Monday, April 26, 2021

Most Important Contraction List



Most Important Contraction List


Are not –> aren’t

Can not –> can’t

Could not –> couldn’t

Did not –> didn’t

Do not –> don’t

Does not –> doesn’t

Had not –> hadn’t

Have not –> haven’t

He is –> he’s

He will –> he’II

He would –> he’d

He had –> he’d




Here is –> here’s

I am –> I’m

I have –> I’ve

I will –> I’d

Is not –> isn’t

It is –> it’s

It has –> it’s

It will –> it’II

Must not –> mustn’t

She is –> she’s

She has –> she’s

She will –> she’ll

She would –> she’d

Should not –> shouldn’t

That is –> that’s

There is –> there’s

They are –> they’re

They have –> they’ve

Was not –> wasn’t



We are –> we’re

We have –> we’ve

We will –> we’II

We would –> we’d

Were not –> weren’t

What is –> what’s

Who is –> who’s

Who will –> who’II

Will not –> won’t

You are –> you’re

You will –> you’II

You would –> you’d

You had –> you’d


Wednesday, April 21, 2021

इंग्रजीमध्ये प्रश्न कसे विचारावेत ?




 इंग्रजीमध्ये प्रश्न कसे विचारावेत ?



               कोणतीही भाषा शिकताना वा कोणतेही ज्ञान संपादन करताना प्रश्नांना विशेष महत्व असते. तुम्ही प्रश्न कसे विचारता त्यावर उत्तरे अवलंबून असतात. हीच उत्तरे ज्ञान मिळवून देतात.
म्हणजेच उत्तरातूनच ज्ञान मिळते. ज्या माध्यमातून ज्ञान मिळवले जाते 'ते' प्रश्न विचारण्याच्या विशिष्ट पद्धती आहेत.

               त्या पद्धती कोणत्या ते आपण पाहू.




               मराठीत, काय?  कोण?  कोठे?  कसे?  कोणाचे?  कशाचे?  कशासाठी?  कोणासाठी? असे शब्द प्रश्न विचारताना वापरतात . तर इंग्रजीत What, Who, Where, When, How, Whom, Whose हे शब्द वापरतात. 
               
                'हे काय आहे' असा प्रश्न एखाद्या वस्तूची माहिती मिळवून देतो. 

What Is this ? असा इंग्रजी प्रश्न एखाद्या जवळच्या वस्तूचे अस्तित्व दर्शवितो. जवळची वस्तू कोणती आहे ?    मग तिथे पुस्तक असेल , पेन असेल , एखादे फुल असेल वा अन्य काहीही असेल. This is a Flower.     This is a book.     This is a pen.     This is a doll.     This is a lamp.

                 'ते काय आहे ?' लांबची वस्तू कोणती आहे असे विचारण्यासाठी हा प्रश्न आहे .
What is that?  ते झाड आहे , ती मुलगी आहे , तो पोपट आहे,   ती आगगाडी आहे.  तो कुत्रा आहे. 

That is a tree.    That is a girl.     That is a parrot.    That is a train.    That is a dog.       

                  अनेक वचनी वस्तुच्या संदर्भातली माहिती These व Those च्या माध्यमातून याच पद्धतीने मिळविता येते.

What are these fruits?                         These are mangoes.        
What are those animals?                     Those are cows. .
असे सुमारे ५० शब्द घेवून This, That, These, Those च्या रचनांचा सराव करावा. 




What is your name? My name is Suresh,   Ramesh,   Seeta,   Sangeeta,   Asif 
अशी रचना उत्तरे देताना करा व मग What is his name? असा प्रश्न विचारा. उत्तर His name is Ganpat, Manoj वगैरे. 

मग What is her name? तिचे नांव काय? मग त्यांची नांवे काय? What are their names ? What is your father? तुझे वडील काय काम करतात? माझे वडील पुस्तक विक्रेते आहेत. 
My father is a Farmer.

कुणाचे वडील Doctor, Barber, Engineer, Watchman, Policeman वा जो उद्योग, नोकरी करत असतील तर तो लिहायचा व अशी २५/३० वाक्ये करायची.

What do you want? तुला काय हवे? I want a pencil. मला पेन्सिल हवी. 

What do you like? तुला काय आवडते? I like tea. मला चहा आवडतो. कुणी म्हणेल मला 'रसना' आवडते. कुणाला कॉफी आवडेल. मांजराला दूध आवडते. A cat likes milk. 

What ने सुरु होणारे प्रश्न विचारताना काळाचे भान ठेवावे लागते. 
What do you want?  म्हणजे तुला काय हवे? 
आता, तुला काय हवे? (असा अर्थ) वर्तमानकाळात तुला काय हवे? परंतु भूतकाळाचा संदर्भ हवा असेल तर प्रश्न तशा प्रकारे विचारावा लागेल. अशा वेळी do या कियापदाच्या भूतकाळी रुपाचा वापर करावा लागतो. 
पहा.          What did the boy want?               The boy wanted a new bicycle. 
                 मुलाला काय हवे होते?                        त्याला नवीन सायकल हवी होती.  





भूतकाळाच्या संदर्भातील माहिती मिळविण्यासाठी What ने प्रश्न विचारलात तर What च्या पुढे Did (did) हे do चे भूतकाळी रूप घालावे, पुढे कर्ता घालावा व शेवटी मूळ क्रियापद घालावे.

उदा. शरदने गोष्टींचे पुस्तक आणले. 
ही माहिती तुम्हाला मिळवायची असेल तर १ नंबरला What, त्यापुढे did. नंतर Sharad हा कर्ता व शेवटी bring हे (मूळ) क्रियापद 

प्रश्न : What did Sharad bring?
उत्तर :- Sharad brought a story book.


आता उत्तर देताना मात्र १ नंबरला कर्ता, (Sharad),   २ नंबरला क्रियापदाचा भूतकाळ (hring -brought). नंतर कर्म (काय आणले?) a story book

प्रश्नवाहक वाक्य मूळ क्रियापद सोबत घेऊन  येते तर उत्तर असलेले वाक्य त्या क्रियापदाच्या भूतकाळी रुपाला सोबत आणते. 
तू कुठे राहतोस ? खातोस काय? करतोस काय? हे वर्तमानकाळी प्रश्न इंग्रजीत Where do you live?    What do you eat?      What do you do? असे विचारावे. 
तर भूतकाळी    Where did you live?    What did you eat?      What did you do? 
असे विचारावे (तू राहिलास कुठे? खाल्लस काय? केलेस काय?)

When do you come to school?    तू शाळेत केव्हा येतोस? 
तुझ्या शाळेचे हेडमास्तर कोण आहेत?    Who is the headmaster of your school? 




खाली To go हे क्रियापद तिन्ही काळात चालवून प्रश्नार्थक वाक्ये कशी करायची ते दाखवले
आहे.

साधा वर्तमानकाळ:-
I go                              -      Do I go?

We go                          -      Do we go?

You go                         -      Do you go ?

He goes                       -      Does he go ?

She goes                     -      Does she go ?

It goes                         -      Does it go ?

They go                       -      Do they go ?


चालू वर्तमान काळ:-
I am going                   -      Am I going? 

You are going             -      Are you going?

He,she,It is going       -      Is He going ?

They are Going          -      Are they going ?


पूर्ण वर्तमान काळ:-
I have gone                   -          Have I gone?

He, She, It has gone    -          Has he/she/it gone?

They have gone           -          have they gone?


