक्षा करून पोलिसांनी त्याला सुतासारखा सरळ केला.

सुधारणा होणे : शेतीच्या पद्धतीमध्ये हळूहळू सुधारणा झाली.

सुविधा असणे : ए.टी.एम. बँकेच्या ग्राहकांनी कधीही पैसे काढण्याची सुविधा आहे.

सुगावा लागणे :- अतिरेकी काहीतरी घातपात करणार आहेत, याचा पोलिसांना सुगावा लागला.

सूर धरणे : कीर्तनाच्या आधी भजनीबुवा गात असताना आम्हीही सूर धरला.

सूर मारणे :- कडक उन्हामध्ये नदीकाठावरची मुले नदीमध्ये सूर मारत होती.

सेवा करणे : हेमाने आपल्या आजारी आईची मनोभावे सेवा केली.

वाक्प्रचार व वाक्यात उपयोग

सेवा पुरवणे : काही संस्था घरपोच भाजी पाठवण्याची सेवा पुरवतात.

स्वप्न साकार करणे : चंद्रावर जाण्याचे माणसाचे स्वप्न साकार झाले.

सुधारणा होणे : शेतीच्या पद्धतीमध्ये हळूहळू सुधारणा झाली आहे.

स्वागत करणे : विवेकानंद जयंतीला आमच्या शाळेत आलेल्या प्रमुख पाहुण्यांचे मुख्याध्यापकांनी स्वागत केले.

स्तब्ध राहणे :- तळटळीत दुपारी झाडाची सर्व पाने स्तब्ध राहिली होती.

स्मारक बांधणे :- गावासाठी आयुष्यभर झिजणाऱ्या सुधाकरराव घोरपड्यांचे गावकऱ्यांनी मरणोत्तर स्मारक बांधले.

स्वाहा करणे :- दामूने समोर ठेवलेल्या परातभर जिलब्या स्वाहा केल्या.

हजेरी घेणे : ऑफिसमधून घरी परतल्यावर बाबांनी अभ्यासाबाबत माझी हजेरी घेतली.

हवेहवेसे वाटणे : खूप वर्षांनी गावाहून आलेल्या आजीचा सहवास तुषारला हवाहवासा वाटत होता.

हद्दपार करणे :- महात्मा फुले यांनी जुन्या जाचक रूढींना हद्दपार केले.

हयगय करणे :- पहाटे पहाटे उठून व्यायाम करण्यासाठी सुधीर हयगय करू लागला.

हयात सरणे :- इनामदारांच्या वाड्यावर चाकरी करता करता दामूकाकांची हयात सरली.

हमी देणे :- या औषधाने उंदीर नक्की मरतील, अशी औषधविक्रेत्याने रामरावांना हमी दिली.

हारीने बसणे :- पाऊस पडून गेल्यावर आपले पंख सुकवण्यासाठी कावळे तारेवर हारीने बसले होते.

हिंमत देणे :- आजारातून उठलेल्या नितीनला परीक्षेला बसण्यासाठी सरांनी हिंमत दिली.

हुकूम करणे :- न्यायाधीशांनी गुन्हेगारांना कोर्टात हजर करण्याचा पोलिसांना हुकूम केला.

हुकूमत येणे :-बरीच मेहनत केल्यामुळे मनोजला सफाईदारपणे इंग्रजी बोलण्यावर हुकूमत आली.

हुडहुडी भरणे : ऐन हिवाळ्यात महाबळेश्वरला हेमंतला हुडहुडी भरली.

हेका धरणे :- सुमितने (बाबांकडे) सुट्टीमध्ये गावाला जाण्याचा हेका धरला.

हेटाळणी करणे :- प्रमिलाकाकू आपल्या सावत्र मुलीची सारखी हेटाळणी करतात.

क्षमा मागणे :- 'पुन्हा गडबड करणार नाही,' असे म्हणून माधवने सरांची क्षमा मागितली.

 

Saturday, September 19, 2020

Words Starts With "C" | English Vocabulary

 Words Starts With "C" | English Vocabulary


C
Co

माझी परिसर अभ्यासिका क्रमांक ६ ( इयत्ता १ ली )

माझी परिसर अभ्यासिका क्रमांक ६ ( इयत्ता १ ली ) 



Wednesday, September 16, 2020

!! संस्कारक्षम संतती ही संपत्ती !! - लेखन:- श्री स्वप्नील शंकर पाटील ( प्रबोधनकारी व्याख्याते )

 

!! संस्कारक्षम संतती ही संपत्ती !!