साधा भूतकाळ :-
I went                            -         Did I go?

You went                      -         Did you go?

He, She, It went          -         Did he, she, it go?

They went                    -         Did they go?


चालू भूतकाळ :-
I was going                        -         was I going?

were you going?               -          werw you going?

Was he, she, It going?      -         was he,she, it going?

They Were going               -          Were they going?


पूर्ण  भूतकाळ :-
I had gone                          -           Had I gone?

You had gone                    -          Had you gone ?

He,she,it had gone            -          Had he/she/It gone?

They had gone                   -          Had they gone?


साधा भविष्यकाळ :-
I shall go                              -          shall I go?

You will go                          -           Will you go?

He,she,it will go                 -           Will he, she, It go?

They will go                        -            Will they go?


चालू भविष्यकाळ:-
I shall be going                  -             Shall I be going?

You will be going               -            Will you be going?

He will be going                 -            Will he be going?

They will be going             -            Will they be going?


पूर्ण भविष्यकाळ:-
I shall have gone                -            Shall have I gone?

You will have gone             -            Will have you gone?

He will have gone               -            Will have he gone?

They will have gone           -            Will have they gone?




वरील वाक्ये सूत्र म्हणून पाठ करावीत. त्यातून काळांची उजळणी होईल. 

30 English Classroom Phrases | English Learning




30  English Classroom Phrases





  • What page are we on?
  • I am ready. May I start it?
  • Can I go out?
  • Can I answer the question?
  • Can I switch off the lights?
  • Teacher, please can you repeat again?
  • Can I open the window?
  • Can we pack our things now?
  • May I join the class/group?
  • What is the homework?
  • Do we have to write this down?
  • Sorry, for being late.
  • May I open / close the window?
  • Can I go to the board?
  • Can I come in?


  • Can you explain it once more, please?
  • May I go out please?
  • Is this right?
  • Is this correct?
  • Can you speak louder, please?
  • Which book?
  • Can you explain that again?
  • When is the exam?
  • When is the homework for?
  • I have done this.
  • Can I go to the toilet?
  • Can I pull up the blinds?
  • Can I pulldown the blinds?
  • Can you help me, please?
  • I am sorry. I did not here.



100 Most Important Words In English | English Learning.




100 Most Important Words In English 

English Learning.


1. Amount

2. Argument

3. Be

4. Beautiful

5. Belief

6. Cause

7. Certain

8. Chance

9. Change

10. Clear

11. Common

12. Comparison

13. Copy

14. Decision

15. Degree

16. Development

17. Different

18. Do

19. Education

20. End

xxxxxxxxx

21. Event

22. Examples

23. Existence

24. Experience

25. Fact

26. Fast

27. Fear

28. Feeling

29. Fiction

30. Force

31. Form

32. Free

33. General

34. Get

35. Give

36. Good

37. Govern

38. Happy

39. Have

40. History

41. Idea

42. Important

43. Invest

44. Knowledge

45. Law

46. Let

47. Level

48. Living

49. Love

50. Make

51. Material

52. Measurement

53. Mind

54. Motion

55. Name

56. Nation

57. Natural

58. Necessary

59. Normal

60. Number

61. Observe

62. Opposite

63. Order

64. Organization

65. Part

66. Place

67. Pleasure

68. Possible

69. Probable

70. Proper

71. Purpose

72. Quality

73. Question

74. Reason

75. Respect

76. Responsible

77. Right

78. Same

79. Say

80. Science

81. See

82. Sense

83. Sign

84. Simple

85. Society

86. Sort

87. Suspect

88. Special

89. Substance

90. Thing

91. Thought

92. True

93. Use

94. Walk

95. Way

96. Wise

97. Word

98. Work

99. Yield

100. Zenit


Tuesday, April 20, 2021

SILENT LETTERS IN ENGLISH | Learning English



SILENT LETTERS IN ENGLISH


Silent letters are letters that you can’t hear when you say the word, but that are there when you write the word.

Silent letters may give an insight into the meaning or origin of a word, e.g. vineyard suggests vines more than the phonetic ‘vinyard’ would.

Silent letters help to show long vowels e.g. rid/ride

Silent letters help to show ‘hard’ consonants e.g. guest/gest

They can help to connect different forms of the same word e.g. resign/resignation


Silent Letters In English

B

Bomb , crumb,  debt,   doubt,   limb,   numb,   trumb,   subtle,  Comb.

K

Knee,  know,  knight,  knife,  knob,  knock,  knowledge,  knot.

L

Talk,  walk,  half,  Palm,  chalk,  calm,  salmon,   would,  should

H

Ghost,  Honest,  Hour,   rhythm,  whether,  while,  when

C

Abscess,  abscend,  ascent,  conscience,  conscious,  descend,  descent,  fascinate.

G

Align,  assign,  consign,  design,  foreign,  gnat,   High,  Light,


Second semester Online Exam | Environmental Studies | Standard One

 


Second semester Online Exam 

Environmental Studies 

 Standard One

Second Semester Online Exam | English | Standard One

 


Second Semester Online Exam 

English 

 Standard One

Sunday, April 18, 2021

वाक्प्रचार आणि त्यांचे अर्थ |


 ◆वाक्प्रचार आणि त्यांचे अर्थ◆

·       अटकेपार झेंडा लावणे - फार मोठा पराक्रम गाजवणे.

·       अपूर्व योग येणे - दुर्मिळ योग येणे.

·       अभिलाषा धरणे - एखाद्या गोष्टीची इच्छा बाळगणे.

·       अभंग असणे - अखंड असणे.

·       अमलात आणणे - कारवाई करणे.

·       अप्रूप वाटणे - आश्चर्य किंवा कौतुक वाटणे.

·       अनभिज्ञ असणे - एखाद्या विषयाचे मुळीच ज्ञान नसणे.

·       अट्टहास करणे - आग्रह धरणे.

·       अवाक् होणे – आश्चर्यचकित होणे.

·       अजरामर होणे - कायमस्वरूपी टिकणे.

·       अनमान करणे - संकोच करणे.

·       अठरा विश्वे दारिद्र्य असणे - पराकोटीचे दारिद्र्य असणे.

·       अर्धचंद्र देणे - हकालपट्टी करणे.

·       अडकित्त्यात सापडणे - पेचात सापडणे.

·       अत्तराचे दिवे लावणे - भरपूर उधळपट्टी करणे.

·       अन्नास जागणे - उपकाराची आठवण ठेवणे.

·       अन्नास मोताद होणे - आत्यंतिक दारिद्र्यात जगणे.

·       अन्नास लावणे - उपजीविकेचे साधन मिळवून देणे.

·       अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणे - थोड्याशा यशाने चढून जाणे.

·       अठरा गुणांचा खंडोबा - लबाड माणूस.

·       आयोजित करणे - सिद्धता करणे.

·       आखाडे बांधणे - मनात आराखडा किंवा अंदाज करणे.

·       आत्मसात करणे – मिळवणे,अंगी बाणणे.

·       आवर्जून पाहणे - मुद्दामहून पाहणे.

·       आकाशाची कुऱ्हाड - आकस्मिक संकट.

·       आकांडतांडव करणे - रागाने आदळआपट करणे.

·       आकाश ठेंगणे होणे - अतिशय आनंद होणे.

·       आड येणे - अडथळा निर्माण करणे.

·       आकाश पाताळ एक करणे - फार मोठ्याने आरडाओरड करून थैमान घालणे.

·       आकाश फाटणे - चारी बाजूंनी संकटे येणे.

·       आकाशाला गवसणी घालणे - आवाक्याबाहेरची गोष्ट करण्याचा प्रयत्न करणे.

·       आगीत तेल ओतणे - भांडण किंवा वाद विकोपाला जाईल असे करणे.

·       आच लागणे - झळ लागणे.

·       आपल्या पोळीवर तूप ओढणे – साधेल तेवढा स्वतःचाच फायदा करून घेणे.

·       आभाळ कोसळणे - एकाएकी फार मोठे संकट येणे.  

·       आभाळाला कवेत घेणे - मोठे काम साध्य करणे.

·       आतल्या आत कुढणे - मनातल्या मनात दुःख करणे.

·       इतिश्री करणे - शेवट करणे.

·       उखाळ्या-पाखाळ्या काढणे – एकमेकांचे उणेदुणे काढणे किंवा दोष देणे.

·       उचलबांगडी करणे - एखाद्याला जबरदस्तीने हलवणे.

·       उंटावरून शेळ्या हाकणे - स्वतः सामील न होता सल्ले देणे, मनापासून काम न करणे,दूरवरून निर्देश देणे.

·       उदक सोडणे - एखाद्या वस्तूवरील आपला हक्क सोडून देणे.

·       उदास होणे - खिन्न होणे.

·       उसने बळ आणणे - खोटी शक्ती दाखविणे.

·       उताणा पडणे - पराभूत होणे.

·       उदास होणे - खिन्न होणे.

·       उपोषण करणे - लंघन करणे,उपाशी राहणे.

·       उत्पात करणे - विध्वंस करणे.

·       उसंत मिळणे - वेळ मिळणे.

·       उसने बळ आणणे - खोटी शक्ती दाखविणे.

·       उताणे पडणे - पराभूत होणे.

·       उच्छाद मांडणे - धिंगाणा घालणे.

·       ऊहापोह करणे - सर्व बाजूंनी चर्चा करून साधकबाधक विचार करणे.

·       उध्वस्त होणे - नाश पावणे.

·       उंबराचे फूल - क्वचित भेटणारी व्यक्ती.

·       उन्मळून पडणे - मुळासकट कोसळणे.

·       उन्हाची लाही फुटणे - अतिशय कडक ऊन पडणे.

·       उराशी बाळगणे - मनात जतन करुन ठेवणे.

·       उलटी अंबारी हाती येणे - भीक मागण्याची पाळी येणे.

·       उखळ पांढरे होणे - पुष्कळ फायदा होणे.

·       ऊर भरून येणे – गदगदून येणे.  

·       उष्ट्या हाताने कावळा न हाकणे - कधी कोणाला यत्किंचितही मदत न करणे.

·       एक घाव दोन तुकडे करणे - ताबडतोब निर्णय घेऊन गोष्ट निकालात काढणे.

·       ओनामा – प्रारंभ. अग्निदिव्य करणे - कठीण कसोटीला उतरणे.

·       ओढा असणे - कल असणे.

·       ओक्साबोक्शी रडणे - मोठ्याने आवाज करत रडणे.


·       अंग धरणे - लठ्ठ होणे.

·       अंगावर काटा येणे - भीती वाटणे.

·       अंग काढून घेणे - संबंध तोडणे.

·       अंगात वीज संचारणे – अचानक बळ येणे.

·       अंगाला होणे - अंगाला छान बसणे.

·       अंगवळणी पडणे – सवय होणे.

·       अंगाची लाही होणे – अतिशय संताप होणे,खूप राग येणे.

·       अंगी बाणणे – मनात खोलवर रुजणे.   

·       अंगावर काटा उभा राहणे - भीतीने अंगावर शहारे येणे.

·       अंगावर मूठभर मांस चढणे - धन्यता वाटणे.

·       अंगाचा तिळपापड होणे - अतिशय संताप येणे.

·       अंगावर शेकणे – नुकसान सोसावे लागणे.

·       अंगी ताठा भरणे – मगरुरी करणे.

·       अंथरूण पाहून पाय पसरणे – ऐपतीनुसार खर्च करणे.

·       अंग चोरणे – फारच होडे काम करणे.

·       आंदण देणे - देऊन टाकणे.

·       आंबून जाणे – विटून जाणे,थकणे. 

·       कणीक तिंबणे - खूप मार देणे.

·       कपाळ फुटणे - दुर्दैव ओढवणे.

·       कपाळाला हात लावणे – हताश होणे,निराश होणे.

·       कपाळमोक्ष होणे - मरण पावणे,अचानक झालेल्या अपघातामुळे उध्वस्त होणे.  

·       कान फुंकणे - दुसऱ्याच्या मनात किल्मिष निर्माण करणे,चुगली करणे.

·       कान उपटणे – कडक शब्दात समज देणे.

·       कागदी घोडे नाचविणे – फक्त लेखनात शूरपणा दाखविणे.

·       कानावर हात ठेवणे – नाकाबूल करणे,माहीत नसल्याचा बहाणा करणे.

·       कान टोचणे – खरमरीत शब्दात चूक लक्षात आणून देणे.

·       कानउघाडणी करणे – चुकीबद्दल कडक शब्दात बोलणे,कडक शब्दात चूक दाखवून देणे.

·       काखा वर करणे - आपल्याजवळ काही नाही असे दाखवणे.

·       कानाडोळा करणे - दुर्लक्ष करणे.

·       कानाने हलका असणे – काशावरही पटकन विश्वास ठेवणे.

·       कान निवणे – ऐकून समाधान होणे.

·       काढता पाया घेणे – विरोधी परिस्थिति पाहून निघून जाणे.

·       कानावर घालणे – लक्षात आणून देणे.

·       कायापालट होणे - स्वरूप पूर्णपणे बदलणे.

·       काट्याने काटा काढणे – एका शत्रूच्या सहाय्याने दुसर्‍या शत्रूचा पराभव करणे.

·       काट्याचा नायटा होणे – क्षुल्लक गोष्टीचा भयंकर परिणाम होणे.

·       कावराबावरा होणे – बावरणे.

·       कात्रीत सापडणे - दोन्ही बाजूंनी संकटात सापडणे.

·       कानशिलांची भजी होणे – गुच्चे मारून मारून कानशिलांचा आकार बदलणे.

·       काळीज उडणे - भीती वाटणे.

·       कुणकुण लागणे - चाहूल लागणे.

·       कच्छपी लागणे - नादी लागणे.

·       काळजाचे पाणी पाणी होणे - अतिदुःखाने मन विदीर्ण होणे.

·       कुत्रा हाल न खाणे - अतिशय वाईट स्थिती येणे.

·       कूच करणे - वाटचाल करणे.

·       काळजी घेणे – चिंता वाहने,आस्था असणे.

·       कटाक्ष असणे - कल असणे,भर असणे, जोर असणे.

·       कंपित होणे - कापणे थरथरणे.

·       कसून मेहनत करणे - खूप नेटाने कष्ट करणे.

·       कस लावणे - सामर्थ्य पणाला लावणे.

·       किरकिर करणे - एखाद्या गोष्टीबाबत सतत तक्रार करणे.

·       कारवाया करणे – कट करणे,कारस्थाने करणे.

·       कापरे सुटणे - घाबरल्यामुळे थरथरणे.

·       कहर करणे - अतिरेक करणे.

·       कोडकौतुक होणे - लाड होणे.

·       काळ्या पाण्याची शिक्षा - मरेपर्यंत कैद होणे.