                   लेखन :- श्री स्वप्नील शंकर पाटील

                                     कोरोनाच्या महामारीने आपली ‘ न भूतो’ अशी परिस्थिती केली आहे. मागील सहा महिन्यांपासून ‘लॉकडाऊन’ आहोत. व्यापार, व्यवसाय , दळणवळण यांसह शिक्षण क्षेत्रावरही याचा परिणाम झाला आहे, हे नाकारता येणार नाही. शिक्षण पुरवणाऱ्या शाळा बंद आहेत.आमची मुलं घरात आहेत. ‘शाळा बंद म्हणजे शिक्षण बंद’ अशी धारणा असणाऱ्या आपल्या सारख्या कित्येकांच्या मनात मुलांच्या भविष्याची चिंता जागली आहे. आता आमच्या मुलांचं कसं होणार ? या प्रश्नाने अक्षरशः जनमन ढवळून निघाले आहे. पण मुळात प्रश्न असा आहे की . शिक्षणकसं बंद होऊ शकतं? शिक्षण हि अनंतकाळ चालणारी प्रक्रिया आहे . त्याच्याही पुढे जाऊन शिक्षण हि सर्वक्षेत्री चालणारी प्रक्रिया आहे . शिक्षण म्हणजे व्यक्तिमत्वाचा विकास ही बाब मनात पक्की झाली की,  शिक्षण सर्व घटकांतून घेता येते . पशु , पक्षी , प्राणी अवघा निसर्गच आपला गुरुबनतो.

              शाळा हे अभ्यासक्रमपूर्ण करण्याचे माध्यम आहे आणि अभ्यासक्रमातून अपेक्षित मूल्य , संस्कार , नीती, यांची रुजवणूक ही परिसरातून होते. मी कितीही म्हटलं की मी शाळेत ‘प्रामाणिकपणा’ शिकलो , पण हा प्रामाणिकपणा जर मला माझ्या अवतीभोवती दिसला नाही तर त्या गुणाची रुजवणूक होऊच शकत नाही. मनुष्य हा अनुकरणशील आहे. निरीक्षणातून अनुकरण आणि अनुकरणातून व्यक्तिमत्वाची जडणघडण  होत असते. एवढी साधी गोष्ट लक्षात आली तर शिक्षण हे शाळेच्या चार भिंती आड होण्यापेक्षा ते बाह्य परिसरात अधिक होते हे लक्षात येते. याचा अर्थ शाळेतील शिक्षणटाळावे असा नाही तर शाळा हे समाजाचे लघुरूप आहे . समाजात कसे वावरावे याचे प्रशिक्षणशाळा देते . या प्रशिक्षणाचे प्रत्यक्ष अवलंबन मुल त्याच्या भोवतीच्या परिसरात करत असते.