·       काळ्या दगडावरची रेघ - खोटे न ठरणारे शब्द.

·       कंठस्नान घालने - ठार मारणे.

·       काकदृष्टीने पाहाणे – अतिशय बारकाईने व तीक्ष्ण नजरेने पाहाणे.

·       कंठशोष करणे - ओरडून गळा सुकवणे,उगाच घसाफोड करून खूप समजावून सांगणे.

·       कंठ दाटून येणे – गहिवरून येणे.

·       कंबर कसणे – जिद्दीने तयार होणे,एखाद्या गोष्टीसाठी हिम्मत करून तयार होणे.

·       कुंपणाने शेत खाणे – ज्याच्यावर जबाबदारी आहे अशा विश्वासातील माणसाने फसवणे.

·       केसाने गळा कापणे - वरकरणी प्रेम दाखवून कपटाने एखाद्याचा घात करणे.

·       कोंबडे झुंजवणे - दुसऱ्यांचे भांडण लावून आपण मजा पाहणे.

·       कोपरापासून हात जोडणे – काहीही संबंध न राहण्याची इच्छा प्रकट करणे. 

·       खडा टाकून पहाणे - अंदाज घेणे.

·       खपणे – कष्ट करणे,झिजणे.

·       खळखळ करणे - नाखुशीने सतत नकार देणे,टाळाटाळ करणे.

·       खंड न पडणे - एखादे कार्य करताना मध्ये न थांबणे.

·       खसखस पिकणे - मोठ्याने हसणे.

·       खूणगाठ बांधणे - निश्चय करणे.

·       खडे चारणे - शरण येण्यास भाग पाडणे.

·       खडे फोडणे - दोष देणे.

·       खापर फोडणे - एखाद्यावर निष्कारण ठपका ठेवणे.

·       खाजवून खरुज काढणे - मुद्दाम भांडण करू उकरून काढणे.

·       खायचे वांदे होणे - उपासमार होणे,खायला न मिळणे.

·       खाल्ल्याघरचे वासे मोजणे - उपकार करणाऱ्याचे वाईट चिंतिणे.

·       खितपत पडणे - क्षीण होत जाणे.

·       खो घालने - विघ्न निर्माण करणे. 

·       गळ्यात गळा घालणे – खूप मैत्री करणे.

·       गर्भगळीत होणे - अतिशय घाबरणे.

·       गळ्यातील ताईत होणे – अत्यंत आवडता होणे,अतिशय प्रिय असणे.

·       गाजावाजा करणे - प्रसिद्धी मिळविण्याचा प्रयत्न करणे.

·       गळ घालणे - अतिशय आग्रह करणे.

·       गळ्यात पडणे - एखाद्याला खूपच भीड घालने.

·       गळ्याशी येणे - नुकसानीबाबत अतिरेक होणे.

·       गाडी पुन्हा रुळावर येणे - चुकीच्या मार्गावरून पुन्हा पूर्ववत योग्य मार्गाला येणे.

·       गुजराण करणे - निर्वाह करणे.

·       गुमान काम करणे - निमूटपणे काम करणे.

·       गुण्यागोविंदाने राहणे - प्रेमाने एकत्र राहणे.

·       गाडी अडणे – खोळंबा होणे.

·       ग्राह्य धरणे - योग्य आहे असे समजणे.

·       गट्टी जमणे - दोस्ती होणे.

·       गढून जाणे - मग्न होणे,गुंग होणे.

·       गुण दाखवणे - दुर्गुण दाखवणे.

·       गंगेत घोडे न्हाणे - कार्य तडीस गेल्यावर समाधान वाटणे.

·       गळ्यात धोंड पडणे – इच्छा नसताना जबाबदारी अंगावर पडणे.

·       गाशा गुंडाळणे - एकाएकी निघून जाणे,एकदम पसार होणे.

·       गाजावाजा करणे - प्रसिद्धी मिळविण्याचा प्रयत्न करणे.

·       गौडबंगाल असणे – गुढ गोष्ट असणे,काहीतरी रहस्य असणे. 

·       घडी भरणे - विनाशकाळ जवळ येऊन ठेपणे.

·       घागरगडचा सुभेदार – पाणक्या.

·       घर डोक्यावर घेणे - अतिशय गोंगाट करणे.

·       घर धुवून नेणे - सर्वस्वी लुबाडणे.

·       घाम गाळणे - खूप कष्ट करणे.

·       घालून-पाडून बोलणे - दुसऱ्याच्या मनाला लागेल असे बोलणे.

·       घोडे मारणे - नुकसान करणे.

·       घोडे पुढे दामटणे - स्वतःच्या फायद्यासाठी पुढे सरसावणे.

·       घोडे पेंड खाणे - अडचण निर्माण होणे.

·       घोकंपट्टी करणे - अर्थ लक्षात न घेता केवळ पाठांतर करणे.

·       चतुर्भुज होणे - लग्न करणे.

·       चक्कर मारणे - फेरफटका मारणे.

·       चाहूल लागणे - मागोवा लागणे.

·       चिल्लेपिल्ले वाऱ्यावर सोडणे – अनाथ करणे.

·       चेहरा खुलणे - आनंद होणे.

·       चित्त विचलित होणे - मूळ विषयाकडून लक्ष दुसरीकडे जाणे.

·       चंग बांधणे – निश्चय करणे.

·       चितपट करणे – कुस्तीत हरविणे.

·       चार पैसे गाठीला बांधणे - थोडीफार बचत करणे.

·       चुरमुरे खात बसणे - खजील होणे.

·       चारी दिशा मोकळ्या होणे - पूर्ण स्वातंत्र्य मिळणे.

·       चाहूल लागणे - एखाद्याचे अस्तित्व जाणवणे.

·       चौदावे रत्न दाखवणे - मार देणे. 

·       छाननी करणे - तपास करणे.

·       छातीत धस्सदिशी गोळा येणे - अचानक खूप घाबरणे.

·       जमीनदोस्त होणे - पूर्णपणे नष्ट होणे.

·       जंग जंग पछाडणे - निरनिराळ्या रीतींनी प्रयत्न करणे,कमालीचा प्रयत्न करणे.

·       जिभेला हाड नसणे - वाटेल ते बेजबाबदारपणे बोलणे.

·       जीभ सैल सोडणे – वाटेल तसे बोलणे.

·       जिवात जिव येणे - काळजी नाहीशी होऊन,पुन्हा धैर्य येणे.

·       जीव भांड्यात पडणे - काळजी दूर होणे.

·       जीव मुठीत धरणे - मन घट्ट करणे.

·       जळफळाट होणे - रागाने लाल होणे.

·       जम बसणे - स्थिर होणे,बस्तान बसणे.

·       जीवाची मुंबई करणे - अतिशय चैनबाजी करणे.

·       जीव मेटाकुटीस येणे - त्रासाने अगदी कंटाळून जाणे .

·       जीव अधीर होणे - उतावीळ होणे.

·       जीव टांगणीला लागणे - चिंताग्रस्त होणे.

·       जीवावर उदार होणे - प्राण देण्यास तयार होणे.

·       जिवाचे रान करणे - खूप कष्ट सोसणे.

·       जीव खाली पडणे – काळजीतून मुक्त होणे.

·       जिवाचा धडा करणे – पक्का निश्चय करणे.

·       जीव वरखाली होणे – घाबरणे.

·       जीव की प्राण असणे - प्राणाइतके प्रिय असणे.

·       जिवावर उठणे - जीव घेण्यास उद्युक्त होणे.

·       जीवावर उड्या मारणे - दुसऱ्यावर अवलंबून राहून चैन करणे.

·       जीवाला घोर लागणे - खूप काळजी वाटणे.

·       जीव गहाण ठेवणे - कोणत्याही त्यागास तयार असणे.

·       जिव थोडा थोडा होणे - अतिशय काळजी वाटणे.

·       जोपासना करणे - काळजीपूर्वक संगोपन करणे.

·       ज्याचे नाव ते असणे - उपमा देण्यास उदाहरण नसणे.

·       झाकले माणिक – साधा,पण गुणी मनुष्य.

·       झळ लागणे - थोडाफार दुष्परिणाम भोगावा लागणे.

·       झुंज देणे - लढा देणे,संघर्ष करणे.

·       त्राटिका - कजाग बायको.

·       टक लावून पाहणे - एकसारखे रोखून पाहणे.

·       टाहो फोडणे - मोठ्याने आकांत करणे.

·       टाके ढिले होणे - अतोनात श्रम झाल्यामुळे अंगी ताकत न रहाणे.

·       टिकाव लागणे - निभाव लागणे,तगून राहणे.

·       टेंभा मिरविणे - दिमाख दाखवणे.

·       ठसा उमटवणे - छाप पाडणे.

·       ठाण मांडणे - एका जागेवर बसून राहणे.

·       डाव साधने - संधीचा फायदा घेऊन कार्य साधने,योजलेल्या युक्तीने इष्ट वस्तू मिळविणे.

·       डाळ शिजणे – थारा मिळणे,सोय जुळणे,मनाजोगे काम होणे.

·       डाव येणे - खेळात राज्य येणे.

·       डोक्यावर घेणे - अति लाड करणे.

·       डोळे फिरणे  - खूप घाबरणे.

·       डोळा असणे – पाळत ठेवणे.

·       डोळे उघडणे – अनुभवाने सावध होणे.

·       डांगोरा पिटणे - जाहीर वाच्यता करणे.

·       डोक्यावर मिरी वाटणे - वरचढ होणे.

·       डोके खाजविणे - एखाद्या गोष्टीचा विचार करणे.

·       डोळ्यांवर कातडे ओढणे - जाणूनबुजून दुर्लक्ष करणे.

·       डोक्यावर खापर फोडणे - एखाद्यावर निष्कारण ठपका ठेवणे.

·       डोळ्यांत धूळ फेकणे - फसवणूक करणे.

·       डोळा चुकवणे - अपराधी भावनेमुळे नजरेला नजर देणे टाळणे.

·       डोळे निवणे - समाधान होणे.

·       डोळेझाक करणे – दुर्लक्ष करणे.

·       डोळ्याला डोळा न भिडवणे - घाबरून नजर न देणे.

·       डोळ्यातून थेंब न काढणे – दु:खद प्रसंग असूनही न रडणे.  

·       डोळे लावून बसणे - खूप वाट पाहणे.

·       डोळे वटारणे - रागाने बघणे.

·       डोळे पांढरे होणे – मोठा धक्कादायक प्रसंग ओढवणे.

·       डोळ्यांस धारा लागणे – अश्रू वाहणे,रडणे.

·       डोळ्यांत खुपणे - सहन न होणे.

·       डोळ्यांचे पारणे फिटणे - पूर्ण समाधान होणे.

·       डोळ्यात अंजन घालणे – चूक स्पष्टपणे लक्षात आणून देणे.

·       डोळे खिळून राहणे - एखाद्या गोष्टीकडे एकसारखे बघत राहणे.

·       डोळे दिपवले - थक्क करून सोडणे.

·       डोळ्यांत प्राण आणणे - एखाद्या गोष्टीसाठी अतिशय आतुर होणे.

·       डोळे फाडून पहाणे - तीक्ष्ण नजरेने पाहणे,आश्चर्यचकित होऊन पाहणे.

·       डोळ्यात तेल घालून रहाणे - अतिशय जागृत रहाणे.

·       डोळे भरून पहाणे - समाधान होईपर्यंत पाहणे.

·       तडीस नेणे - पूर्ण करणे.

·       तगादा लावणे – पुन्हा:पुन्हा मागणी करणे.

·       ताळ्यावर आणणे - योग्य समज देणे.

·       तळपायाची आग मस्तकात जाणे - अतिशय संताप होणे.

·       तारांबळ उडणे - अतिशय घाई होणे.

·       ताटकळत उभे राहणे - वाट पाहणे.

·       तारांबळ होणे - घाईगडबड उडणे.

·       ताट वाढणे - जेवायला वाढणे.

·       तोंडी लावणे - जेवताना चाखण्यासाठी एखादा पदार्थ देणे.

·       तोंड काळे करणे – कायमचे निघून जाणे.

·       तिलांजली देणे – सोडणे,त्याग करणे.

·       तोंड देणे - मुकाबला करणे,सामना करणे.

·       तोंडून अक्षरं न फुटणे - घाबरून न बोलणे.

·       तोंड फिरवणे – नाराजी व्यक्त करणे.

·       तोंड भरून बोलणे – मनाचे समाधान होईपर्यंत बोलणे,खूप स्तुती करणे.

·       तोंड काळे करणे - दृष्टीआड होणे,नाहीसे होणे.

·       तोंड सांभाळून बोलणे – जपून बोलणे.

·       तोंडाला पाने पुसणे – फसवणे.

·       तजवीज करणे - तरतूद करणे.

·       तळहातावर शीर घेणे - जीवावर उदार होणे.

·       तोंडचे पाणी पळणे - अतिशय घाबरणे,भयभयीत होणे.

·       तोंडघशी पाडणे – विश्वासघात होणे,अडचणीत येणे.

·       तोंडाला पाणी सुटणे – हाव निर्माण होणे, लालसा उत्पन्न होणे.

·       तोंडात बोट घालणे - आश्चर्यचकित होणे.

·       तोंडसुख घेणे – दोष देताना वाट्टेल तसे बोलणे.

·       तोंड टाकणे – अद्वातद्वा बोलणे.

·       तोंडावाटे ‘ब्र’ न काढणे - एकही शब्द न उच्चारणे.

·       थांग न लागणे - कल्पना न येणे.

·       थुंकी झेलणे - खुशामत करण्यासाठी लाचारी पत्करणे.

·       दुमदुमून जाणे - निनादून जाणे.

·       दगा देणे – फसवणे.

·       दबा धरून बसणे - टपून बसणे.

·       दाद मागणे - तक्रार करून किंवा गार्‍हाणे सांगून न्याय मागणे.

·       दात धरणे - वैर बाळगणे.

·       दाढी धरणे - विनवणी करणे.

·       दगडावरची रेघ - खोटे न ठरणारे शब्द.

·       दातांच्या कण्या करणे - अनेक वेळा विनंती करून सांगणे.

·       दाती तृण धरणे - शरणागती पत्करणे.

·       दक्षता घेणे - काळजी घेणे.

·       दडी मारणे - लपून राहणे.

·       देहातून प्राण जाणे - मरण येणे.

·       दिवस बुडून जाणे - सूर्य मावळणे.

·       दिशा फुटेल तिकडे पडणे - सैरावैरा पळणे.

·       दप्तरी दाखल होणे - संग्रही जमा होणे.

·       देखरेख करणे - राखण करणे.

·       देखभाल करणे - जतन करणे.