                 सध्या शाळा बंद आहेत . मात्र शिक्षण ( अभ्यासक्रम ) सुरु राहावे यासाठी अनेक शाळांनी ऑनलाईन शिक्षण पद्धतीला सुरुवात केली आहे.शाळा शाळेचे कर्तव्य पार पाडत आहे. पण पालक म्हणून माझीही काही कर्तव्य आहेत ती मला पार पाडता यायला हवी.मागील काही महिन्यांपासून आपण आपल्या मुलांसहित घरी आहोत. महत्वाचे म्हणजे ‘मुलांसोबत’ आहोत. हा काळ मुलांना ओळखायला, पारखायला आणि घडवायला पूरक आहे. आमच्या धावपळीच्या आयुष्याला आलेला कोरोनारूपी ब्रेक आम्हाला मूळ रस्त्यावर घेऊन आलेला आहे. पालक म्हणून मुलांसमवेत वेळ घालवण्यासाठी मिळालेला हा काळ आहे. मुलांवर संस्कारघडविण्याचे काम आई करते. ते आईनेच करावे असे हि नक्कीच नाही पण आईविषयी मुलाची ओढ अनामिक व स्वाभाविक असते. त्यामुळे आईचा प्रभाव मुलांवर अधिक असतो आणि म्हणूनच आईने संस्कार करावेत अशी अपेक्षा धरली जाते. पण येथे महत्वाचा मुद्दा की , संस्कार हे घडवून होतात का हो ? तो संस्कार एखादी ठराविक व्यक्तीच करू शकते का ? नाही. मुळात संस्कार करून होत नसतात तर ते आपोआप घडत असतात.फक्त ते घडविण्यासाठीचे वातावरण आपल्याला तयार करावे लागते .आपण आपल्या पाल्यासमोर कोणते वातावरण उभे केले आहे या वरून त्याच्यावर कोणता संस्कार होणार आहे हे ठरत असते .आता आपण आपल्याला हवे तसेच वातावरण निर्माण करू शकतो का? म्हणजे बघा , बाजारात जातांना त्याने दोन गुंड गटांची मारामारी पाहिली, एखाद्या गल्लीत त्याने शिव्या देणारी मुलं पाहिली , टीव्ही वर त्याने मद्यपान करणारे हिरो पाहिले, या साऱ्यांचा काहीतरी परिणाम त्याच्यावर होणारच .मग हे वातावरण आपण बदलू शकत नाही पण या वातावरणामधील योग्य-अयोग्य, चांगल-वाईट , सत्य-असत्य हे आपण त्याला वेळीच पटवून दिले पाहिजे. त्याच्या मनात सकारात्मकता निर्माण होईल अशा पद्धतीने त्याला समजावले पाहिजे.

                      साडेतीनशे वर्षापूर्वी सुलतानशाहीच्या दहशतीखाली समाज भेदरलेलं आयुष्य जगत होता.तेव्हा मासाहेब  जिजाऊनी आपल्या शिवबाला दहशत न दाखवता ‘अन्याय’ समजावला. व न्यायासाठीची विवेकबुद्धी जागृत करून शिवबाघडवला.जिजाऊ पूर्वी येथील आयांनी आपल्या मुलांना दहशत स्वीकारून अन्याय भोगायलाच जणू तयार केले होते पण जिजाऊनी शिवबासमोर उभी ठाकलेली परिस्थिती दाखवून त्यातील न्याय अन्याय हि बाजू पटवून दिली. यातूनच पुढे ‘जाणता राजा ‘ घडला.

                   अर्थात प्रत्येक प्रसंगी आम्ही आमच्या मुलांसमवेत असूच असे नाही पण ज्या ज्या वेळी मी असेन त्या त्या वेळी कळत नकळत सुजाण पालक म्हणून मला माझ्या मुलाच्या सभोवतालच्या प्रसंगांचे विश्लेषण करताच यायला हवे .

                  अनेकदा पालक आणि मुलं यांचा संवाद न झाल्याने मुलांना पडलेल्या प्रश्नांची उत्तरे मुलं समवयस्क मित्रांकडे शोधू लागतात.समवयस्क मित्र हा त्याच्याच विचार पठडीतला असल्याने गंभीर प्रश्नाला चुकीचे उत्तर मिळते.आणि यातूनच चुकीचे वर्तन घडते.

                पूर्वी एकत्र कुटुंब पद्धतीमुळे आजी-आजोबा , काका-काकू यांसारख्या वडिलधाऱ्यासमवेत असत. अलीकडे आई-वडील कामाला , मुलं शाळेत . नंतर घरी एकटेच असतात. मग पडलेल्या प्रश्नांची उत्तरे विचारणार कोणाला ? आपण ‘नाळ’ हा चित्रपट पाहिला असेल. त्यातील चैतन्यला पडणाऱ्या प्रश्नांची उत्तरे त्याच्या शेजारी राहणारा मुलगा देतो. ‘ माझी आई कधी रडली असेल का रे?’ या चैतन्यच्या एका प्रश्नासाठी त्या मुलांनी केलेले दिव्य पाहिले की लक्षात येते , वेळीच एखाद्या मोठ्या व्यक्तीजवळ त्या मुलांनी बोलणे केले असते तर ?