·       दत्त म्हणून उभे राहणे - एकाएकी हजर होणे.

·       दातखिळी बसणे - बोलणे अवघड होणे.

·       द्राविडी प्राणायाम करणे - सोपा मार्ग सोडून कठीण मार्गाने जाणे.

·       दुधात साखर पडणे – अधिक चांगले घडणे.  

·       दात ओठ खाणे – चीड व्यक्त होणे, द्वेषाची भावना दाखवणे.

·       दातखिळी बसणे - बोलती बंद होणे.

·       दोन हातांचे चार हात होणे - विवाह होणे.

·       देणेघेणे नसणे - संबंध नसणे.

·       दुसऱ्याच्या ओंजळीने पाणी पिणे - दुसऱ्याच्या तंत्राने किंवा सल्ल्याने चालणे.

·       दातास दात लावून बसणे - काही न खाता उपाशी राहणे.

·       दुःखावर डागण्या देणे – दु:खी झालेल्या माणसाला वाईट वाटेल असे बोलून आणखी दुःख देणे. 

·       धरणे धरणे – हट्ट धरून बसणे.

·       धिंडवडे निघणे - फजिती होणे.

·       धारातीर्थी पडणे - रणांगणावर मृत्यू येणे.

·       धाबे दणाणणे - खूप घाबरणे.

·       धूम ठोकणे - वेगाने पळून जाणे.

·       धूळ चारणे - पूर्ण पराभव करणे.

·       धन्य होणे - कृतार्थ होणे.

·       धुडगूस घालणे - गोंधळ करणे.

·       धास्ती घेणे - धक्का घेणे,घाबरणे.

·       धडपड करणे - खूप कष्ट करणे.

·       धारवाडी काटा - बिनचूक वजनाचा काटा.

·       नजरेत भरणे - उठून दिसणे.

·       नजर करणे - भेटवस्तू देणे.

·       नाक मुठीत धरणे - अगतिक होणे.

·       नाक घासणे - स्वतःची कार्य साधण्यासाठी दुसर्‍याचे पाय धरणे.

·       निवास करणे – रहाणे.

·       नसती बिलामत येणे - नसती कटकट ओढवणे.

·       नाक ठेचणे – नक्षा  उतरवणे.

·       नाक कापणे – घोर अपमान करणे.

·       निक्षून सांगणे - स्पष्टपणे सांगणे.

·       नाक मुरडणे - नापसंती दाखवणे.

·       नूर पातळ होणे - रूप उतरणे.

·       नाकावर राग असणे - लवकर चिडणे.

·       नाक खुपसणे – नको त्या गोष्टीत उगाचच सहभागी होणे.

·       निष्प्रभ करणे - महत्व कमी करणे.

·       नाक वर असणे – ऐट,दिमाख किंवा ताठा असणे.

·       नाकाला मिरच्या झोंबणे - एखाद्याचे वर्म काढल्यामुळे त्याला राग येणे.

·       नाकी नऊ येणे – फार दगदग होणे,मेटाकुटीला येणे,फार त्रास होणे.

·       नांगी टाकणे - हातपाय गाळणे.

·       नाव मिळवणे - कीर्ती मिळवणे.

·       नजर वाकडी करणे - वाईट हेतू बाळगणे.

·       नाळ तोडणे - संबंध तोडणे.

·       निद्राधीन होणे – झोपणे.

·       नाव कमावणे - कीर्ती मिळवणे.

·       नाकाने कांदे सोलणे – स्वतःमध्ये दोष असूनही उगाच बढाया मारणे.

·       नक्राश्रू ढाळणे - अंतर्यामी आनंद होत असता बाह्यतः दुःख दाखवणे.

·       नक्षा उतरवणे - गर्व उतरवणे.

·       नाकाशी सूत धरणे - आता मरतो की घटकेने मरतो अशी स्थिती निर्माण होणे. 

·       पाठीशी घालने - संरक्षण देणे.

·       पाणी पडणे - वाया जाणे.

·       पोटात कावळे ओरडणे -  भुकेने व्याकूळ होणे.

·       पाणी मुरणे - कपटाने काहीतरी लपवून ठेवणे,गुप्त कट शिजवत असणे.

·       पाणी पाजणे - पराभव करणे.

·       पाणी सोडणे - आशा सोडणे.

·       पदरात घेणे – स्वीकारणे.

·       पडाव पडणे - वस्ती करणे.

·       पदरी घेणे - स्वीकार करणे.

·       परिपाठ असणे - विशिष्ट पद्धत असणे,नित्यक्रम असणे.

·       पाळी येणे - वेळे येणे.

·       पाहुणचार करणे - आदरातिथ्य करणे.

·       पाठिंबा देणे - दुजोरा देणे.

·       पदरात घालने – चूक पटवून देणे,स्वाधीन करणे.

·       पाचवीला पुजणे - त्रासदायक गोष्टींची कायमची सोबत असणे.

·       पाठ न सोडणे - एखाद्या गोष्टीचा पिच्छा पुरवणे.

·       पाढा वाचणे - सविस्तर हकीकत सांगणे.

·       पादाक्रांत करणे – जिंकणे.

·       पुनरुज्जीवन करणे - पुन्हा उपयोगात आणणे.

·       पाचवीला पूजणे - एखादी गोष्ट जन्मापासून असणे.

·       पार पाडणे - पूर्ण करणे.

·       पाळत ठेवणे - लक्ष ठेवणे.

·       पाण्यात पाहणे - अत्यंत द्वेष करणे.

·       पाय मोकळे करणे – फिरायला जाणे.

·       पराचा कावळा करणे - मामुली गोष्टीला भलतेच महत्त्व देणे.

·       पाऊल वाकडे पडणे - वाईट मार्गाने जाणे.

·       पायाखाली घालने - पादाक्रांत करणे.

·       पुंडाई करणे - दांडगाईने वागणे.

·       पाठ दाखवणे - पळून जाणे. 

·       पाठ थोपटणे – शाब्बासकी देणे,कौतुक करणे.

·       प्रतिबंध करणे - अटकाव करणे.

·       प्रेरणा मिळणे - स्फूर्ती मिळणे.

·       पायमल्ली करणे - उपमर्द करणे.

·       पोटात कावळे काव काव करणे - अतिशय भूक लागणे.

·       पोटात घालणे - क्षमा करणे.

·       पोटात ठेवणे – गुपित सांभाळणे.

·       पोटात शिरणे - मर्जी संपादन करणे.

·       पोटावर पाय देणे – रोजंदारी बंद करणे,उदरनिर्वाहाचे साधन काढून घेणे.

·       पोटाची दमडी वळणे - खायला न मिळणे.

·       पदरमोड करणे - दुसऱ्यासाठी स्वतःचा पैसा खर्च करणे.

·       पोटाला चिमटा घेणे - पोटाला न खाता राहणे.

·       पोटात ब्रह्मराक्षस उठणे - खूप खावेसे वाटणे.

·       पिंक टाकणे  - थुंकणे

·       प्रश्नांची सरबत्ती करणे - एकसारखे प्रश्न विचारणे.

·       प्राण कानांत गोळा होणे - ऐकण्यासाठी अतिशय उत्सुक होणे.

·       प्राणावर उदार होणे - जिवाची पर्वा न करणे.

·       प्रचारात आणणे - जाहीरपणे माहिती देणे.

·       प्रतिष्ठापीत करणे - स्थापना करणे.

·       प्राणाला मुकणे - जीव जाणे,मरण येणे.

·       प्रक्षेपित करणे - प्रसारित करणे.

·       प्रतिकार करणे - विरोध करणे.

·       प्रत्यय येणे - प्रचीती येणे.

·       प्रतिष्ठा लाभणे - मान मिळणे.

·       प्रस्ताव ठेवणे - ठराव मांडणे.

·       प्राप्त करणे – मिळवणे.

·       पोटात ठेवणे - गुप्तता ठेवणे.

·       पहारा देणे - राखण करणे.

·       पुढाकार घेणे - नेतृत्व करणे.

·       प्रघात पडणे - रीत असणे.

·       पार पाडणे - सांगता करणे,संपवणे,संपन्न होणे.

·       प्रभावित होणे – छाप पडणे.

·       परिसीमा गाठणे – परकोटीला जाणे.

·       पसंती मिळणे - अनुकूलता लाभणे.

·       फटफटणे - सकाळ होणे .

·       फाटे फोडणे - उगाच अडचणी निर्माण करणे.

·       फुटाण्यासारखे उडणे - झटकन राग येणे.

·       फिदा होणे - खुश होणे.

·       फंदात न पडणे - भानगडीत न अडकणे.

·       बट्ट्याबोळ होणे - विचका होणे.

·       ब्रभ्रा करणे - बोभाटा करणे,सगळीकडे प्रसिद्ध करणे.

·       बारा वाजणे - पूर्ण नाश होणे.

·       बस्तान ठोकणे - मुक्काम ठोकणे.

·       बळ लावणे - शक्ती खर्च करणे.

·       बादरायण संबंध असणे - ओढून ताणून लावलेला संबंध असणे.

·       बत्तीशी रंगवणे - जोराने थोबाडीत मारणे.

·       बुचकळ्यात पडणे - गोंधळून जाणे.

·       बेत हाणून पाडणे - बेत सिद्धीला जाऊ न देणे.

·       बारा गावचे पाणी पिणे - विविध प्रकारचे अनुभव घेणे.

·       बाजारगप्पा – निंदा नालस्ती.

·       बावरणे – गोंधळणे.

·       बडेजाव वाढवणे - प्रौढी मिरवणे.

·       बांधणी करणे - रचना करणे.

·       बाहू स्फुरण पावणे - स्फूर्ती येणे.

·       बत्तरबाळ्या होणे - चिंध्या होणे,नासधूस होणे.

·       बेत आखणे - योजना आखणे.

·       बेत करणे - योजना आखणे.

·       बहिष्कार टाकणे - वाळीत टाकणे नकार देणे.

·       बोचणी लागणे - एखादी गोष्ट मनाला लागून राहणे.

·       बोटावर नाचवणे - आपल्या इच्छेप्रमाणे दुसऱ्याला वागायला लावणे.

·       बोल लावणे - दोष देणे.

·       बोळ्याने दूध पिणे - बुद्धिहीन असणे.

·       बोला फुलाला गाठ पडणे - दोन गोष्टींची सहजासहजी एक वेळ जमून येणे.

·       भगीरथ प्रयत्न करणे - चिकाटीने प्रयत्न करणे.

·       भान नसणे - जाणीव नसणे.

·       भानावर येणे - परिस्थितीची जाणीव होणे,शुद्धीवर येणे.

·       भाऊबंदकी असणे - नात्यानात्यात भांडण असणे.

·       भंडावून सोडणे - त्रास देणे.

·       भडभडून येणे - हुंदके देणे,गलबलणे.

·       भ्रमण करणे - भटकंती करणे.

·       भरारी मारणे - झेप घेणे.

·       भान ठेवणे - जाणीव ठेवणे.

·       भरभराट होणे - प्रगती होणे,समृद्धी होणे.

·       भारून टाकणे - पूर्णपणे मोहून टाकणे.

·       मनात मांडे खाणे - व्यर्थ मनोराज्य करणे.

·       मान ताठ ठेवणे – स्वाभिमानाने वागणे.

·       माशा मारणे - कोणताही उद्योग न करणे.

·       माशी शिंकणे - अडथळा येणे.

·       मिशीवर ताव मारणे - बढाई मारणे.

·       मधून विस्तव न जाणे - अतिशय वैर असणे.

·       मूग गिळणे - उत्तर न देता गप्प राहणे.

·       मधाचे बोट लावणे - आशा दाखवणे.

·       मनात घर करणे - मनात कायमचे राहणे.

·       मन मोकळे करणे - सुखदुःखाच्या गोष्टी बोलून दाखविणे.

·       मनाने घेणे - मनात पक्का विचार येणे.

·       मन सांशक होणे - मनात संशय वाटू लागणे.

·       मनोरथ पूर्ण होणे - इच्छा पूर्ण होणे.

·       मनावर ठसणे - मनावर जोरदारपणे बिंबणे.

·       मशागत करणे - मेहनत करून निगा राखणे.

·       मात्रा चालणे - योग्य परिणाम होणे.

·       मागमूस नसणे - थांगपत्ता नसणे.

·       मान्यता पावणे - सिद्ध होणे.

·       मात करणे - विजय मिळवणे.

·       मांडीवर घेणे – दत्तक घेणे.

·       मोहाला बळी पडणे - एखाद्या गोष्टीच्या आसक्तीमध्ये वाहून जाणे.

·       मुखोद्गत असणे – तोंडपाठ असणे.

·       मनावर बिंबवणे - मनावर ठसवणे.

·       मती गुंग होणे - आश्चर्य वाटणे.

·       मिशांना तूप लावणे - उगीच ऐट दाखवणे.

·       मिनतवारी करणे – दादा-पुता करणे.


·       यक्षप्रश्न असणे - महत्त्वाची गोष्ट असणे.

·       योगक्षेम चालविणे - रक्षणाची काळजी वाहणे.

·       रक्ताचे पाणी करणे - अतिशय मेहनत करणे.

·       राईचा पर्वत करणे – क्षुल्लक गोष्टीला उगाच मोठे स्वरूप देणे.

·       राख होणे - पूर्णपणे नष्ट होणे.

·       राब राब राबणे - सतत खूप मेहनत करणे.

·       राम नसणे - अर्थ नसणे.

·       रस असणे - अत्यंत आवड असणे.

·       राबता असणे - सतत ये-जा असणे.

·       रवाना होणे - निघून जाणे.

·       रुची निर्माण होणे - गोडी निर्माण होणे.

·       राम म्हणणे - शेवट होणे,मृत्यू येणे.

·       रोष ठेवणे - नाराजी असणे,चीड येणे.

·       रक्षणाची काळजी घेणे - योगक्षेम चालविणे.

·       रियाज करणे - सराव करणे.


·       लष्कराच्या भाकर्‍या भाजणे - दुसऱ्यांच्या उठाठेवी करणे.

·       लहान तोंडी मोठा घास घेणे - आपणास न शोभेल अशा प्रकारे वरचढपणा दाखवणे.

·       लक्ष वेधून घेणे - लक्ष ओढून घेणे.

·       लळा लागणे - ओढ वाटणे.

·       ललकारी देणे - जयघोष करणे.

·       लांछनास्पद असणे – लाजिरवाणे असणे.

·       लवलेश नसणे - जराही पत्ता नसणे,जराही न उरणे.

·       लष्टक लावणे - झंझट लावणे,निकड लावणे.

·       लक्ष्मीचा वरदहस्त असणे - लक्ष्मीची कृपा असणे,श्रीमंती असणे.