                   काम ,क्रोध, माया , लोभ, मत्सर हे स्वाभाविक विकार आहेत.ह्यांना वेळीच दिशा देण्याचे काम करायला हवे. राग येणे वाईट नाही तर तो कशा पद्धतीने व्यक्त केला यावर त्याचे वाईटपण ठरते हे आपण पटवून मग मुलांना पटवून द्यायला हवे. माझ्या रागाने किती आणि कोणाचे नुकसान अथवा भले होणार आहे याचा सारासार विचार करण्याची बुद्धी आपण मुलांमध्ये तयार करायला हवी .अवतीभोवती घडणारे खून बलात्कार चोरी या घटना का घडतात? मुलं ह=गुन्हेगारीकडे का वळतात याचं एक उत्तर आहे . आम्ही विकारांना सकारात्मक वळणदेऊ शकलो नाही.

                   सुजाण पालक म्हणून आपण मुलांना वेळ देऊ, सुसंवाद साधू . स्वप्न देऊ स्वप्नांना पंख देऊ आणि पंखात बळ भरू .कारण,


आपली संतती हीच खरी आपली संपत्ती आहे !!”

 

 

                                                                  *लेखक परिचय *
                                                                               श्री.स्वप्नील शंकर पाटील
                                                                                        ( प्रबोधनकारी व्याख्याते )
                                                                                                   शिक्षण :-एम.ए.बी.एड/डी.एड

140 Examples Of Compound Words | English Grammar



 💥140 Examples Of Compound Words💥

What Is Compound Words:  When Two Words are used together to yield a new meaning, a compound is formed. Sometimes, more than two words can form a compound (e.g: mother-in-law). The most common spelling quandary writers face is whether to write compounds as separate words, one word, or hyphenated words.

1) Aboveboard

2) Afternoon

3) Afterbath

4) Afterburner

5) Afterglow

6) Afterimage

7) Afterlife

8) Aftermath

9) Airbrush

10) Aircraft

11) Airfield

12) Airlift

13) Airline

14) Airliner

15) Airmail

16) Airman

17) Airmen

18) Airplane

19) Airport

20) Airship

21) Airtime

22) Allover

23) Allspice

24) Alongside

25) Also

26) Another

27) Anybody

28) Anyhow

29) Anymore

30) Anyone

31) Anyplace

32) Anything

33) Anytime

34) Anyway

35) Anywhere

36) Armchair

37) Armpit

38) Around

39) Arrowhead

40) Ashtray

41) Authorship

42) Babysitter

43) Backache

44) Backbite

45) Backbone

46) Backbreaker

47) Backdrop

48) Backfield

49) Backfire

50) Background

51) Backhand

52) Backlash

53) Backlog

54) Backpack

55) Backside

56) Backslap

57) Backslide

58) Backspace

59) Backspin

60) Backstage

61) Backstop

62) Backstretch

63) Backstroke

64) Backtrack

65) Backword

66) Ballpark

67) Ballroom

68) Bankbook

69) Bankroll

70) Baseball

71) Basketball

72) Beachcomb

73) Became

74) Because

75) Become

76) Bedbug

77) Bedclothes

78) Bedrock

79) Bedroll

80) Bedroom

81) Bellbottom

82) Bellboy

83) Bellhop

84) Below

85) Blackball

86) Blackberries

87) Blackbird

88) Balckboard

89) Blackjack

90) Blacklist

91) Blackmail

92) Blackout

93) Blacksmith

94) Blacktop

95) Bluebell

96) Blueberry

97) Bluebird

98) Bluefish

99) Bluegrass

100) Blueprint

101) Boardwalk

102) Bodyguard

103) Bodywork

104) Boldface

105) Bookbinder

106) Bookcase

107) Bookend

108) Bookkeeper

109) Booklet

110) Bookmark

111) Bookseller

112) Bookshelf

113) Bookstore

114) Bookworm

115) Bookstrap

116) Bowtie

117) Brainchild

118) Brainstorm

119) Brainwash

120) Bugspray

121) Buttercup

122) Butterfat

123) Butterfingers

124) Butterflies

125) Buttermilk

126) Butternut

127) Butterscotch

128) Bypass

129) Cabdriver

130) Candid

131) Candlelight

132) Candlestick

133) Cannot

134) Cardboard

135) Cardsharp

136) Carefree

137) Caretaker

138) Careworn

139) Carfare

140) Cargo

Most Important Contraction List

Most Important Contraction List Are not –> aren’t Can not –> can’t Could not –> couldn’t Did not –> didn’t Do not –> don’t Do...