·       लौकिक मिळवणे - सर्वत्र मान मिळवणे. 

·       वकीलपत्र घेणे - एखाद्याची बाजू घेणे.

·       वाचा बंद होणे - तोंडातून एक शब्दही बाहेर न पडणे.

·       वाट लावणे - विल्हेवाट लावणे,मोडूनतोडून टाकणे .

·       वाटाण्याच्या अक्षता लावणे - स्पष्टपणे नाकारणे. 

·       वठणीवर आणणे - ताळ्यावर आणणे.

·       वणवण भटकणे - एखादी गोष्ट मिळवण्यासाठी खूप फिरणे.

·       वाचा बसणे - एक शब्दही बोलता न येणे.

·       विहरणे - संचार करणे.

·       वाट तुडवणे - रस्ता कापणे.

·       विरोध दर्शवणे - प्रतिकार करणे.

·       विसावा घेणे - विश्रांती घेणे.

·       वजन पडणे – प्रभाव पडणे.

·       व्रत घेणे - वसा घेणे.

·       वणवण करणे - खूप भटकणे.

·       विपर्यास होणे – असंगत अर्थ लावणे.

·       विरस होणे - निराशा होणे,उत्साहभंग होणे.

·       वारसा देणे - वडिलोपार्जित हक्क सोपवणे.

·       वंचित रहाणे - एखादी गोष्ट न मिळणे.

·       वरदान देणे - कृपाशीर्वाद देणे.

·       विचलित होणे - मनाची चलबिचल होणे.

·       विसंवाद असणे - एकमेकांशी न जमणे.

·       वड्याचे तेल वांग्यावर काढणे - एकाचा राग दुस-यावर काढणे.

·       विडा उचलणे - निश्चय किंवा प्रतिज्ञा करणे.

·       विदीर्ण होणे - भग्न होणे,मोडतोड होणे.

·       वेड घेऊन पेडगावला जाणे - मुद्दाम ढोंग करणे.

·       वेसण घालणे - मर्यादा घालणे.



·       शब्द जमिनीवर पडू न देणे - दुसऱ्याच्या इच्छेनुसार लगेच कार्यवाही करणे.

·       शहानिशा करणे - एखाद्या गोष्टीबाबत चौकशी करून खात्री करून घेणे.

·       शिगेला पोचणे - शेवटच्या टोकाला जाणे.

·       शंभर वर्षे भरणे - नाश होण्याची वेळ येणे.

·       सर्वस्व पणाला लावणे - सर्व शक्य मार्गांचा अवलंब करणे.

·       साखर पेरणे - गोड गोड बोलून आपलेसे करणे.

·       सामोरे जाणे - निधड्या छातीने संकटास तोंड देणे.

·       साक्षर होणे - लिहिता-वाचता येणे.

·       सहभागी होणे - सामील होणे.

·       सपाटा लावणे - एकसारखे वेगात काम करणे.

·       समरस होणे - गुंग होणे.

·       सख्य नसणे - मैत्री नसणे.

·       सूड घेणे - बदला घेणे.

·       सही ठोकणे - निश्चित करणे.

·       सहीसलामत सुटणे - दोष न येता सुटका होणे.

·       सांगड घालणे  - मेळ साधणे.

·       साक्षात्कार होणे - आत्मिक ज्ञान प्राप्त होणे,खरेखुरे स्वरूप कळणे.

·       साद घालणे - मनातल्या मनात दुःख करणे.

·       सुताने स्वर्गाला जाणे - थोडा सुगावा लागताच संपूर्ण गोष्टीचे स्वरूप तर्काने जाणण्याचा प्रयत्न करणे.

·       सोन्याचे दिवस येणे - अतिशय चांगले दिवस येणे.

·       सूतोवाच करणे - पुढे घडणार्‍या गोष्टींची प्रस्तावना करणे.

·       संधान बांधने - जवळीक निर्माण करणे.

·       संभ्रमात पडणे - गोंधळात पडणे.

·       संभ्रमित होणे – गोंधळणे.

·       सोटेशाई चालवणे - दांडगाई करणे.

·       सारसरंजाम असणे - सर्व साहित्य उपलब्ध असणे.

·       समजूत काढणे – समजावणे.

·       स्तंभित होणे - आश्चर्याने स्तब्ध होणे.

·       सुळकांडी मारणे - सूर मारणे.

·       सख्य नसणे - प्रेमळ नाते नसणे.

·       स्वप्न भंगणे - मनातील विचार कृतीत न येणे.

·       स्वर्ग दोन बोटे उरणे – आनंदाने,गर्वाने अतिशय फुगून जाणे.

·       सांजावणे - संध्याकाळ होणे.

·       साशंक होणे - शंका येणे.

·       हट्टाला पेटणे - मुळीच हट्ट न सोडणे.

·       हमरीतुमरीवर येणे - जोराने भांडू लागणे.

·       हरभऱ्याच्या झाडावर चढवणे - खोटी स्तुती करून मोठेपणा देणे.

·       हसता हसता पुरेवाट होणे - अनावर हसू येणे.

·       हस्तगत करणे - ताब्यात घेणे.

·       हातपाय गळणे - धीर सुटणे.

·       हातचा मळ असणे – सहज शक्य असणे.

·       हातघाईवर येणे – भांडणाची वेळ येणे.

·       हुडहुडी भरणे - थंडी भरणे.

·       हात ओला होणे - फायदा होणे.

·       हात टेकणे - नाइलाज झाल्याने माघार घेणे.

·       हात देणे - मदत करणे.

·       हात मारणे - ताव मारणे,भरपूर खाणे.

·       हाय खाणे - धास्ती घेणे.

·       हात चोळणे – चरफडणे.

·       हातावर तुरी देणे - डोळ्यांदेखत फसवून निसटून जाणे.

·       हात हलवत परत येणे - काम न होता परत येणे.

·       हात झाडून मोकळे होणे - जबाबदारी अंगाबाहेर टाकणे किंवा जबाबदारी टाळून मोकळे होणे.

·       हाता पाया पडणे - गयावया करणे.

·       हातात कंकण बांधणे - प्रतिज्ञा करणे.

·       हाताला हात लावणे - थोडीदेखील मेहनत न घेता फुकटचे श्रेय घेणे.

·       हातावर शिर घेणे - जिवावर उदार होणे किंवा प्राणांचीही पर्वा न करणे.

·       हात धुऊन पाठीस लागणे - चिकाटीने एखाद्या गोष्टीच्या मागे लागणे.

·       हुल देणे - चकवणे.

·       हात न पसरणे - न मागणे.

·       हात राखून जेवणे – कमी जेवणे.

·       हिसका दाखविणे - बळ दाखवून किंमत लक्षात आणून देणे.

·       हाडीमांसी भिनणे - अंगात मुरणे.

·       हवालदिल होणे - हताश होणे.

·       हशा पिकणे - हास्य स्फोट होणे.

·       हंबरडा फोडणे - मोठ्याने रडणे.

·       हसता हसता पोट दुखणे - खूप हसणे.

·       हेवा वाटणे – मत्सर वाटणे.

·       हातभार लावणे - सहकार्य करणे.

·       हौस भागवणे - आवड पुरवून घेणे.

·       श्रीगणेशा करणे - आरंभ करणे.

 

Most Important Contraction List

Most Important Contraction List Are not –> aren’t Can not –> can’t Could not –> couldn’t Did not –> didn’t Do not –> don’t Do...